*'सामान्य माणूसच माझ्या लेखनाची प्रेरणा'- *चित्रपट गीतकार* *बाबासाहेब* *सौदागर*.
दि.11/08/19 पेठशिवणी ता.पालम येथे विठोबा पाटील वाडेवाले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय गीतकार पटकथा लेखक बाबासाहेब सौदागर यांच्या शुभ हस्ते ग्रामीण साहित्यिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात बालाजी जाधव अंबड ,अनिता यलमट्टे उदगीर ,वसुंधरा सुत्रावे नांदेड यांचा समावेश होता. प्रास्ताविक शंकर वाडेवाले प्रसिध्द ग्रामीण कवी यांनी केले.मा.बाबासाहेब सौदागर यांनी आपला स्वतःचा संपूर्ण जीवनप्रवास लोकांसमोर मांडला.चित्रपट गीत लेखन करतांना आणि एकंदरच स्वतःचे स्थान निर्माण करतांना किती संघर्ष करावा लागतो हे सांगताना तर अगदी रसिकांचे डोळे पाणावले.ते म्हणाले ,"की ऐन संक्रांतीच्या दिवशी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून मी गाणं लिहायला कोल्हापूर कडे निघालो.तिथे जगदीश खेबुडकर गाणं जर त्यांना चांगलं वाटलं नाही तर तसाच कागद फाडून तोंडावर फेकतात असे मला कळले होते.म्हणून त्यांच्या समोर जाण्यांची हिम्मत होत नव्हती. मला एक अभंग लिहायला सांगितला.मी एक छान अभंग लिहून खेबुडकरांकडे गेलो.मनात खूप भीती होती.त्यांनी तो अभंग वाचला अन् म्हणाले मला माझ्या गादीचा वारसदार आज मिळाला.लिहीत रहा असा आशीर्वाद दिला. आता १०० पेक्षा अधिक चित्रपटांना मी गाणी लिहीली आहेत. सत्ताधिश चित्रपट स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला सुद्धा माझीच गाणी आहेत,हे सांगितल्यावर तर रसिकांनी त्यांना गाणं ऐकवण्याचा आग्रहच
धन्यवाद!
शब्दांकन
*संतोष सेलूकर*
परभणी
७७०९५१५११०