Showing posts with label सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषद १०-१२ जून २०२०. Show all posts
Showing posts with label सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषद १०-१२ जून २०२०. Show all posts

शिक्षण परिषदेतील सहभाग

सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषद दि 10 ते 12 जून 2020
#CCEFinland#Covid19#CreativeLockdown# GoCorona#गोकोरोना CCE फिनलँड व्दारे आयोजित आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन दि 10 ते 12 जून 2020 दरम्यान करण्यात आलेले होते. सृजनशील शिक्षण  असा अनोखा विषय घेऊन ही परिषदेचे आयोजन फिनलँड स्थित श्री हेरंब आणि शिरीन  कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या शिक्षण विषयात जगभरात नावाजलेल्या या संस्थेने केलेले होते.मला या परिषदेत सहभाग घेऊन माझा शोधनिबंध सादर करता आला.त्यामुळे माझा विषय जगाच्या एका मोठया व्यासपिठावर मांडण्याची संधी मला हेरंब सर यांच्यामुळे मिळाली त्यामुळे त्यांना धन्यवाद द्यायला पहिजे.मी परभणी सारख्या अतिशय ग्रामीण आणि प्रगत जगापासून खूप दूर असणा-या एका जिल्ह्यातून या परिषदेमध्ये सहभागी झालो होतो. जगभरातून अनेक शोधनिबंधक यांनी सहभाग घेतला होता.त्यांचे शिक्षण विषयक विचार या निमित्ताने ऐकण्यास मिळाले.जगात शिक्षण क्षेत्रात फिनलँड ने केवढी प्रगती केलेली आहे हे ऐकून खूप आनंद झाला.फिनलँड शिक्षण पध्दतीची ओळख झाली.आपणही या पध्दतीचा आपल्या क्षेत्रात वापर करावा असा ही विचार मनात आला.SISU बॉक्स पाहण्यात आला. नव्या शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यास प्रत्येकास आवडते त्याप्रमाणे माझे ही झाले.आपणही या संस्थेसोबत काही उपक्रम आपल्या शाळेत राबवावे असेही वाटले. परिषदेत अनेक मान्यवर यांचे विचार आवडले.प्रवीण दवणे, गानू सर, सुनंदन लेले सर, श्रुतीताई पानसे मॅडम, वनिता पटवर्धन मॅडम, मनशक्ती केंद्रांचे श्री प्रमोदभाई, सरदेशमुख सर, नावलेकर मॅडम, काळपांडे सर, प्रशांत जोशी,डॉ रेवती नामजोशी, विवेक सर या सर्व आपल्या क्षेत्रात यश संपादित केलेल्या मंडळीचे शिक्षणासंबधीचे विचार आणि त्यांचे कार्य भारावून सोडणारे होते. धनिका मॅडम,शिरीन मॅडम आणि हेरंब सर यांनी वेळोवेळी अगदी स्क्रीनवर आपण कसे स्पष्ट दिसायला पहिजे व कसे व्यक्त व्हायला पाहिजे याबाबत खूप व्यवस्थित मार्गदर्शन केल्यामुळेच आम्हाला ही शिक्षण परिषद अटेन्ड करता आली.
एका यशस्वी आणि ज्यामधून मला खूप काही शिकायला मिळाले अशा परिषदेला उपस्थित राहिल्याचा आनंद मिळाला

धन्यवाद
संतोष सेलूकर
7709515110
Santosh.selukar@gmail.com