आज दि.15आॅक्टो20 गुरूवार रोजी
🏵️🏵️🏵️*मा.*
*शिक्षणाधिकारी (प्रा).डाॅ सुचिता पाटेकर मॅडम*
यांनी बलसा ता. पूर्णा येथे जि.प.शाळेला दु.
3:00 वा.भेट दिली.सोबत
*विठ्ठल भुसारे* *उप शिक्षणाधिकारी* जि.प.परभणी*हे होते.याप्रसंगी लाॅकडाऊन काळातील शिक्षण व उपक्रमांचा आढावा घेतला.मुलांशी संवाद साधला.सत्यपाल नाटकर व गायत्री डुबे या दोन विद्यार्थ्यांना मॅडमतर्फे डिक्सनरी बक्षिस म्हणून दिली.मुलांचे भरभरून कौतुक केले.केंद्रस्तरीय आॅनलाईन क्लास बद्दलही मॅडमला माहिती दिली.बलसा शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती मॅडमला देण्यात आली.कन्हेया व सत्यपाल यांनी छान असे पुस्तक परीक्षण सादरीकरण केले.लगेच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुलांशी संवाद साधताना तळागाळातील विद्यार्थ्यांबद्दल तळमळ आणि शिक्षकांना कामासाठी प्रोत्साहन ह्या बाबी मॅडमच्या बोलण्यातून सतत जाणवत होत्या.अतिशय प्रेरणादायी अशी आजची भेट ठरली.बलसा शाळेला यापूर्वी *मा.पृथ्वीराज बी.पी* सिईओ परभणी यांची 2018 मध्ये झालेली भेट अशीच अविस्मरणीय ठरली होती.त्याप्रमाणेच ही पाटेकर मॅडमचीही शाळा भेट मुलांच्या लक्षात राहिली.
याप्रसंगी कुंडलिक कांबळे सर,काळवीट मॅडम यांनी आॅनलाईन क्लास घेत असल्याची माहिती दिली.एकंदर मॅडम च्या आणि भुसारे साहेबांच्या भेटीमुळे नव्याने कार्य करण्याची उर्जा मिळाली.धन्यवाद
शब्दांकन
*संतोष सेलूकर*
मु.अ.बलसा ता.पूर्णा
जि.परभणी