5
- प्रज्ञांकूर (34)
- कविता (10)
- Dhanora shala vishesh (7)
- school photo (7)
- काही लेख (7)
- Zpps balsa (6)
- वैयक्तिक (5)
- शिक्षण परिषद (4)
- Kavita (3)
- साप्ताहिक शिक्षक ध्येय (3)
- सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषद १०-१२ जून २०२० (3)
- TAG (2)
- प्रश्नपत्रिका (2)
- बातम्या (2)
- बालमंडळ (2)
- शालेय पोषण आहार (2)
- READ AND LEAD (1)
- काही लेख (1)
- गुगल फॉर्म चाचणी (1)
- दिव्यांग दिन (1)
- पाठ्यपुस्तके 1 to 8 (1)
- प्रश्नपत्रिका (1)
- मूल्यवर्धन (1)
- यशोगाथा (1)
- शालेय पोषण आहार (1)
- शाळाभेट अहवाल (1)
READ AND LEAD
read and lead
My
name is --------.I am studing in 5 th standard
My
school name is z.p.p.s. balsa
My
father is farmer .
My
mother is house wife.
----------
and -------- are my brothers and sisters.I
go to school
regularly.
There is
a dog .
The
dog is running .
I like to play with dog .
I always
give my biscuits to dog .the dog barks and growl Dog is male
and bitch is
female .its young one is puppy.
Listen
to me.
This
is my English book.
I put my book in my school
bag. I read my english book
every day.
do
you like English ?
yes
sir , yes sir I
always like to read
English.
Banana is
very sweet .
I like
sweet fruits.
Fruits have
very attractive colours. it has
nice taste also .
Please, wash
the fruits with water
before eating. Always eat fresh
fruits .
Come with me . I
will show you my
classroom. This is my classroom. This is
a black board. this
is the chair. This
is a table. These are the
benches. These are charts.
We decorates our
classroom.we always keep our classroom
clean .
We are
boys . they are girls. We learn
together and play
together. We always take
care of each others. I
can sing a song.
I can dance. I
can run very fast. do
you like to dance ? yes sir ,yes sir
I like to
dance.
जेव्हा साहेब येतात
जेव्हा साहेब येतात……….
सकाळची साधारण आकराची वेळ…..जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा परिसर…..अभ्यासात आणि कृती उपक्रमांत विद्यार्थी मग्न…… तर शिक्षक शिकविण्यात दंग….
एवढयात गावक-यांचा भला मोठा लोंढा एका जीपच्या मागे शाळेकडे येत होत.पाहता पाहता ती जीप माझ्याच वर्गाच्या दारात येऊन थांबली.जीपमधून सन्माननीय सिईओ बी.पी.पृथ्वीराज साहेब खाली उतरले अन् थेट बाजूच्या सातवीच्या वर्गात गेले.सातवीचे वर्गशिक्षक भागाकाराचा सराव घेत होते.त्यांना बाजूला करत स्वत: सिईओ साहेबांनी खडू हातात घेऊन भागाकाराची काही उदाहरणे फळ्यावर लिहिली.त्यांची उदाहरणे फळ्यावर लिहिणे होत आहेत तो पर्यंतच काही चपळ विद्यार्थ्यांचे हात उत्तर सांगण्यासाठी वर सरसावलें. विद्यार्थ्यांची चपळाई पाहून सिईओ साहेबांची उत्सुकता वाढली.त्यांची अचूक उत्तरे पाहून साहेबांनी समाधान व्यक्त केले.
