बातम्या,

शिक्षण परिषद के.प्रा.शा.गणपूर. *के.प्रा.शा.गणपूर केंद्रस्तरीय शिक्षण परिषद* दि.१७ ऑक्टोबर २०२२ सोमवार रोजी के.प्रा.शा.गणपूर येथे शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 📔*प्रास्ताविक* संजय कांबळे , केंद्रप्रमुख गणपूर‌ यांनी केले. डाॅ.प्रल्हाद खुणे प्राचार्य डायट परभणी , प्रा.अनिल जाधव अधिव्याख्याता डायट परभणी विशाल बडे सर ग्यान‌ फाउंडेशन यांनी शिक्षण परिषदेला भेट दिली. या प्रसंगी अनिल जाधव यांनी अध्ययन निष्पत्ती वर सर्व शिक्षकांनी काम करणे गरजेचे असून अतिशय दुर्गम भागात या ठिकाणी खूप चांगले काम होत आहे या बद्दल कौतुक ही केले. त्यानंतर प्रल्हाद खुणे यांनी शिक्षकांना अध्यापनात खूप आनंद मिळत असतो.आईपेक्षाही बालक जास्त आपल्या शिक्षक शिक्षिकांचे ऐकतो ही अत्यंत आनंदाची बाब आहे. खालील विषय पत्रिकेनुसार सी.आर. जी.यांनी आपले विषय शिक्षकांसमोर मांडले. *विषय: हॅपीनेस करीक्यूलम प्रशिक्षण*. 📗 *सजगता* -डाॅ.संतोष सेलूकर 📘 *कथा चिंतन* - सौ. प्रतिमा मसारे 📙 *कृती*- श्री नागनाथ बिबेकर 📕 *अभिव्यक्ती*- -डाॅ.दिलीप शृंगारपुतळे केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांनी शिक्षण परिषदेला चांगला प्रतिसाद दिला.शेवटी सर्वांचे आभार व्यक्त‌ करुन शिक्षण परिषद संपन्न झाली. 🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️