‘उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या मराठी
विषयामधील स्वलेखन कौशल्यांचा अभ्यास’
संतोष राजेश्वरराव
सेलूकर
रिसर्चस्कॉलर, स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड email santosh.selukar@gmail.com
मार्गदर्शक
–
प्राचार्य व्हि.पी.मोरे ,शंकरराव सातव कॉलेज ऑफ
एज्युकेशन कळमनुरी जिल्हा हिंगोली.
|
|
·
INTRODUCTION:(11BOLD) प्रस्तावना :-
लेखन कौशल्य असे कौशल्य आहे की त्यातून व्यक्तीच्या
पूर्णत्वाचा आविष्कार लक्षात येतो.श्रवण भाषण व वाचनानंतरची मूलभूत कौशल्यातील अंतिम
पायरी म्हणजे लेखन कौशल्य होय. जसेच्या तसे पाहून लिहिणे म्हणजे अनुलेखन तसेच ऐकून
लिहिणे अर्थात श्रुतलेखन होय. आजच्या या संगणकाच्या
आणि डिजिटल युगात लेखन करणे ही बाब तर अत्यंत दुर्मिळ झालेली आहे.सर्व लोक टाईप करतात.पण
लेखन करणे आणि टाईप करणे यात खूप अंतर आहे.तुलनेने टाईप करणे लेखनापेक्षा सोपे आहे.याचाच
अर्थ असा होतो की स्वलेखन करणे ही बाब सर्व कौशल्यांपेक्षा अधिक गुंतागुंतीची आहे तसेच
प्रयत्नपूर्वक साध्य होणारी आहे.सहज साध्य होत नाही हे या ठिकाणी स्पष्ट होते.आपण सध्या
लॉकडाऊन मध्ये साधारणपणे दोन महिण्यापासून घरातच असून शाळा ,कॉलेज यासारख्या सर्व शिक्षण
संस्था बंद असून शक्य तेवढया मार्गाने डिजिटल माध्यमातून घरी राहून शिक्षण शिक्षण देण्याचा
प्रयत्न करत आहोत.स्वलेखन कौशल्य अर्थात मुलांने स्वत: कल्पना करून स्वनिर्मित कथा,कविता
इतर साहित्यप्रकार याव्दारे आविष्कार करणे याचा अभ्यास या प्रस्तुत संशोधनात संशोधकाने
केलेला आहे.याचा अर्थ डिजिटल युगाला विरोध आहे असा नसून विद्यार्थी हा स्वलेखन स्वत:
करून तो डिजिटल माध्यमाचा वापर प्रसिद्धीसाठी करणारच आहे.त्याला मार्गदर्शन डिजिटल
माध्यमाव्दारेच मिळणार आहे.परंतु मूळ लेखन मात्र विद्यार्थ्यांना स्वहस्ताक्षरातच करायचे
असून त्याची इमेज मात्र डिजिटल माध्यमाव्दारे पाठवायची आहे.या संशोधनात अशाच प्रकारे
विद्यार्थ्यांच्या कथा, कविता एकत्र करून त्याची इमेज फाईल बनवली आणि प्रसिद्ध केली.यामध्ये
स्वहस्ताक्षर,स्वकल्पना,स्वमांडणी, स्वविचार तसेच स्वप्रेरणा,स्वत:चा कल या बाबी वाचकाच्या
लक्षात आल्या.यावरून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज देखील येतो .विद्यार्थी
सुध्दा किती चांगल्याप्रकारे वाचक आणि लेखक होऊ शकतात याचा अनुभव ही हे संशोधन करातांना
आला.मुलांचे स्वलेखन वाचनीय व प्रभावी होऊन मुलांच्या स्वलेखनास चालना मिळवून देण्यासाठी
प्रस्तुत संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे.यापूर्वी
असा प्रयत्न फारसा कुणी केल्याचे आढळून येत नाही.नामदेव माळी (शाळकरी मुलांच्या
कविता) तसेच तृप्ती अंधारे (दफ्तरातल्या कविता) अशी दोन पुस्तके वगळता विशेष असे मुलांच्या कविता एकत्र करून प्रसिद्ध
करण्याचे काम कुणी केल्याचे आढळून येत नाही.त्यामुळे मुलांच्या कविता एकत्र करणे व
प्रसिद्ध करणे एवढाच प्रस्तुत संशोधनामागचा हेतू नसून त्यांच्यात स्वलेखन प्रेरणा
कशी निर्माण होते,एखाद्या घटनेकडे ती कशी पाहतात ?विचार, कल्पना, भावना,मांडणी कशी
अवगत होत राहते त्यात काही विशिष्ट टप्पे येतात.या सर्व गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास प्रस्तुत
संशोधनातून केला आहे.
