कविता

कविता
खूप झेलल्या अंगावरती या अज्ञानाच्या झळा
चलरे बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा

मनामनातून  फुलून येतो गणवेशाचा रंग
पाठीवरती लढण्या दफ्तर ढाल असावी संग
हिमालयाचे शिखर लावतो भिंतीवरच्या फळा
चलरे बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा

मनात माझ्या क्षणात येते लिहू लागतो कविता
चार ओळीच्या शब्दामधूनी अर्थ भेटतो पुरता
मनगंगेच्या तीरावरचा डोलत राही मळा
चलरे बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा

ज्ञान सांडता वेचून घ्यावा अमूल्य असा ठेवा
जरा निसटता हातून आमुच्या वाटत राही हेवा
भंगपावूनी मनात फुटते अज्ञानाची शीळा
चलरे  बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा 

संतोष सेलूकर
प्रा.प.जि.प.शाळा बलसा बु
ता.पूर्णा जि.परभणी
मो.7709515110
ई-मेल Santosh.selukar@gmail.com

कविता शिक्षकाची

शालेय गंमती जंमती….
“शाळा आमची आहे किती छान की आम्ही रोज शाळेत येणार
लिहूनी वाचूनी शिकूनी सवरूनी आम्ही मोठे होणार …….”  हो ..हो.. याच शाळेत आम्ही ही घडलो नि बिघडलो सुद्धा अरेच्या घ्‍डलो नि बिघडलो असे कसे शक्य आह…? आहे शक्य आहे. नाण्याच्या दोन बाजू जिथे सुख तिथे,दु:ख जिथे,जन्म तेथे मृत्यू,जिथे हसणे तेथे रडणे,येणे नि जाणे.
जिथे शाळा तिथे शिक्षक ,शिक्षक तिथे विद्यार्थी ,जिथे विद्यार्थी तिथे गंमतीजंमती आल्याच की माझी पहिली शाळा जि.प.शाळा एरंडेंष्वर ता.पुर्णा.काय सांगावे या शाळेबद्दल किती तरी गंमती जंमती रोज घडायच्या.तशी मी नुकतीच नवीन नौकरीला लागलेली आणि मध्यमवर्गीय कुटूबांतली एकुलते एक कन्या रत्न असलेली व माझ्या वडिलांची सावलीच जणू होते. मी पहिल्यांदा जेव्हा शाळेत गेले तेव्हा सर्वांनी माझं स्वागत केलं तो क्षण मी आजही विसरले नाही त्याबरोबरंच शाळेतल्या गंमती जंमती सुद्धा लक्षात आहेत तशाच.नव्हे मी त्या विसरूही शकत नाही.
एके दिवशी मी अचानक पहिलीच्या वर्गात गेले.मुले मला पाहताच घाबरली.काही मुले पाटी- लेखणी घेऊन बसली. पण काही मुले तर चक्क लेखणी खात असलेली मी पाहिली.मला ते चित्र नवीन होते.काही मुले उजळणी तर काही बाराखडी लिहिण्यात मग्न झाली.त्यत एका बावळट आणि गबाळा असणा-या मुलावर माझी नजर पडली.मला पाहून तो वर्गा बाहेर पळू लागला.मी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो बाहेरच पळण्यासाठी धडपडत होता.बाहेरच्या मुलांना तो काही तरी खुणवत वर्गाबाहेर पळून गेला. मी नवीनच होते तयाला पकडावं म्हटलं तर ते ही शक्य नव्हते. तो मलाच पळवायला लागला.असे रोजच घडू लागले.शेवटी मोठ्या वर्गातील मुलांच्या मदतीने मी तयाला पकडायला लावलेच एके दिवशी तर हा पठ्ठा़ खूप घाबरला.बाई मारतील म्हणून मग शाळेतच यायचा नाही.मग एके दिवशी मी त्याला प्रेमाने जवळ घेऊन समजावले मग थोडं थोडं माझं ऐकायला लागला.