यानंतर साहेबांचा मोर्चा वळला तो माझ्या वर्गाकडे.एकाच खोलीत दोन वर्ग : तिसरा व चौथा. तिसरीची मुले इंग्रजी शब्दपटट्या वाचनाचा जोडीमध्ये सराव करत होती.तर चौथीची मुले इंग्रजीचा पाठ वाचण्यात दंग होती.वर्गात येताच साहेबांनी हिंदीमध्ये बोलण्यास सुरूवात केली. “कौनसी क्लास है ? क्या पढाई हो रही है ?” पण विद्यार्थ्यांकडून मात्र काहीच प्रतिसाद नाही.मग माझ्याच लक्षात आले की, हिंदी भाषा मुलांना काही समजत नाही.मी साहेबांना वर्गाची ओळख करून दिली.आणि मुले कोणता अभ्यास करत आहेत हे सांगितले.एवढयात माझी नजर वर्गाच्या खिडकीकडे गेली.माझ्या वर्गाचे चित्र कमीतकमी पंधरा ते वीस सेलफोन्सच्या कॅमे-याच्या चौकटीत बंदिस्त होत होते.मुलांच्याही नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती.चौथीच्या मुलांनी न अडखळता मायाज ड्रीम हा पाठ साहेबांना वाचून दाखवला.साहेबांचे गुड,.. नाईस असे कौतुक ऐकून मुलांचा आणि माझाही हुरूप वाढला.तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कृतियुक्त इंग्रजीच्या कवितेचे सादरीकरण केले.कृतिमुळे इंग्रजी शब्दांचे अर्थ मुलांना समजले आहेत हे साहेंबांच्या लक्षात आले.त्यामुळे ऐकणा-या सर्वांवर ती कविता प्रभाव टाकून गेली.वर्गात फिरत असतांना साहेबांनी वेन्सडे चे कार्ड उचलले.आणि एका मुलाच्या हातात देऊन त्याला वाचावयास लावले.तो मुलगा अत्यंत लाजाळू, अबोल होता. पण एका झटक्यात त्यांने ते स्पेलींग मोठ्याने वाचले अन वेन्सडे म्हणून सांगितले.तेव्हा साहेबांनी त्याला दिलेली कौतुकाची थाप जणू काही आम्हा शिक्षकांनाच मिळाली होती.
माझ्या चौथीच्या वर्गात मोनिका नावाची मुलगी घरच्या परिस्थितीमुळे दोन वर्षाच्या आपल्या बहिणीला घेऊन दररोज शाळेत यायची.सामान्यत: शिक्षकांची मानसिकता अशी असते की दररोज लहान भावंडं सोबत शाळेत आणणा-या विद्यार्थ्यांस शिक्षक रागावतात. पण तिची बहीणही शाळेच्या वातावरणात छान रमली होती म्हणून मला मोनिकाला त्या मुलीला शाळेत आणू नको असे म्हणावेसे वाटत नव्हते शिवाय ती आमच्या वर्ग प्रक्रियेत छान प्रतिसादही देत होती. मोकळेपणाने वर्गात वावरत होती.ती दररोज वर्गातच झोपायची. आजही साहेब आले तेंव्हा ती वर्गात गाढ झोपलेली होती.आता तीला वर्गात झोपलेली पाहून साहेब रागावतील या भितीने मी तिला बेंचवर पांधरून घालून झोपवले.पण वर्गात सगळीकडे फिरतांना साहेबांना ती झोपलेली दिसली.हा काय प्रकार आहे असे त्यांनी विचारल्यावर मोनिकाला शाळेत आपलया छोटया बहिणीला घेऊन येणे भागच आहे,जर तिने बहिणीला शाळेत आणले नाही तर मोनिकालाच बहिणीला सांभाळण्यासाठी घरी रहावे लागले असते. परिणामी ती शाळाबाह्य झाली असती.असे जेव्हा आम्ही साहेबांना सांगितले तेव्हा रागवायचे सोडून त्यांनी मुलीचे कौतुक केले की एवढी छोटी मुलगी दिवसभर आपल्या बहिणीला सांभाळून शाळा करते व अभ्यासही करते. त्या मुलीला शाळेत बसण्यास परवानगी देऊन शाळाबाह्य होण्यापासून वाचवले त्यामुळे शिक्षकांचे सुदधा साहेबांनी कौतुक केले.
जेव्हा साहेब येतात…….
तेव्हा विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही तारांबळ उडते.पण आमच्या शाळेतील सिईओ साहेंबांच्या भेटीचे हे अनमोल क्षण आमच्यातील उत्सुकता वाढवणारे व प्रेरणादायी ठरले.आता तर नेहमीच माझे विद्यार्थी असे विचारतात की आमचे मार्क पहायला सिईओ साहेब कधी येणार? आमच्या विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी जेंव्हा साहेब येतात ते क्षण आनंददायी आणि प्रेरणादायी नक्कीच ठरले
सारिका काळवीट
प्रा शिक्षक जि.प.प्रा.शा बलसा बु.
