टेस्टमोज चाचणी

Kavita desh

मुख्याध्यापकांचे केबिन 
दारावर नेमप्लेट लावलेली 
ग.दी कुलकर्णी एम ए एम एड 
थोडं आत गेलं की दिसतो 
खूप काही सोसलेला महात्मा गांधींचा फोटो 
त्याच्या बाजूला अखंड भारताचे चित्र डोळ्यासमोर घेऊन हसणारे पंडित नेहरू मोठ्या खिळ्याला जाड दोरीन बांधलेले असतात 
काचबंद चौकटीच्या आतून करारी बाण्याने 
पहात असतात नेताजी सुभाषचंद्र बोस 
मुख्याध्यापकही खिडकीतून न्याहाळत असतात सारे वर्ग बसल्या बसल्याच 
इतक्यात दोन मुलं केबिनमध्ये येतात 
"...सर माझ्या पुस्तकातला भारताचा नकाशा ह्या मन्याने फाडला....."
नकाशाचे तुकडे झालेले पाहून सर जाम चिडतात 
मुले पुस्तक घेऊन निघून जातात.
 नकाशा चे तुकडे टेबलावर तसेच पडलेले.. 
सर मनाशी म्हणतात "तुम्ही तुमचा भारत फाटल्याची तक्रार माझ्याकडे आणली;पण माझी भारत फाटल्याची तक्रार मी कुणाकडे घेऊन जाऊ..
 टेबलावरचे तुकडे वाऱ्याच्या झुळूकीने उडू लागतात..


संतोष सेलूकर
परभणी

शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांची शाळेला भेट

आज दि.15आॅक्टो20 गुरूवार रोजी 
🏵️🏵️🏵️*मा.*
*शिक्षणाधिकारी (प्रा).डाॅ सुचिता पाटेकर मॅडम*
 यांनी बलसा ता. पूर्णा येथे जि.प.शाळेला दु.
 3:00 वा.भेट दिली.सोबत 
*विठ्ठल भुसारे* *उप शिक्षणाधिकारी* जि.प.परभणी*हे होते.याप्रसंगी लाॅकडाऊन काळातील शिक्षण व उपक्रमांचा आढावा घेतला.मुलांशी संवाद साधला.सत्यपाल नाटकर व गायत्री डुबे या दोन विद्यार्थ्यांना मॅडमतर्फे  डिक्सनरी बक्षिस म्हणून दिली.मुलांचे भरभरून कौतुक केले.केंद्रस्तरीय आॅनलाईन क्लास बद्दलही मॅडमला माहिती दिली.बलसा शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती मॅडमला देण्यात आली.कन्हेया व सत्यपाल यांनी छान असे पुस्तक परीक्षण सादरीकरण केले.लगेच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुलांशी संवाद साधताना तळागाळातील विद्यार्थ्यांबद्दल तळमळ आणि शिक्षकांना कामासाठी प्रोत्साहन ह्या बाबी मॅडमच्या बोलण्यातून  सतत जाणवत होत्या.अतिशय प्रेरणादायी अशी आजची भेट ठरली.बलसा शाळेला यापूर्वी *मा.पृथ्वीराज बी.पी* सिईओ परभणी यांची 2018 मध्ये झालेली भेट अशीच अविस्मरणीय ठरली होती.त्याप्रमाणेच ही पाटेकर मॅडमचीही शाळा भेट मुलांच्या लक्षात राहिली.
याप्रसंगी कुंडलिक कांबळे सर,काळवीट मॅडम यांनी आॅनलाईन क्लास घेत असल्याची माहिती दिली.एकंदर मॅडम च्या आणि भुसारे साहेबांच्या भेटीमुळे नव्याने कार्य करण्याची उर्जा मिळाली.धन्यवाद