मग त्याने नवीनच प्रकार सुरूवात केला.वर्गातील इतर मुलांच्या अंगावर खेळण्यातील खोटे साप,पाल,सरडे टाकून त्यांना घाबरावयाचा खेळ त्यांने सुरु केला.एकदा तर त्याच्या या नकली सापाला मी सुद्धा घाबरले.जेव्हा समजले हा साप खोटा आहे तेव्हा माझे मलाच हसू आवरता आले नाही.
एकदा काय झालं एक वटवाघुळाचं पिल्लूच आमच्या वर्गात आलं नि इकडून तिकडे घिरट्या घालू लागलं सर्व मुलं कावरी बावरी होऊन बघू लागली. कुणी म्हणत होते, “अबे टाळूला चिटकतंय ते..” मग काय सर्व मुले  घाबरून वर्गाबाहेर गेली आणि हा एकटाच वर्गात त्यासोबत घिरट्या घालत होता.मी हाश्य हुश्य करत कसे बसे त्याला वर्गाबाहेर काढले.तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.पुन्हा एक गंमत झाली.त्यांने वर्गात आल्या वडिलांचा मोबाईल आणला.मग काय? सर्व मुलं त्याच्याच मागे फिरत होती.पुन्हा एके दिवशी अशीच गंमत घडली. तेव्हा शाळेत अत्ताच्या सारखे संस्कार केंद्र नव्हती.गोंधळून जाऊ नका संस्कारकेद्र  म्हणजे शालेय शौचालय.पहिलीच्या मुलांना तर बाहेर जायचं सुद्धा कळत नाही.ती वर्गातच …. करतात.काही मुले बाहेर पउक्या जागेत जायची.मधूनच ओरडढत यायची की तिकडे भूत आहे.मग काय ?सगळा वर्ग घाबरून जायचा.तिकडे स्मशानभूमी होती त्यामुळे मुले आधीच या गोष्टीला भ्यायची.मग ओरडून सांगावे लागायचे नका जाऊ तिकडं म्हणून.मुलं कधी खेकड्याच्या मागे लागायची,कधी म्हशीच्या मागे धावायची,कधी माकडाच्या मागे लागायची, कधी तळ्यात तर कधी मळ्यात. एकाने तर शाळेत चक्क्ं सशाचे पिल्लूच आणले.मग काय वर्गात सगळे ससेच ससे.कधी कधी मुलांची शर्टाची बटणं खाली वर लागलेली असायची ते तसेच वर्गात यायचे मग आमची हसायची खूप मजाच मजा. कधी कधी वेगवेगळी चप्पल ,बुट घालून यायची तेंव्हाही खूप गंमत वाटायची की किती निरागस असतात ही लेकरं.शाहेजवळच्या विहिरीत चप्पल टाकायचे मुलं अन त्या निमित्ताने वाकून बघायचे.शाळेत कपाळावर वेगवेगळे आकाराचे गंध लावून येणारी काही मुलं फार गंममतीशीर होती मी दररोज त्यांचे निरिक्षण करायचे.
एकदा वर्गात बेंचवर एकाने फेविकॉल लावून ठेवला. त्याच्यावर एक जण बसला.उठायला गेला तर उठताच येईना.मग लागला रडायला.मग मी त्याची मदत केली तर त्याची पॅनटच फाटून गेली.मग तर अजूनच मोठ्याने रडायला लागला.अशा सतत गंमती जंमती माण्या वर्गात घडायच्या.मला या सतत स्मरणात आहेत.त्या आजही आइवल्या तरी मला हासू आवरता येत नाही.म्हणून माझी शाळा आणि माझे विद्यार्थी मला सतत काही तरी आनंदाचे क्षण देऊन जातात.हा आनंदाचा ठेवा असाच जपून ठेवावा आणि इतर मुलांसोबत शेअर करत रहावा त्यांनाही त्यांची गंमत वाटत राहते.
                       मंजूषा देवडे 
                                                  प्रा.शि.जि.प.शाळा देऊळगाव दुधाटे 
                                               ता पूर्णा जि.परभणी मो.नं.9765762562

उपसंपादक
संतोष सेलूकर परभणी 
मो 7709515110
Email- santosh.selukar@gmail.com


सर लेखिकेचा फोटो आणि संबधित फोटो सकाळी पाठवतो

यशोगाथा

         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलसा बु.