ता. पूर्णा जि. परभणी
मो .8975722385
इमेल.sarikakalwit@gmail.com
उपसंपादक संतोष सेलूकर ,परभणी
7709515110
कशाला शोधताय विश्वास….?
कशाला शोधताय विश्वास….?
सद्यस्थिती पाहत असताना लोक यंत्रासारखे बोलत -चालत आहे. जो तो आपलीच पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे .आपल्याच स्वार्थी आणि आत्मकेंद्री विचाराशिवाय माणसांजवळ दुसरे काहीही नाही.गोरगरीबांचा विचार करण्यास कोणीच तयार नाही सर्व पैशाच्या मागे लागलेले दिसतात. आगळं वेगळं काही नसून सर्व विनाशाच्या मागे पळत आहेत.मानवाच्या जीवनाचा सध्याच्या काळात काहीच विश्वास राहिला नाही.जातीपातीच्या नावाखाली नेते आपली पोळी भाजतात यात मात्र गोरगरीबांचे मरण होत आहे.यांच्या पोळीचा कोणीच विचार करत नाही.यांनी जगावं तर कसं आणि मरावं तर कसं.? कोण कोणाच्या तव्यावर आपली पोळी भाजून घेत आहे,कळतही नाही. गरीबीमुळे लोक साध्या साध्या आमिषाला बळी पडतात आणि मग त्यांचा केसाने गळा कापला जातो. या जगात सध्याच्या काळात विश्वास ठेवण्यासारखे काही उरले नाही. अहो साधी बाजारातील भाजी किंवा फळे सुद्धा विश्वासाने खरेदी करू शकत नाही कारण ते कृत्रिम पिकवली आहेत की नैसर्गिक हे देखील व्यापारी विश्वासाने सांगत नाही . हे तर दूरच राहू द्या घरातल्या घरात भावाचा भावावर बापाचा लेकावर अजिबात विश्वास उरलेला नाही.पैशासाठी किंवा दौलतीसाठी जमीन ,जायदाद यासाठी भाऊ भावालाच मुलगा बापालाच विष देऊन मारू लागला आहे.यामुळे कुठेतरी असं वाटतं की विश्वास जिवंत राहिला आहे का?
अहो बायकोचा नवऱ्यावर देखील विश्वास नाही जर नवऱ्याच्या शर्टला कशाचा डाग लागला की बायकोला लगेचच वाटते की आपला नवरा कुठे तरी तोंड काळे करून आला .अशी अनेक उदाहरणे सांगण्यासारखी आहेत यावरून असे वाटते की विश्वास जिवंत आहे का..?
विश्वास….! विश्वास….!! विश्वास….!!!काय आहे हो या साडेतीन अक्षरी शब्दात जर हा शब्द पचला नाही तर नक्कीच पोटदुखी होणार. आणि एखाद्याचा दुसऱ्यावर असलेला विश्वास उडाला तर त्याच्या मागे या साडेतीन शब्दांची साडेसाती लागलीच म्हणून समजा.
हंsss....विश्वास दाखवताना सध्याच्या काळात विश्वास कामापुरता वापरला जातो पुन्हा काम संपलं की विश्वास गेला उडत.या स्वार्थी दुनियेत कोणीच कोणाचं नाही.आणि तेव्हा असं वाटतंखरंच आहे का हो विश्वास.?आता कुणावरही विश्वास ठेवू नये असं वाटतं. कशाला ठेवावा कुणावर तरी विश्वास. फकत असावा स्वतःचा स्वतःवर विश्वास. नका ठेवू कोणावरही विश्वास. कारण जगात आहे सर्वत्र अविश्वास. कशाला शोधताय या कठोर दुनियेत विश्वास? शोधायच असेल तर स्वार्थ शोधा.शोधायच असेल तर अत्याचार शोध.शोधायचा असेल तर अविश्वास शोधा.कशाला शोधताय विश्वास?खरंच आहेत का हो विश्वास ठेवावा असे दिवस? नाही, नाही खरंच नाही, विश्वास… कारण विश्वास तर पानिपतच्या युद्धातच गेला म्हणून मित्रहो म्हणतो, “कशाला शोधताय विश्वास……? कशाला शोधताय विश्वास….?”