शब्दांकन
*संतोष सेलूकर*
मु.अ.बलसा ता.पूर्णा
जि.परभणी
आज दि.15आॅक्टो20 गुरूवार रोजी 
🏵️🏵️🏵️*मा.*
*शिक्षणाधिकारी (प्रा).डाॅ सुचिता पाटेकर मॅडम*
 यांनी बलसा ता. पूर्णा येथे जि.प.शाळेला दु.
 3:00 वा.भेट दिली.सोबत 
*विठ्ठल भुसारे* *उप शिक्षणाधिकारी* जि.प.परभणी*हे होते.याप्रसंगी लाॅकडाऊन काळातील शिक्षण व उपक्रमांचा आढावा घेतला.मुलांशी संवाद साधला.सत्यपाल नाटकर व गायत्री डुबे या दोन विद्यार्थ्यांना मॅडमतर्फे  डिक्सनरी बक्षिस म्हणून दिली.मुलांचे भरभरून कौतुक केले.केंद्रस्तरीय आॅनलाईन क्लास बद्दलही मॅडमला माहिती दिली.बलसा शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती मॅडमला देण्यात आली.कन्हेया व सत्यपाल यांनी छान असे पुस्तक परीक्षण सादरीकरण केले.लगेच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुलांशी संवाद साधताना तळागाळातील विद्यार्थ्यांबद्दल तळमळ आणि शिक्षकांना कामासाठी प्रोत्साहन ह्या बाबी मॅडमच्या बोलण्यातून  सतत जाणवत होत्या.अतिशय प्रेरणादायी अशी आजची भेट ठरली.बलसा शाळेला यापूर्वी *मा.पृथ्वीराज बी.पी* सिईओ परभणी यांची 2018 मध्ये झालेली भेट अशीच अविस्मरणीय ठरली होती.त्याप्रमाणेच ही पाटेकर मॅडमचीही शाळा भेट मुलांच्या लक्षात राहिली.
याप्रसंगी कुंडलिक कांबळे सर,काळवीट मॅडम यांनी आॅनलाईन क्लास घेत असल्याची माहिती दिली.एकंदर मॅडम च्या आणि भुसारे साहेबांच्या भेटीमुळे नव्याने कार्य करण्याची उर्जा मिळाली.धन्यवाद

शब्दांकन
*संतोष सेलूकर*
मु.अ.बलसा ता.पूर्णा
जि.परभणी

कविता माझा परभणी जिल्हा

*माझा परभणी जिल्हा*

माझ्या परभणी जिल्ह्याला, अजिंठ्याचा डोंगर माथा
झाडाझुडपांनी नटला इथे बालाघाटाचा पायथा

साऱ्या जगाताचीआई,वाहे गोदामाई भरून
जनाबाई संगे पांडुरंग देई दळण करून

पूर्णा दुधना चे पाणी मळे पिकवी भरात
कृषी विद्यापिठाचे धडे माती गिरवी जोरात


नरसिंहाच्या पोखरणीला भेटे साईबाबाची पाथरी
दर्गा सामावून घेतो जाती-धर्माच्या चादरी


वीज पुरविते आम्हा सिद्धेश्वर, येलदरी
जैन मंदिराचे वैभव नवागड ,नेमगिरी

मुदगलेश्वर स्थान हे वसे आमच्या मनात
जांभूळ बेटाचे नाव  राहे अमर या वनात

नका मानू उपेक्षित हिरे येथले अनमोल
माती थोर इथली ,काळी जमिन खोल

*संतोष सेलूकर*
परभणी 
७७०९५१५११०

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच


शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो 
ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पानं 
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या
अस्फुट चित्कांरांना 
किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी लटकलेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची निरागस अक्षरे 
शिक्षक नसतो कधीच बिचारा
तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा त्याच्याच स्वामीत्वाने महत्व येत असते शाळेला 
तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ नखशिखान्त अंधार भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून सूर्याचं तेज बाहेर काढणारा
तो समाज सुधारक क्रांती कारकही तोच कित्येक चेतनांना पाठबळ असते त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे 
शिक्षकाला जपावी लागतात कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाडआणि आकार द्यावा लागतो एका मुक्त पणे बागडणाऱ्या
निराकार चैतन्याला
...कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आतनिर्ममपणे...कधी अंधार ही प्यावा लागतो बिनबोभाटपणे 
तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर 
त्याच्या सोबतीला असतेच की खडूची धारदार तलवार अन फळ्याची ढाल असते पाठीशी 
विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल.
अन तेंव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल
संतोष सेलूकर
परभणी
७७०९५१५११०























































































































































































































कविता. कवी म्हणजे...

*कविता*
*कवी म्हणजे....*

कवी म्हणजे, कवी म्हणजे,कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो 

कधी गाणारा गवई असतो तर कधी 
उपदेश करणारा मौलवी असतो

कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो.
ग्रहता-यात चमकणारा रवी असतो


शहाणा म्हणावं तर वेड्या धुंदीत राहतो 
वेडा म्हणावं तर शहाणपणाच्या गोष्टी करतो 
कधी कधी तर शेकड्यास सवई असतो 

कवी म्हणजे, कवी म्हणजे,कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो.

कविला नसतात कधी नाती आपली- परकी काही 
प्रत्येक संवेदनेशी असते त्याने नाळ  जोडलेली  
कवी म्हणजे शब्द लेकरांची आई असतो.

कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो.