स्वलेखन
अर्थात सृजनात्मक लेखन ही गोष्ट फक्त वर्गात पारंपारिक पध्दतीनेच शिकवावी लागते, या
गोष्टीला छेद देऊन प्रस्तुत संशोधन हे मुले स्वलेखनातून कसा आनंद मिळवतात स्वलेखनातून
त्यांचे सृजनशील शिक्षण कसे घडते याविषयी अभ्यासाने आणि मुलांच्या स्वलेखनावरून काही
निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत.त्यात स्वलेखन
शिकण्यासाठी पारंपरिक पध्दतीने वर्गात फेस टू फेस टू लर्निगची आवश्यकता नाही मुले ही
गोष्ट सहजपणे शिकू शकतात.हे अनेक लेखक आणि कवी यांच्या मुलाखतीतून लक्षात येते की ते
स्वप्रयत्नातून ते कसे लेखक झाले.लेखनातूनच व्यक्तिमत्त्व विकास होतो.संशोधकाने प्रस्तूत
संशोधकाने परभणी जिल्ह्यातील उच्चप्राथमिक वर्ग असणा-या 100 जि. प. शाळा रॅन्डम पध्दतीने
निवडल्या.त्यातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणीतील मुलांनी
सोडविलेल्या उत्तरपत्रिका एकत्र केल्या.तयात स्वलेखनावर आधारित स्वनिर्मित कथा व स्वनिर्मित
कविता ह्या दोन बाबी संशोधनासाठी उपयुक्त डाटा म्हणून घेतला.त्यात निकषानुसार किती
मुलांनी लेखन केलेले आहे.याचा अभ्यास केला स्वलेखनाचा अभ्यास करतांना अनेक सूक्ष्म
गोष्टीही पहायला मिळाल्या.विद्यार्थ्यांचे निरिक्षण किती चांगले असू शकते तसेच त्यांच्या
स्वलेखनावर त्यांच्या शिक्षक पालक यांचा किती प्रभाव असतो.तयासाठी शिक्षक म्हणून पालक
म्हणून त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे समजते.
शेवटी
असेच म्हणावे वाटते की धन्य ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहाळे.स्वलेखनातून संस्कार होतात.स्वलेखन म्हणजे व्यक्तिमत्त्वविकास होय
यामधून विद्यार्थ्यांचे आत्मबल वाढते,समस्या निराकरण, निर्णयक्षता,चिकीत्सक विचारसरणी,समीक्षणात्मक
दृष्टीकोण इ जीवनकौशल्ये ही स्वलेखनाबरोबरच विकसित होत जातात हे प्रस्तुत संशोधनातून
सिध्द होते.ह्या जीवनकौशल्यावरच तर पुढील त्यांचे आयुष्य भक्कमपणे आकार घेते.उच्च
प्राथमिक स्तरावर स्वलेखन कौशल्यांचा विकास अर्थात सृजनात्मक शिक्षणात फेस टू फेस लर्निगपेक्षाही
लर्न फ्रॉम होम ही संकल्पना चांगली यशस्वी होतांना दिसते.यात विद्यार्थ्यांच्या कडे
जरी प्रसिद्धीचे डिजिटल डिव्हाइस नसेल तरीही शिक्षकांच्या मदतीने प्रसिद्धी करता येते
व मुलांना त्या कौशल्याचा विकास करता येतो.स्वलेखन करण्यासाठी मुलांना पारंपारिक फेस
टू फेस मोड पेक्षाही लर्न फ्रॉम होम मोडव्दारे विनाआडथळा स्वलेखन कौशल्य अवगत करू शकतो.सृजनात्मक
शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वलेखन कौशल्याचा विकास करणे.यात केवळ आंतरक्रिया
मोबाइल,लॅपटॉप व इतर डिजिटल डिव्हाइस व्दारे होते.त्यात लिहिलेले निबंध,कथा,कविता यांच्या
इमेज रिड करणे व त्यावर त्यांना अभिप्राय देणे व
सुधारणा घडवून आणणे.
