तीन प्रतिक्रीया
एके दिवशी सकाळच्या उन्हात माखलेला
एक जण भेटला ओळखीचा वाटला म्हणून
ख्याली-खुशाली घेतली तर म्हणाला,
“माहीत नाही मजला
मी जगलो कसा अन मेलो कसा
आलो तसाच गेलो
ना वाटले जगावे ना वाटले मरावे”
एक जण भेटला ओळखीचा वाटला म्हणून
ख्याली-खुशाली घेतली तर म्हणाला,
“माहीत नाही मजला
मी जगलो कसा अन मेलो कसा
आलो तसाच गेलो
ना वाटले जगावे ना वाटले मरावे”
त्याच विचार चक्रात गुंतून राहीलो
दुपार होईपर्यंत …
तोच रस्त्यावरून जाणारा दुसरा एक जण
बोलता बोलता म्हणाला “दिसत नसले जरी
मृत्यूच्या गावाट घर माझे;
याचा अर्थ जीवनाच्या गावात माझे
वास्तव्य आहे असा होत नाही ”
विचार चक्राने मग तर अधिकच
वेग घेतला… सावल्या विखरून गेल्या
पक्षी घरट्याकडे परतायला लागलेले.
नदीच्या काठावर पाण्यात पाय सोडून
बसलेला एक जण दिसला;
तसा माझ्याकडे पाहून हसला
हसत हसतच म्हणाला, “जगतो असा मी की मृत्यूसही वाटते जगावे
धुंद होऊन जगातल्या कणकणात उरावे”
संतोष सेलूकर
परभणी