शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच


शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो 
ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पानं 
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या
अस्फुट चित्कांरांना 
किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी लटकलेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची निरागस अक्षरे 
शिक्षक नसतो कधीच बिचारा
तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा त्याच्याच स्वामीत्वाने महत्व येत असते शाळेला 
तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ नखशिखान्त अंधार भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून सूर्याचं तेज बाहेर काढणारा
तो समाज सुधारक क्रांती कारकही तोच कित्येक चेतनांना पाठबळ असते त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे 
शिक्षकाला जपावी लागतात कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाडआणि आकार द्यावा लागतो एका मुक्त पणे बागडणाऱ्या
निराकार चैतन्याला
...कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आतनिर्ममपणे...कधी अंधार ही प्यावा लागतो बिनबोभाटपणे 
तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर 
त्याच्या सोबतीला असतेच की खडूची धारदार तलवार अन फळ्याची ढाल असते पाठीशी 
विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल.
अन तेंव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल
संतोष सेलूकर
परभणी
७७०९५१५११०























































































































































































































कविता. कवी म्हणजे...

*कविता*
*कवी म्हणजे....*

कवी म्हणजे, कवी म्हणजे,कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो 

कधी गाणारा गवई असतो तर कधी 
उपदेश करणारा मौलवी असतो

कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो.
ग्रहता-यात चमकणारा रवी असतो


शहाणा म्हणावं तर वेड्या धुंदीत राहतो 
वेडा म्हणावं तर शहाणपणाच्या गोष्टी करतो 
कधी कधी तर शेकड्यास सवई असतो 

कवी म्हणजे, कवी म्हणजे,कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो.

कविला नसतात कधी नाती आपली- परकी काही 
प्रत्येक संवेदनेशी असते त्याने नाळ  जोडलेली  
कवी म्हणजे शब्द लेकरांची आई असतो.

कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो.

*संतोष सेलुकर* *परभणी*

AUGUST SHIKSHAN PARISHAD

शिक्षण परिषद केंद्र - कें.गणपूर. 
माहे:- आॅगस्ट
दि.13/08/2020 
अहवाल
🎤प्रास्ताविक. 

 ☘️संजय कांबळे केंद्रप्रमुख ,के प्रा शा गणपुर यांनी केले.

प्रमुख मार्गदर्शक

☘️प्रमुख उपस्थिती.मा.साबळे डी.डी.ग.शि.अ .पूर्णा☘️


☘️ विषय सहाय्यक श्रीमती भरोसे मॅडम बी.आर.सी.पूर्णा
यांनी दिनदर्शिकेचा वापर सर्वांनी करण्याबाबत .आवाहन केले. 
विजय माने ग्यानप्रकाश फाउंडेशन यांनी पालकाच्या सहकाऱ्यांनी मुलांचे अध्ययन होऊ शकते . असा विश्वास आपल्या वक्तव्या मधून सर्व शिक्षकांना दिला.

गट - 1 इ.1ली ते 5 वी
वेळ 11:00 ते 12:45

☘️सी.आर.जी.
1) मराठी - रुपाली आढाव यांनी शिक्षण परिषदेत प्रथमच आपला विषय मांडला त्याबद्दल केंद्रप्रमुख व सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
2) गणित - कुंडलिक कांबळे यांनी covid-19 या काळातील त्यांचे अध्यापनातील अनुभव व व विविध उदाहरणे देऊन गणित विषयाचा माहे ऑगस्ट चा अभ्यासक्रम व त्याची अंमलबजावणी याबद्दल विवेचन केले
3) इंग्रजी - मसारे मॅडम यांनी इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवता येतो हे स्पष्ट केले
4) प.अभ्यास -1 -महेश पवार यांनी आपले शालेय अनुभव व परिसर भाग 2 परिसर यांची सांगड घालून सहज शिक्षणातून मुले शिकतात याबद्दल सांगितले
5) प.अ.-2 -गर्दसवार मॅडम यांनी इतिहास कथन पद्धतीने व पालकांकडून मुले शिकू शकतात याबद्दल सांगितले

