बलसा शाळेला वेळोवेळी मदत करणारे , सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट सू त्रसंचालन करणारे,बलसा येथील रहिवासी व जि.प.प्रा.शा.फुकटगाव शाळेचे कर्तव्यदक्ष शिक्षक श्री भागवत सुदामराव शिंदे सर यांना नुकताच राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्याऊ अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शिवाजी अंबादास डुबे तर या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मारोतराव काळे तसेच पालक उत्तमराव डुबे हे होते.या प्रसंगी सेलूकर एस आर यांनी भागवत शिंदे यांच्या शै.कार्याचा परिचय करुन दिला.शिंदे यांनीही सत्कारास उत्तर दिले.कार्यक्रमाचे आभार कुंडलिक कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.बंडाळे,सौ.कदम,सौ काळवीट व सर्व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.