*संतोष सेलुकर* *परभणी*

AUGUST SHIKSHAN PARISHAD

शिक्षण परिषद केंद्र - कें.गणपूर. 
माहे:- आॅगस्ट
दि.13/08/2020 
अहवाल
🎤प्रास्ताविक. 

 ☘️संजय कांबळे केंद्रप्रमुख ,के प्रा शा गणपुर यांनी केले.

प्रमुख मार्गदर्शक

☘️प्रमुख उपस्थिती.मा.साबळे डी.डी.ग.शि.अ .पूर्णा☘️


☘️ विषय सहाय्यक श्रीमती भरोसे मॅडम बी.आर.सी.पूर्णा
यांनी दिनदर्शिकेचा वापर सर्वांनी करण्याबाबत .आवाहन केले. 
विजय माने ग्यानप्रकाश फाउंडेशन यांनी पालकाच्या सहकाऱ्यांनी मुलांचे अध्ययन होऊ शकते . असा विश्वास आपल्या वक्तव्या मधून सर्व शिक्षकांना दिला.

गट - 1 इ.1ली ते 5 वी
वेळ 11:00 ते 12:45

☘️सी.आर.जी.
1) मराठी - रुपाली आढाव यांनी शिक्षण परिषदेत प्रथमच आपला विषय मांडला त्याबद्दल केंद्रप्रमुख व सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
2) गणित - कुंडलिक कांबळे यांनी covid-19 या काळातील त्यांचे अध्यापनातील अनुभव व व विविध उदाहरणे देऊन गणित विषयाचा माहे ऑगस्ट चा अभ्यासक्रम व त्याची अंमलबजावणी याबद्दल विवेचन केले
3) इंग्रजी - मसारे मॅडम यांनी इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवता येतो हे स्पष्ट केले
4) प.अभ्यास -1 -महेश पवार यांनी आपले शालेय अनुभव व परिसर भाग 2 परिसर यांची सांगड घालून सहज शिक्षणातून मुले शिकतात याबद्दल सांगितले
5) प.अ.-2 -गर्दसवार मॅडम यांनी इतिहास कथन पद्धतीने व पालकांकडून मुले शिकू शकतात याबद्दल सांगितले

*गट 2 - इयत्ता 6 ते 8 दुपार सत्र
मार्गदर्शन
☘️साधनव्यक्ती व्यंकट रमण जाधव यांनी दुपार सत्रात मार्गदर्शन केले
 
सी. आर.जी.
1) मराठी - दिलीप शृंगारपुतळे सर मराठी साहित्य व कविता यांची ओळख करून देण्यासाठी पालकांची मदत घेता येते हे स्पष्ट केले
2) गणित - विलास कांबळे यांनी गणित विषय आपण मुलांपर्यंत वेगवेगळ्या प्रात्यक्षिक द्वारे सोपा करून समजावून देऊ शकतो
3) इंग्रजी -सेलूकर सर इंग्रजीचा वगळलेला अभ्यासक्रम स्पष्ट केला व काही इंग्रजीच्या कृतीबाबत माहिती दिली
4) विज्ञान -दिपक शिंदे यांनी छोट्या प्रयोगाद्वारे विज्ञान विषय मुलांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवता येतो हे स्पष्ट केले.
5) सा.शास्त्र नागनाथ बिबेकर यांनी भूगोल विषय व दैनंदिन जीवन यांची सांगड घालता येते व मुलांचे  अध्ययन घडते हे स्पष्ट केले.
6) तंत्रस्नेही - बालाजी कदम सर यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले अध्ययन-अध्यापन सुलभ कसे करता येईल याबद्दल आपल्या विषयाची मांडणी केली.
शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक झुम वर उपस्थित होते व अत्यंत खेळीमेळीच्या व आनंदाच्या वातावरणामध्ये ही शिक्षण परिषद संपन्न झाली.केंद्रप्रमुख संजय कांबळे यांनी प्रशासकीय सूचना दिल्या व आपल्या केंद्राची यापुढील काळातील वाटचाल कशी असेल या बद्दल दिशा निश्चित करुन सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण न्यावे असे आवाहन केले.
शब्दांकन
संतोष सेलुकर प्रा.शा.बलसा

