मा.अंजलीताई गंगाप्रसाद आनेराव यांनी भेट दिली.प्राथमिक वर्गात आलेल्या मुलांमुलींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. एक डिसेंबर पासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या शाळा सुरु झाल्या आहेत.पाचवी ते सातवीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले आहेत.शिक्षण विभागाने सर्व खबरदारी घेत प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत कळविले होते त्यानुसार मा.सभापती महोदया यांनी शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.वारंवार हात धुणे,मास्क वापरणे,सॅनिटायजरचा वापर करणे याबाबत विद्यार्थ्यांना सूचना केल्या व नियमित शाळेत येण्याबाबत अवाहन केले.सोबत मा.शिक्षणाधिकारी( प्रा.)टी.एस.पोले यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना गणित विषयातील लसावी /मसावी सोप्या पध्दतीने कसा काढावा या बद्दल मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी शाळेत कोविड 19 चे नियम पालन करतात,हे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.सोबत पुर्णा गटशिक्षणाधिकारी पदाचा नुकताच पदभार घेतलेले बी.व्ही.कापसीकर यांनी ही विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.केंद्रप्रमुख संजय कांबळे यांनी ही शाळेत राबविलेल्या उपक्रमाची माहिती सभापती व शिक्षणाधिकारी यांना दिली.यावेळी परिसरात रांगोळी व वर्ग सजावट करुन शाळेत उत्साहाचे वातावरण तयार करण्यासाठी कुंडलिक कांबळे,संगिता कदम,कामाक्षी बंडाळे,सारिका काळवीट व मुख्याध्यापक संतोष सेलूकर यांनी प्रयत्न केले.