*गट 2 - इयत्ता 6 ते 8 दुपार सत्र
मार्गदर्शन
☘️साधनव्यक्ती व्यंकट रमण जाधव यांनी दुपार सत्रात मार्गदर्शन केले
 
सी. आर.जी.
1) मराठी - दिलीप शृंगारपुतळे सर मराठी साहित्य व कविता यांची ओळख करून देण्यासाठी पालकांची मदत घेता येते हे स्पष्ट केले
2) गणित - विलास कांबळे यांनी गणित विषय आपण मुलांपर्यंत वेगवेगळ्या प्रात्यक्षिक द्वारे सोपा करून समजावून देऊ शकतो
3) इंग्रजी -सेलूकर सर इंग्रजीचा वगळलेला अभ्यासक्रम स्पष्ट केला व काही इंग्रजीच्या कृतीबाबत माहिती दिली
4) विज्ञान -दिपक शिंदे यांनी छोट्या प्रयोगाद्वारे विज्ञान विषय मुलांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवता येतो हे स्पष्ट केले.
5) सा.शास्त्र नागनाथ बिबेकर यांनी भूगोल विषय व दैनंदिन जीवन यांची सांगड घालता येते व मुलांचे  अध्ययन घडते हे स्पष्ट केले.
6) तंत्रस्नेही - बालाजी कदम सर यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले अध्ययन-अध्यापन सुलभ कसे करता येईल याबद्दल आपल्या विषयाची मांडणी केली.
शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक झुम वर उपस्थित होते व अत्यंत खेळीमेळीच्या व आनंदाच्या वातावरणामध्ये ही शिक्षण परिषद संपन्न झाली.केंद्रप्रमुख संजय कांबळे यांनी प्रशासकीय सूचना दिल्या व आपल्या केंद्राची यापुढील काळातील वाटचाल कशी असेल या बद्दल दिशा निश्चित करुन सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण न्यावे असे आवाहन केले.
शब्दांकन
संतोष सेलुकर प्रा.शा.बलसा

टिली मिली कार्यक्रम

*आज दिनांक 31/07/ 2020 रोजी बलसा गावामध्ये टिली मिली या शैक्षणिक कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व तसेच वेळ लक्षात राहावी यासाठी गावातील मुख्य ठिकाणी भिंतीवर कार्यक्रमाचे वेळापत्रक चिटकवले याप्रसंगी सुरेशराव डुबे शा.व्य.स अध्यक्ष व पालक ज्ञानेश्वर शिंदे यांनी सहकार्य केले व या निमित्ताने पालकांना भेटून या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले  सर्वांनी हा कार्यक्रम नियमित पहावा यासाठी आवाहन केले यासाठी शाळेतील तळमळीचे शिक्षक कांबळे सर यांच्याबरोबर गृहभेटी दिल्या मुलांच्या शिक्षणातील अडचणी समजून घेतल्या.शिक्षणाचे वेगवेगळे स्रोत आपल्या विद्यार्थ्यानां कसे उपलब्ध होतील याबाबत गावक-यांशी चर्चा केली.अनेक गावकरी व पालक सहकार्य करत आहेत कुणी आपला मोबाईल एक तास दुस-यासाठी देत आहे.मारोती डुबे या मुलांने आपला मोबाईल आपल्या शेजारील मुलांसाठी एक तास उपलब्ध करून दिला धन्यवाद मारोती डुबे  यांना आपले हे योगदान जि.प.शाळा कधीही विसरणार नाही. काही पालक टि.व्ही वरील कार्यक्रम मुलांसाठी लावून देत आहेत व आपल्या शेजारच्या मुलांना ज्यांच्या घरी टि.व्ही नाही त्यांना शिक्षण मिळत आहे हे कार्य ही खूप मोलाचे आहेत अशाच प्रकारे जर गावातील सर्व टि.व्ही मोबाईल धारक यांनी मदत केली तर बलसा गावातील आॅनलाईन शिक्षण नक्कीच यशस्वी होईल.असेच कार्य इतरांनीही करावे हीच अपेक्षा .मला खात्री आहे कोणीही पालक या कामाला नाही म्हणणार नाही धन्यवाद*
शब्दांकन
*संतोष सेलूकर*
*मु.अ.बलसा*