टिली मिली कार्यक्रम

*आज दिनांक 31/07/ 2020 रोजी बलसा गावामध्ये टिली मिली या शैक्षणिक कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व तसेच वेळ लक्षात राहावी यासाठी गावातील मुख्य ठिकाणी भिंतीवर कार्यक्रमाचे वेळापत्रक चिटकवले याप्रसंगी सुरेशराव डुबे शा.व्य.स अध्यक्ष व पालक ज्ञानेश्वर शिंदे यांनी सहकार्य केले व या निमित्ताने पालकांना भेटून या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले  सर्वांनी हा कार्यक्रम नियमित पहावा यासाठी आवाहन केले यासाठी शाळेतील तळमळीचे शिक्षक कांबळे सर यांच्याबरोबर गृहभेटी दिल्या मुलांच्या शिक्षणातील अडचणी समजून घेतल्या.शिक्षणाचे वेगवेगळे स्रोत आपल्या विद्यार्थ्यानां कसे उपलब्ध होतील याबाबत गावक-यांशी चर्चा केली.अनेक गावकरी व पालक सहकार्य करत आहेत कुणी आपला मोबाईल एक तास दुस-यासाठी देत आहे.मारोती डुबे या मुलांने आपला मोबाईल आपल्या शेजारील मुलांसाठी एक तास उपलब्ध करून दिला धन्यवाद मारोती डुबे  यांना आपले हे योगदान जि.प.शाळा कधीही विसरणार नाही. काही पालक टि.व्ही वरील कार्यक्रम मुलांसाठी लावून देत आहेत व आपल्या शेजारच्या मुलांना ज्यांच्या घरी टि.व्ही नाही त्यांना शिक्षण मिळत आहे हे कार्य ही खूप मोलाचे आहेत अशाच प्रकारे जर गावातील सर्व टि.व्ही मोबाईल धारक यांनी मदत केली तर बलसा गावातील आॅनलाईन शिक्षण नक्कीच यशस्वी होईल.असेच कार्य इतरांनीही करावे हीच अपेक्षा .मला खात्री आहे कोणीही पालक या कामाला नाही म्हणणार नाही धन्यवाद*
शब्दांकन
*संतोष सेलूकर*
*मु.अ.बलसा*


माझी कविता किशोर मासिकामध्ये आली होती
तो अंक आज ऑनलाईन सापडला
खूप आनंद झाला










तीन प्रतिक्रीया

तीन प्रतिक्रीया
एके दिवशी सकाळच्या उन्हात माखलेला
एक जण भेटला ओळखीचा वाटला म्हणून
ख्याली-खुशाली घेतली तर म्हणाला,
माहीत नाही मजला
मी जगलो कसा अन मेलो कसा
आलो तसाच गेलो
ना वाटले जगावे ना वाटले मरावे


त्याच विचार चक्रात गुंतून राहीलो
दुपार होईपर्यंत
तोच रस्त्यावरून जाणारा दुसरा एक जण
बोलता बोलता म्हणालादिसत नसले जरी
मृत्यूच्या गावाट घर माझे;
याचा अर्थ जीवनाच्या गावात माझे
वास्तव्य आहे असा होत नाही

विचार चक्राने मग तर अधिकच
वेग घेतलासावल्या विखरून गेल्या
पक्षी घरट्याकडे परतायला लागलेले.
नदीच्या काठावर पाण्यात पाय सोडून
बसलेला एक जण दिसला;
तसा माझ्याकडे पाहून हसला
हसत हसतच म्हणाला, “जगतो असा मी की मृत्यूसही वाटते जगावे
धुंद होऊन जगातल्या कणकणात उरावे