         यशोगाथा

शाळेचे नाव :- जिल्हा परिषद पा्रथमिक शाळा बलसा बु.

केंद्र - जि.प.प्रा.शा. गणपूर

मुख्याध्यापकाचे नाव : संतोष सेलूकर

      सहशिक्षक:- शाळेत कार्यरत शिक्षक संख्या – 05

 

*      बंडाळे के. एस.       कांबळे के. एस.

*      काळवीट एस. के.     कदम एस. बी.

 

            मार्गदर्शक

   ज्ञानोबा साबळे, गटशिक्षणाधिकारी पूर्णा

  श्री प्रभाकर भोसले विस्तार अधिकारी पूर्णा                                                     

  श्री संजय काशिनाथ कांबळे, केंद्रप्रमुख गणपूर

  श्री संदीप बळवंतकर मुअ केंद्रशाळा गणपूर

 

                  मा मुख्यकार्यकारी अधिकारी श्री बी.पी.पृथ्वीराज यांची शाळाभेट

 

 

शाळेची वैशिष्ट्ये

1)  मूल्यवर्धन जिल्हामेळाव्यात शाळेची निवड 

शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन च्या वतीने राबविण्यात येत असलेला मूल्यवर्धन कार्यक्रम शाळेत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये शाळेतील बालाजी  डुबे या वर्ग चौथीतील विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनमुळें झालेल्या बदलाबाबत मा. शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर  व मा. मुख्यकार्यकारी अधिकारी मा.बी पी पृथ्वीराज व शांतिलाल मुथ्था यांच्या  हस्ते जिल्हामेळाव्यात प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला ही शाळेच्या दृष्टीने अभिमानाची व गौरवाची बाब आहे.

      इयत्त सातवी वर्गातील गोविंद शिंदे या विद्यार्थ्यांने शाळेच्या आवारात सापडेलेली पाचशे रूपयांची नोट प्रामाणिकपणे मुख्याध्यापकाकडे जमा केली.शाळेच्या वतीने बक्षीस देऊन या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे ही जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजत आहेत हयाची ही पावतीच आहे.

2)  चला शिकूया प्रयोगातून विज्ञान कार्यक्रमातून वैज्ञानिक दृष्टीकोण

दर शनिवारी आयोजित चला शिकूया प्रयोगातून विज्ञान कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये  खूप बदल झालेले जाणवतात. दिनांक 28 फेंब्रुवारी 2020 रोजी  म्हणजेच विज्ञान दिनी मुलांनी शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनात इयत्ता 1 ली पासून सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व प्रदर्शन यशस्वी  केले. ग्रामीण क्षेत्रात उपलब्ध साहित्यापासून अत्यंत मोजक्या वेळात हे प्रयोग प्रदर्शनात ठेवल्यामुळे हे प्रदर्शन अत्यंत उल्लेखनिय असे ठरले या प्रदर्शनाचे उद्घाटन मा.केंद्रप्रमुख संजय कांबळे यांनी केले.मुलांनी अत्यं‍त उत्सहात या प्रदर्शनात सहभाग घेतला.

3)  गोष्टीमधून शालेय संस्कार

दररोज मुले गोष्टी ऐकण्यासाठी उत्सुक  असतात. हा मुलांचा स्वभाव गुणधर्मच आहे. विविध संस्कार कथा साहसकथा ,मूल्यकथा ,काल्पनिककथा ,विज्ञान कथा ,बोधकथा , इ मुलांना प्रचंड आवडतात.यातूनच मुलांचा भाषिक विकास व्हायला मदत होते. आहे त्यामुळे उपस्थिती ही वाढते व संस्कार होतात,शिवाय शिक्षक व विद्यार्थी नाते दृढ होण्यास मदत होते.आमचे विद्यार्थी कोणीही अधिकारी शाळेत भेटीला आले तर त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जातात.हा आत्मविश्वासाने या अशा विविध उपक्रमातून येतो.