LITERATURE
REVIEW:
·
MATERIALS: साधने tools :-
संशोधनासाठी गृहीतकृत्याच्या आधारे माहिती गोळा
करण्यासाठी योग्य अशा साधनांची आवश्यकता असते. विश्लेषण व अर्थनिर्वचन करून
संशोधनाचे निष्कर्ष काढण्यासाठी गुणात्मक व परिणामात्मक अशा दोन्ही साधनांची गरज
असते. गुणात्मक माहितीबरोबरच संख्यात्मक माहितीही संशोधनासाठी उपयुक्त असते.
संशोधनासाठीची माहिती प्राप्त करण्यासाठी प्रस्तुत संशोधकांनी प्रश्नावली हे साधन
निवडले आहे. सदरील संशोधनाच्या उद्दिष्टानुसार प्रश्नावली हेच साधन विश्वासार्ह
आहे तसेच वैध साधन असून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या स्वलेखन कौशल्याबाबत माहिती
प्राप्त करून घेणे संशोधकांच्या दृष्टीने व्यवहार्य आहे. त्यामुळे प्रश्नावली तयार
करण्यात आली. प्रस्तुत प्रश्नावली विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांद्वारे पोचविण्यात
आली. लेखनावर आधारित चार शब्द देऊन कथा लेखन करणे, तसेच मुक्त कविता या प्रश्नांचा
समावेश करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांबाबत व्यक्तिगत माहिती जसे की
आवड व लेखनाबाबत समस्या अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता.
·
प्रश्नावली प्रश्नप्रकार :- मर्यादित वेळेचे बंधन नसलेली मुक्तोतरी
प्रश्नप्रकारातील प्रश्नावली एकूण प्रश्न संख्या 10 तसेच प्रश्नावली निवडक विद्यार्थ्यांना
देऊन त्यातील उणिवा दूर करून आवश्यक ते बदल त्यात करून व प्रमाणित व यथार्थ
करण्यात आली.
·
कविता
10 गुण, निकष संख्या 10
·
कथा
गुण 10 ,निकष संख्या 10
·
निबंध
10 गुण, निकष संख्या 10
·
लघुत्तरी
प्रश्न 7, गुण 20
·
एकूण
10 प्रश्न, 50 गुण
·
प्रदत्त
संकलन व विश्लेषण:- data
collection and anylysis
प्रस्तुत संशोधनासाठी प्रदत्त संकलनाचे काम
निवडलेल्या शाळांमधील शिक्षकांच्या मदतीने तयार केलेल्या व्हाट्सअप ग्रुप द्वारे
प्रश्नावली देण्यात आली. तसेच प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी देण्यात आला होता.
उत्तरे विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात फुल साइज A- 4 कागदावर लिहिण्याबाबत सूचना
देण्यात आली होती. लिहिलेली उत्तरपत्रिका
शिक्षकांच्या मदतीने इमेज स्वरूपात व्हाट्सअप द्वारे स्वीकारण्यात आली. त्यावर नाव
शाळा व आवश्यक माहितीसह सर्व प्राप्त माहितीचे विश्लेषण करण्यात आले माहिती
संकलनात विलंब तसेच प्रश्नावली न पोहोचणे, इमेज स्पष्ट न येणे, हस्ताक्षर न समजणे,
लेखनाबाबत उदासीनता, सूचना व्यवस्थित न वाचता गोष्ट तयार करणे, अर्धवट व संबंधित
प्रश्नांची उत्तरे देणे, या प्रकारच्या समस्या होत्या व त्यासाठी अधिक वेळ व परिश्रम
पूर्वक प्रयत्न करून त्यावर मात करण्यात आली
METHOD: व्यवहारात सर्वात प्रचलीत असलेली ही संशोधन पद्धती असून मराठी विश्वकोश
अनुसार 1961 सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक किंवा इतर क्षेत्रातील विविध समस्यांच्या
अभ्यासाकरिता सर्वेक्षण करून आकडेवारी व माहिती विशिष्ट तत्त्वानुसार प्रातिनिधिक
नमुना यांच्या स्वरूपात गोळा करण्याच्या व तिचे विश्लेषण करून त्यावर अनुमान व
निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला सर्वेक्षण म्हणतात. सर्वेक्षणात व्यक्तीचा स्वतंत्र अभ्यास केला जात नाही त्या -त्या गटाच्या
किंवा जनसंख्येच्या वैशिष्ट्यांचा एकत्रितपणे विचार केला जातो .
