बातम्या,

शिक्षण परिषद के.प्रा.शा.गणपूर. *के.प्रा.शा.गणपूर केंद्रस्तरीय शिक्षण परिषद* दि.१७ ऑक्टोबर २०२२ सोमवार रोजी के.प्रा.शा.गणपूर येथे शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 📔*प्रास्ताविक* संजय कांबळे , केंद्रप्रमुख गणपूर‌ यांनी केले. डाॅ.प्रल्हाद खुणे प्राचार्य डायट परभणी , प्रा.अनिल जाधव अधिव्याख्याता डायट परभणी विशाल बडे सर ग्यान‌ फाउंडेशन यांनी शिक्षण परिषदेला भेट दिली. या प्रसंगी अनिल जाधव यांनी अध्ययन निष्पत्ती वर सर्व शिक्षकांनी काम करणे गरजेचे असून अतिशय दुर्गम भागात या ठिकाणी खूप चांगले काम होत आहे या बद्दल कौतुक ही केले. त्यानंतर प्रल्हाद खुणे यांनी शिक्षकांना अध्यापनात खूप आनंद मिळत असतो.आईपेक्षाही बालक जास्त आपल्या शिक्षक शिक्षिकांचे ऐकतो ही अत्यंत आनंदाची बाब आहे. खालील विषय पत्रिकेनुसार सी.आर. जी.यांनी आपले विषय शिक्षकांसमोर मांडले. *विषय: हॅपीनेस करीक्यूलम प्रशिक्षण*. 📗 *सजगता* -डाॅ.संतोष सेलूकर 📘 *कथा चिंतन* - सौ. प्रतिमा मसारे 📙 *कृती*- श्री नागनाथ बिबेकर 📕 *अभिव्यक्ती*- -डाॅ.दिलीप शृंगारपुतळे केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांनी शिक्षण परिषदेला चांगला प्रतिसाद दिला.शेवटी सर्वांचे आभार व्यक्त‌ करुन शिक्षण परिषद संपन्न झाली. 🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️

शिक्षण परिषद,

🎤 निपुण भारत अभियान 2022 केंद्रस्तरीय *शिक्षणपरिषद के.प्रा.शा.गणपूर येथे दि. 6 August 2022 रोजी saturday वेळ: 10.00 ते 2:00 केंद्रस्तर शिक्षण परिषद सर्व मु.अ. व फक्त 1ते 5 वर्गाला शिकवणा-या शिक्षकांनी उपस्थित रहावे प्रास्ताविक 📗 के.प्र.संजय कांबळे निपुण भारत अभियान 2022 सुलभक 📗 प्रतिमा मसारे 📗 दिपक शिंदे 📗 संतोष सेलूकर 📗सुचना 🏵️शिक्षकांनी आपल्या वर्गासाठीची निपुण भारत अंतर्गत कृतिपुस्तिका गणित व भाषा सोबत आणावी. 🏵️सोबत दुपारचा डब्बा आणावा 🏵️मु.अ.यांनी शा.पो.आ.नियोजन करुन परिषद स्थळी यावे. केंद्रप्रमुख के.प्रा.शा.गणपूर

शैक्षणिक व्हीडीओ

बालाजी रमेश डुबे

शैक्षणिक व्हीडीओ

वी शल ओव्हरकम

बलसा येथे भागवत शिंदे यांचा सत्कार ते

प्राथमिक शाळा बलसा बु.
बलसा शाळेला वेळोवेळी मदत करणारे , सांस्कृतिक कार्यक्रमांचे  उत्कृष्ट सू त्रसंचालन करणारे,बलसा येथील रहिवासी व जि.प.प्रा.शा.फुकटगाव शाळेचे कर्तव्यदक्ष शिक्षक श्री भागवत सुदामराव शिंदे सर यांना नुकताच राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्याऊ अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शिवाजी अंबादास डुबे तर या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मारोतराव काळे तसेच पालक उत्तमराव डुबे हे होते.या प्रसंगी सेलूकर एस आर यांनी भागवत शिंदे यांच्या शै.कार्याचा परिचय करुन दिला.शिंदे यांनीही सत्कारास उत्तर दिले.कार्यक्रमाचे आभार कुंडलिक कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.बंडाळे,सौ.कदम,सौ काळवीट व सर्व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.