4)  सहशालेय उपक्रम , बालकलामहोत्सव ,आनंदनगरी , शै सहल, हँगीग गार्डन

शाळेत वेळोवळी सहशालेय उपक्रमाचे आयोजन केले जाते.यात दरवर्शी आयोजित केला जलाणारा बालकला महोत्सव हा एक महत्वाचा कार्यक्रम असून संपूर्ण वर्षभर त्याची आठवण राहते तसेच संपूर्ण गावकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. त्यामुळे त्यांचा शाळेविषयीचा दृष्टीकोण ही बदलला आहे.खरं तर यापूर्वी असा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी सर्व गावक-यासमोर कधीच झाला नव्हता.तसेच पूर्वीच्या मुख्याध्यापकांना गावक-याच्या भितीमुळे असें आयोजन केले नाही पण आम्हाला गावक-याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला व सुंदर असा कार्यक्रम सादर करून सर्व गावकरी अगदी आनंदाने आमचे कौतुक करत राहिले.

    आनंदनगरीच्य माध्यमातून मुलांना श्रमप्रतिष्ठा ,स्वावलंबन व आर्थिक व्यवहार नफातोटा इ समजला . यावर्षी औरंगाबाद वेरूळ अजिंठा इ. व ऐतिहासमिक स्थळानां भेटी देण्यासाठी शाळेची सहल काढण्यात आली. यात ऐतिहासिक स्थळे पाहिल्यामुळे  सहल अविस्मरणीय ठरली .तसेच शाळेत रिकाम्या बॉटल्स मध्ये छोटी छोटी रोपे लावून प्रत्येक वर्गात हँगीग गार्डन बनवलें आहे.त्यात आम्ही पर्यावरणस्नेही वर्ग अशी कल्पना आम्ही मांडलेली आहे.

5)  लोकसहभागातून शाळाविकास 

शाळेसाठी गावाचा लोकसहभाग दरवर्शी वाढत आहे या वर्शी 40000/ देणगी गावक-याकडून प्राप्त झाली तसेच शेकहॅन्ड फाऊंडेशन परभणी कडून गरीब विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप तसेच सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

6)  दिव्यांग विद्यार्थी शाळेत येण्यात यशस्वी

अजूनही एक बदल आमच्या शाळेत असा झाला की इयत्ता चौथी वर्गातील करण दत्ता काळे हा दिव्यांग विद्यार्थी शाळेत येऊन बसू लागला.इंग्रजीच्या कवितांवर तो हावभाव करतो.ज्ञानेश्वर मांदळे हा शाळेला पाहून बाहेरूनच पळून जाणारा दिव्यांग विद्यार्थी आता शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमामुळे शाळेत पूर्ण वेळ बसण्यास शिकला. दिव्यांगाचा सहभाग असणारे विविध  उपक्रम शाळा राबविते .शाळेत दिव्यांग दिनाच्या दिवशी गावातील दिव्यांग भगवान डुबे यांची मुलाखत आम्ही आयोजित केली होती विद्यार्थ्यांनी त्यांना उत्स्फुर्तपणे प्रश्न विचारून आपली दिव्यागांप्रति असणा-या आपल्या मतामध्ये बदल केले. व पाय नसलेला व्यक्ति लौकिक अर्थाने स्वत:च्या पायावर कसा उभा आहे हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्यावर मुलांना दिव्यांग व्यक्तीचा आपण दूत व्हावे हे वेगळे सांगण्याची गरज पडली नाही. आपली दु:ख खूप लहान असतात पण आपण त्यांना खूप मोठे समजतो हे मुलांना यातून समजले .

मी चालत होतो रस्त्यातून अनवाणी

     डोळयात माझीया म्हणूनी आले पाणी

     रडणेच थांबले परंतु माझे

     माणूस उभा शौजारी पायच नव्हते त्याला.