वर्णनात्मक संशोधनाच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे शोधावी
1) संबंधित शैक्षणिक समस्येबाबत आजची परिस्थिती काय
आहे ?
2) निश्चित अडचणी व त्रुटी उणिवा कोणत्या आहेत ?
3) मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध तज्ञांची मते
घेऊन व संशोधकाने स्वतःचे ज्ञान व अनुभव विचारात घेऊन समस्येवर कोणता उपाय शोधला?
·
सर्वेक्षण
पद्धतीत माहिती संकलित केली जाते तसेच त्यात प्रयोगशीलता व त्यातून अनुमान
काढण्याची प्रवृत्ती आढळते सर्वेक्षण म्हणजे प्रचलित तथ्यांचे संकलन, वर्णन, स्पष्टीकरण आणि मूल्यांकन होय.
·
वैशिष्ट्ये
1)मूलभूत स्वरूपाची माहिती जमा केली जाते.
2) आवश्यक माहिती प्रश्नावली व
कसोट्या सारणी या साधनाने जमा केली जाते
3)त्या माहितीचे योग्य पद्धतीने साधारणीकरण करून त्यातून सखोल संशोधनासाठी
अर्थनिर्वचन केले
जाते.
1)प्रस्तुत संशोधनात परभणी जिल्ह्यातील उच्च प्राथमिक
स्तरावरील विद्यार्थ्यांचे स्वलेखन सर्वेक्षण करून सद्यस्थितीचा आढावा घेतला असता
असे दिसते की जन प्रवाहाची प्रवृत्ती घेणे हा संशोधनाचा प्रमुख हेतू आहे त्यामुळे
या संशोधनासाठी सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग करण्यात आला.
2)प्रस्तुत संशोधनामध्ये विद्यार्थ्याचे स्वलेखन
सद्यस्थितीचा शोध घ्यावयाचा आहे शिक्षकांना हे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये
रुजविण्यासाठी काही समस्या आहेत का हे पाहण्यासाठी सर्वेक्षणा सारखी दुसरी उपयुक्त
पद्धती नाही.
3)स्थानिक परिस्थिती प्रश्नावली पडताळा सूची या
साधनाद्वारे समजून घेता येते त्यामुळे या संशोधनासाठी सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग
केला जातो.
4)प्रस्तुत संशोधनासाठी व्हाट्सअप ग्रुप च्या
माध्यमातून विद्यार्थ्यांना स्व लेखनाबाबत मार्गदर्शन करून त्यांच्या मनातील
स्वलेखन आची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी संच निर्मिती केली
संशोधन आराखडा
प्रथम स्वलेखन कौशल्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पायाभूत चाचणी च्या
उत्तरपत्रिका मधील स्व अभिव्यक्ती प्रश्नांची उत्तरे किती विद्यार्थ्यांनी सोडविली
आहेत त्याचा कच्चा डाटा शिक्षण विभागाकडून प्राप्त करून घेणे
·
प्राप्त
कच्चा डाटा वर्गीकृत करणे व त्याचे विश्लेषण करणे.
·
तयार
झालेल्या विश्लेषणावरून स्वलेखन कार्यक्रम संच विकसित करणे
·
इतर
साहित्यिक व शिक्षणतज्ञ ह्यांच्या मदतीने स्वलेखन कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया घेऊन
आवश्यक त्या सुधारणा करणे.