संतोष सेलूकर


परभणी 

सामान्य माणूसच माझ्या लेखनाची प्रेरणा'-

*'सामान्य माणूसच माझ्या लेखनाची प्रेरणा'- *चित्रपट गीतकार* *बाबासाहेब* *सौदागर*.
दि.11/08/19 पेठशिवणी ता.पालम येथे विठोबा पाटील वाडेवाले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय गीतकार पटकथा लेखक बाबासाहेब सौदागर यांच्या शुभ हस्ते ग्रामीण साहित्यिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात बालाजी जाधव अंबड ,अनिता यलमट्टे उदगीर ,वसुंधरा सुत्रावे नांदेड यांचा समावेश होता. प्रास्ताविक शंकर वाडेवाले प्रसिध्द ग्रामीण कवी यांनी केले.मा.बाबासाहेब सौदागर यांनी आपला स्वतःचा संपूर्ण जीवनप्रवास लोकांसमोर मांडला.चित्रपट गीत लेखन करतांना आणि एकंदरच स्वतःचे स्थान निर्माण करतांना किती संघर्ष करावा लागतो हे सांगताना तर अगदी रसिकांचे डोळे पाणावले.ते म्हणाले ,"की ऐन संक्रांतीच्या दिवशी‌ पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून मी गाणं लिहायला कोल्हापूर कडे निघालो.तिथे जगदीश खेबुडकर गाणं जर त्यांना चांगलं वाटलं नाही तर तसाच कागद फाडून तोंडावर फेकतात असे मला कळले होते.म्हणून त्यांच्या समोर जाण्यांची हिम्मत होत नव्हती. मला एक अभंग लिहायला सांगितला.मी एक छान अभंग लिहून खेबुडकरांकडे गेलो.मनात खूप भीती होती.त्यांनी तो अभंग वाचला अन् म्हणाले मला माझ्या गादीचा वारसदार आज मिळाला.लिहीत रहा असा आशीर्वाद दिला. आता १०० पेक्षा अधिक चित्रपटांना मी गाणी लिहीली आहेत. सत्ताधिश चित्रपट स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला सुद्धा माझीच गाणी आहेत,हे सांगितल्यावर तर रसिकांनी त्यांना गाणं ऐकवण्याचा आग्रहच
               धरला.लगेच त्यांनी मोबाईल सुरू केला. बोलत होते,मध्ये मध्ये स्वत:चे संघर्षमय जीवन व्यक्त करत होते. पाठीवर झेललेले प्रहार अन् मग कसे पडले गळ्यात हार हे ही त्यांनी उलगडून सांगितले.बाबासाहेब सौदागर म्हणजे मूर्तीमंत प्रतिभेचा झराच जणू.सारं काही सोसून आणि रापून त्यांच्या प्रतिभेला अशी काही धार आलेली आहे की लावणी असो किंवा अभंग असो नाही तर असू दे चित्रपट गीत अथवा मालिकेचे गीत तेवढ्याच निष्ठेने ते लिहीतात.त्यांचे शब्द रसिकांच्या मनाचा ठाव घेतात.त्यांच्या काव्यप्रतिभेला कोणीही सलाम केल्याशिवाय राहत नाही.बाबासाहेब सौदागर आणि आम्ही शेतशिवार प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते दिवसभर सोबत होतो.त्यांच्या गाण्यातला सच्चेपणा त्यांच्या वागण्या बोलण्यातून ओघळावा त्याप्रमाणे ते अगदी सहज ग्रामीण शेतकरी आणि कामकरी लोकांशी संवाद साधत होते.सामान्य माणूसच माझ्या लेखनाची खरी प्रेरणा आहे हे सांगायला सुध्दा ते विसरले नाहीत.चित्रपट गीतकार म्हणून कुठलाच मोठेपणा न मिरवता भरभरून ते लोकांशी बोलत होते.स्वत:च्या वाट्याला आलेले कटू अनुभव सुद्धा त्यांनी समर्थपणे पेलले परंतु कधी निराश होऊन नशापाणी केले नाही .काव्याची नशा आशा प्रकारे होती की सारं काही त्यामुळंच घडलं,नोकरी सोडून काव्यलेखन करून आपण स्वत:चे कुटूंब चांगल्या प्रकारे चालवू शकतो हा आत्मविश्वास घेऊन ते गीतलेखनाकडे वळले.आज १०० पेक्षा अधिक चित्रपटाला त्यांनी गाणी लिहीली असून पटकथा लेखन ही केले आहे. शंकर वाडेवाले दादा असा वारंवार उल्लेख करत करत ग्रामीण कवितेवर असलेले त्यांचे प्रेम शब्दाशब्दांमधून दिसून येत होते.जेवढी त्यांची गीतलेखनाची प्रतिभा विलक्षण आणि सच्चेपणाची आहे तेवढाच त्यांच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त होणारा सच्चेपणा विलक्षण वाटतो.स्वत:ची आजी ओव्या गाऊन नवनिर्मीती करायची आणि याच संस्कारातून मी कविता लिहू लागलो.अन्यत:आमच्या घरात कवितेला स्थान नव्हते.शेतीत आईला मदत करत करत सर्व भावंडांचे शिक्षण केले.बहिणीच्या लग्नासाठी स्वत: चा काहीही विचार न करता साटे- लोटे लग्न करण्याचा प्रसंग ही त्यांनी बोलतांना सांगितला. असा हा प्रतिभावंत अस्संल ग्रामीण कवी गीतकार माणूस ज्याला विक्रम गोखलेसारख्या दिग्गंज कलाकाराने हॅट्सऑफ केले.खरोखरंच अतिशय मनस्वी कलावंताला भेटून आम्हाला एखाद्या उंच शिखरावर जाऊन दिव्य काही तरी कामगिरी केल्यासारखी अनुभूती आली तर
धन्यवाद!
शब्दांकन
*संतोष सेलूकर*
परभणी
७७०९५१५११०