हे ऐकल्यावर आपली दु:ख खूप लहान असतात पण आपण त्यांना खूप मोठे समजतो हे मुलांना यातून समजले.तसेच हा दृष्टीकोन बदल करण्यासाठी मोबाइल टिचर मुंढे बिआरसी पूर्णा तसेच माने सर यांचा ही सहभाग खूप मोलाचा होता                 .                                 .

7)  ग्यानप्रकाश फाऊंडेशनच्या सहकार्याने यशस्वी पालक सभा

ग्यानप्रकाश फाऊंडेशनच्या मदतीने गावात सायंकाळी सर्व पालकांच्या उपस्थितीत पालकसभा आयोजित करून शाळा व गाव यांच्यात समन्वय व सुसंवाद कसा ठेवता येईल याबाबत चर्चा झाली व पालकसभेतून अभ्यासाबाबत पालकांनी काय दक्षता घ्याव्या व पाल्यामध्ये प्रगती कशी करावी याचे मार्गदर्शन श्री कांबळे व श्री माने (ग्यानप्रकाश फाऊंडेशन )यांच्या माध्यमातून झाले.

8)  रात्र अभ्यास गटातून नियमित अभ्यासाच्या सवयी :- आमच्या शाळेत 25 अभ्यास गट असून ही मुले गटात अभ्यास करतात.सायंकाळी त्यांना गावातील अनेक माजी विद्यार्थी व पालक यांचे मार्गदर्शन लाभते.मुलांना या गटात बसून अभ्यास करण्याची चांगली सवय लागलेली आहे त्यामुळे त्यांच्या मनातील प्रश्न ते मित्राकंडून सोडवून घेण्यास मदत होते.यामुळे शाळेच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे.श्री बी. पी. पृथ्वीराज मा.मुख्यकार्यकारी साहेबांनी ही शाळेला भेट दिली होती प्रत्येक वर्गात मुलांशी त्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला होता.व समाधान व्यक्त केले होते.

9)  अध्ययन निष्पत्तीवर आधारित ऑनलाईन टेस्ट: - आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांचा वॉटस्अप ग्रुप केला आहे त्यावर विद्यार्थी ऑनलाईन चाचणी सोडवतात. मुलांना ऑनलाईन निकाल पाहिल्यावर खूप आनंद होतो.

10) डिजिटल शाळा :- अनेक उपक्रम शाळा सतत राबवित असते. शाळेचा ब्लॉग https://zpbalsaschool.blogspot.com/2016/02/ असून you tube चॅनल वर शाळेतील उपक्रमांचे तसेच पाठाचे व्हीडीओ अपलोड केलेले आहेत. उपक्रमशील असणारी आमची शाळा गुणवत्तेच्या दृष्टीने ही सतत दक्ष असते.We learn English कार्यक्रम ही अतिशय परिणाम कारक ठरत आहे.मुले या कार्यक्रमामुळे इंग्रजीमधून एकमेकांशी संवाद साधायला लागली आहेत.ही आमच्या शाळेसाठी एक जमेची बाजू आहे.सर्व शिक्षक एक टिमवर्क म्हणून काम करतात.त्यामुळे शाळेत अतिशय आनंददायी असे वातवरण असते.त्यामुळे आमचा ही उत्साह वाढतो.

 

शब्दांकन

संतोष सेलूकर

मु.अ.प्रा.शा. बलसा .बु

ता.पूर्णा जिल्हा परभणी

मो.9822826747

काही टेस्टमोज चाचण्या


माझा नवीन ENGLISH READING उपक्रम वर्ग सहावा दोन दोन मुलांचे गट करा.एकाने डोळे झाकून पुस्तका तील एका शब्दावर बोट ठेवा नंतर डेळे उघडा.तो शब्द वाचा. त्याचा सोबती तो शब्द बरोबर असेल तर सेक हँड करा . चुकला तर दुरूस्त करून परत वाचायचा

जागतिक दिव्यांग दिन ३ डिसेंबर
प्रज्ञांकुर ई मासिक परभणी जिल्हा मुखपत्र
प्रश्नमंजूषा प्रमाणपत्र
प्रज्ञांकुर ई मासिक परभणी जिल्हा मुखपत्र