·
तीन
महिने दररोज प्रस्तुत संच व्हाट्सअप ग्रुप च्या द्वारे विद्यार्थी व शिक्षकांना
पर्यंत एक एक प्रकरण दररोज याप्रमाणे पोहोचविणे.
·
वेळोवेळी
सर्वमान्य असणाऱ्या लेखन व वाचन टिप्स ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत
पोहोचविणे.
·
स्वलेखन
प्रेरणा विद्यार्थ्यांना देण्यासाठी सक्सेस स्टोरीज विद्यार्थ्यांना शेअर करणे.
·
सातत्याने
पाठपुरावा करून लेखन कार्यशाळांमधून विद्यार्थी स्वलेखन कौशल्याबद्दल आवाहन करणे.
कार्यपद्धती
·
प्रथम
मुलांची सद्यस्थिती जाणून घेतली (आधार पायाभूत चाचणी उत्तरपत्रिका स्वअभिव्यक्ती बाबत प्रश्न)
·
नैसर्गिक
पद्धतीने मुले व्यक्त होण्यासाठी ग्रुप तयार करून प्रेरणादायक उदाहरणे देऊन
वातावरण तयार केले.
·
चार
शब्द देऊन त्यावर कथा तयार करणे व स्वनिर्मित कविता तयार करून स्वहस्ताक्षरात लेखन
करून विद्यार्थी आपले साहित्य इमेज स्वरूपात ग्रुप वर पाठवतील.
·
प्राप्त
स्वलेखन काळजीपूर्वक वाचून त्याची चार गटात निकषानुसार विभागणी केली जाते.
·
प्राप्त
साहित्याचे विशिष्ट विषयानुसार व दर्जानुसार वर्गीकरण करून त्या साहित्यातील
तांत्रिक चुका तसेच शुद्धलेखनाच्या उणिवा हायलाईट करून विद्यार्थ्यांना परत पाठवणे
व दुरुस्ती करून परत स्वीकारणे.
·
विद्यार्थ्यांनी
तयार केलेले सर्व लेखन इतर मुलांसाठी प्रेरणा म्हणून विविध डिजिटल माध्यमांचा वापर
करून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोचविले.
·
स्वलेखन
एकत्रित करून त्यांचे पीडीएफ बुक करून विद्यार्थ्यांपर्यंत ग्रुप द्वारे शेअर करून
विद्यार्थी प्रतिक्रिया संकलित केल्या.
·
प्राप्त
दर्जेदार कथा व कविता यांचा संग्रह करून प्रसिद्ध करणे व स्वलेखन कौशल्य बाबत किती
टक्के विद्यार्थी उत्तम लेखन करू शकतात याबाबत निष्कर्ष काढले.
·
स्वप्रेरणा,
अनुभव, प्रसंगावधान, सराव, वाचन, शब्दसंग्रह, विचार, मार्गदर्शन हे घटक लेखन
कौशल्यावर परिणाम करतात
·
सामान्य
मुले व बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक प्रभावी लेखन करू शकतात.
·
पुस्तकी
अनुभवापेक्षा खऱ्या जगण्यातील अनुभव व लेखनासाठी अत्यंत प्रभावी आहेत.
DISCUSSION:
फलिते आणि चर्चा : स्वलेखनाबाबत सद्यस्थितीचा
आढावा घेणे :- स्व लेखनाबाबत
सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पायाभूत
चाचणी मधील व लेखनकौशल्य बाबतच्या उत्तरांचे दोन प्रश्नांचे विश्लेषण पुढील
प्रमाणे आहे
ANALYSIS: सारणी सारणी क्रमांक 1 कार्यक्रम राबविल्यानंतर चा
तक्ता
1 क्रमांक 1 कथा वरून लक्षात येते की स्वलेखन कौशल्य बाबत
सद्यस्थिती बदलणे आवश्यक आहे. प्रश्न सोडविणा-यांची संख्या कमी असून त्यात वाढ होणे गरजेचे आहे.
सद्यस्थिती अत्यंत विदारक चित्र स्पष्ट करते. स्वलेखन प्रश्न अवघड असल्याचे
निरीक्षण देखील नोंदविले गेले आहे.
2 कविता:- वरील सारणी क्रमांक 1 वरून
लक्षात येते की स्वलेखन कौशल्य कविता बाबत सद्यस्थिती बदलणे आवश्यक आहे. प्रश्न सोडविणा-यांची संख्या कमी असून त्यात
वाढ होणे गरजेचे आहे. सद्यस्थिती अत्यंत विदारक चित्र स्पष्ट करते स्वलेखन,
कवितालेखन अवघड असल्याचे निरीक्षण देखील नोंदविले गेले आहे.
3 निबंध :- वरील सारणी क्रमांक 1 वरून लक्षात येते की स्वलेखन कौशल्य
निबंध बाबत सद्यस्थिती बदलणे आवश्यक आहे प्रश्न सोडविणा-यांची संख्या कमी असून त्यात
वाढ होणे गरजेचे आहे. सद्यस्थिती अत्यंत विदारक चित्र स्पष्ट करते स्वलेखन प्रश्न
निबंध लेखन अवघड असल्याचे निरीक्षण देखील नोंदविले गेले.
सारणी सारणी क्रमांक 2 कार्यक्रम राबविल्यानंतर चा
तक्ता
ANALYSIS:
१)
क्रमांक
1 कथा वरून
लक्षात येते की स्वलेखन कौशल्य बाबत सद्यस्थिती सकारात्मक बदलली आहे. प्रश्न
सोडविणा-यांची संख्या वाढली असून प्रस्तुत बदल हा मार्गदर्शक संच वापरल्यामुळे
स्वलेखन कौशल्य कथा लेखनात प्रगती झाली आहे
२)
क्रमांक
2 कविता वरून
लक्षात येते की स्वलेखन कौशल्य बाबत सद्यस्थिती सकारात्मक बदलली आहे. प्रश्न
सोडविणा-यांची संख्या वाढली असून प्रस्तुत बदल हा मार्गदर्शक संच वापरल्यामुळे
स्वलेखन कौशल्य कविता
लेखनात प्रगती झाली आहे
३)
क्रमांक
3 निबंध वरून
लक्षात येते की स्वलेखन कौशल्य बाबत सद्यस्थिती सकारात्मक बदलली आहे. प्रश्न
सोडविणा-यांची संख्या वाढली असून प्रस्तुत बदल हा मार्गदर्शक संच वापरल्यामुळे
स्वलेखन कौशल्य निबंध लेखनात प्रगती झाली आहे
FINDINGS: निष्कर्ष
1 )
उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या स्वलेखन कौशल्य सद्यस्थितीचा शोध घेतला असता
अधिकांश विद्यार्थ्यांना स्वलेखन कोशल्य अवगत नाही
2 )
उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या स्वलेखनात उणिवा आहेत.
3 )
उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये स्वलेखन कौशल्य रूजविण्यात शिक्षकांना आडचणी
आहेत.
4 )
उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या स्वलेखन कौशल्याबाबत त्यांच्या मनात भिती
आहे.
5)
मुलांच्या स्वलेखनास विविध डिजिटल माध्यमाव्दारे प्रसिद्धी दिल्यास त्यांच्यात आत्मविश्वास
वाढतो.
6 ) मार्गदर्शन
संचाचा वापर केल्यामुळे स्वलेखन कौशल्य विकसनात मदत होते.
RESULT:
उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या स्वलेखनासाठी
पुरेशा संधी व योग्य मार्गदर्शन
केल्यामुळे त्यांच्या स्वलेखनात सुधारणा
होते
RECOMMENDATIONS:
1
स्वलेखन
कौशल्याच्या विकासाकरिता विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आवश्यक आहे.
2
स्वलेखन
विकसन करिता स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात यावी.
Figures/
Tables/Charts: सारणी क्रमांक 1
अनुक्रमांक
|
परीक्षेत बसलेली
विद्यार्थी
|
चार शब्दा वरून कथा लेखन करणे हा प्रश्न सोडविलेली विद्यार्थी संख्या
|
चार शब्दा वरून कथा लेखन करणे हा प्रश्न न सोडविलेली विद्यार्थी संख्या
|
प्राप्त गुणांनुसार
वर्गीकरण
|
10 गुणांपैकी 7 पेक्षा
अधिक गुण प्राप्त विद्यार्थी संख्या
|
10 गुणांपैकी 7 पेक्षा कमी
गुण प्राप्त विद्यार्थी संख्या
|
10 गुणांपैकी 5 पेक्षा
अधिक गुण प्राप्त विद्यार्थी संख्या
|
10 गुणांपैकी 5 पेक्षा कमी
गुण प्राप्त विद्यार्थी संख्या
|
1 कथा
|
1357
|
878
|
479
|
249
|
346
|
196
|
87
|
टक्केवारी
|
64.70%
|
35.30%
|
28.36
|
39.41
|
22.32
|
9.91
|
2 कविता
|
1357
|
889
|
468
|
253
|
349
|
203
|
84
|
टक्केवारी
|
65.51%
|
34.49%
|
28.46
|
39.26
|
22.83
|
9.45
|
3निबंध
|
1357
|
906
|
451
|
226
|
412
|
217
|
51
|
टक्केवारी
|
66.76
|
49.78
|
24.94
|
45.47
|
23.95
|
5.63
|
Figures/
Tables/Charts: सारणी क्रमांक 2
अनुक्रमांक
|
परीक्षेत बसलेली विद्यार्थी
|
चार शब्दा वरून कथा लेखन करणे हा प्रश्न सोडविलेली विद्यार्थी संख्या
|
चार शब्दा वरून कथा लेखन करणे हा प्रश्न न सोडविलेली विद्यार्थी संख्या
|
प्राप्त गुणांनुसार वर्गीकरण
|
10 गुणांपैकी 7 पेक्षा अधिक गुण प्राप्त
विद्यार्थी संख्या
|
10 गुणांपैकी 7 पेक्षा कमी गुण प्राप्त
विद्यार्थी संख्या
|
10 गुणांपैकी 5 पेक्षा अधिक गुण प्राप्त
विद्यार्थी संख्या
|
10 गुणांपैकी 5 पेक्षा कमी गुण प्राप्त विद्यार्थी संख्या
|
1 कथा
|
1357
|
997
|
360
|
327
|
389
|
226
|
55
|
टक्केवारी
|
73.47%
|
26.53%
|
37.24
|
44.31
|
25.74
|
6.26
|
2 कविता
|
1357
|
1012
|
345
|
327
|
393
|
231
|
61
|
टक्केवारी
|
74.58%
|
25.42%
|
36.78
|
44.21
|
25.98
|
6.86
|
3निबंध
|
1357
|
1015
|
342
|
340
|
397
|
236
|
39
|
टक्केवारी
|
74.80
|
33.69
|
37.53
|
43.82
|
26.05
|
4.30
|
CONCLUSION
/ SUMMARY:
स्वलेखन कौशल्य विकास विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासाचा
भाग असून अभिव्यक्ती लिखित स्वरूपात असते त्यामुळें त्यात विविध कौशल्यांचा अंतर्भाव
होतो.ही सर्व कौशल्ये ही परस्परांवर अवलंबून असतात.त्यामळे स्वलेखन कौशल्य विकासासाठी
शिक्षकांचे प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती ही परिझाम करत असते.
·
REFERENCES:( APA / संदर्भ
(reference ) संदर्भ सूची :-
1) माळी नामदेव संपादन : शाळकरी मुलांच्या
कविता (कवितासंग्रह)
2) तृप्ती अंधारे : दप्तरातल्या कविता
( कवितासंग्रह)
3) आगलावे प्रदीप (2000) संशोधन पध्दती व तंत्रे विद्याप्रकाशन,नागपूर
4) जगताप ह.ना.(1994) प्रगत शैक्षणिक तंत्रविज्ञान,नूतन प्रकाशन पूणे
5) भितांडे वि.रा.(2006) शैक्षणिक संशोधन
पद्धती,नूतन प्रकाशन पूणे
6) आफळे आ.रा.(1978) शिक्षणाचे मानसशास्त्रीय
अधिष्ठाण,श्री विद्याप्रकाशन पुणे
7) संशोधनाची
पंधरा पुष्पे (ऑगस्ट 2003)संपदान समिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,
नाशिक