श्री.नाब्दे शशिकांत नामदेव (सह-शिक्षक )
सरस्वती विद्यालय पानगांव ता.रेणापूर जि.लातूर.
मो.नं. ८०५५८५७९८१
उपसंपादक
संतोष सेलूकर
परभणी
शिक्षण परिषदेतील सहभाग
सृजनशील
शिक्षण ऑनलाईन परिषद दि 10 ते 12 जून 2020
#CCEFinland#Covid19#CreativeLockdown# GoCorona#गोकोरोना CCE फिनलँड व्दारे आयोजित आंतरराष्ट्रीय शिक्षण
परिषदेचे आयोजन दि 10 ते 12 जून 2020 दरम्यान करण्यात आलेले होते. सृजनशील शिक्षण असा अनोखा विषय घेऊन ही परिषदेचे आयोजन फिनलँड
स्थित श्री हेरंब आणि शिरीन कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या शिक्षण
विषयात जगभरात नावाजलेल्या या संस्थेने केलेले होते.मला या परिषदेत सहभाग घेऊन माझा
शोधनिबंध सादर करता आला.त्यामुळे माझा विषय जगाच्या एका मोठया व्यासपिठावर मांडण्याची
संधी मला हेरंब सर यांच्यामुळे मिळाली त्यामुळे त्यांना धन्यवाद द्यायला पहिजे.मी
परभणी सारख्या अतिशय ग्रामीण आणि प्रगत जगापासून खूप दूर असणा-या एका जिल्ह्यातून
या परिषदेमध्ये सहभागी झालो होतो. जगभरातून अनेक शोधनिबंधक यांनी सहभाग घेतला होता.त्यांचे
शिक्षण विषयक विचार या निमित्ताने ऐकण्यास मिळाले.जगात शिक्षण क्षेत्रात फिनलँड ने
केवढी प्रगती केलेली आहे हे ऐकून खूप आनंद झाला.फिनलँड शिक्षण पध्दतीची ओळख झाली.आपणही
या पध्दतीचा आपल्या क्षेत्रात वापर करावा असा ही विचार मनात आला.SISU बॉक्स पाहण्यात
आला. नव्या शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यास प्रत्येकास आवडते त्याप्रमाणे माझे ही झाले.आपणही
या संस्थेसोबत काही उपक्रम आपल्या शाळेत राबवावे असेही वाटले. परिषदेत अनेक मान्यवर
यांचे विचार आवडले.प्रवीण दवणे, गानू सर, सुनंदन लेले सर, श्रुतीताई पानसे मॅडम, वनिता
पटवर्धन मॅडम, मनशक्ती केंद्रांचे श्री प्रमोदभाई, सरदेशमुख सर, नावलेकर मॅडम, काळपांडे सर, प्रशांत जोशी,डॉ रेवती नामजोशी, विवेक सर या सर्व आपल्या क्षेत्रात
यश संपादित केलेल्या मंडळीचे शिक्षणासंबधीचे विचार आणि त्यांचे कार्य भारावून सोडणारे
होते. धनिका मॅडम,शिरीन मॅडम आणि हेरंब सर यांनी वेळोवेळी अगदी स्क्रीनवर आपण कसे
स्पष्ट दिसायला पहिजे व कसे व्यक्त व्हायला पाहिजे याबाबत खूप व्यवस्थित मार्गदर्शन
केल्यामुळेच आम्हाला ही शिक्षण परिषद अटेन्ड करता आली.
एका यशस्वी आणि ज्यामधून मला खूप काही शिकायला मिळाले अशा परिषदेला
उपस्थित राहिल्याचा आनंद मिळाला
धन्यवाद
संतोष सेलूकर
7709515110
Santosh.selukar@gmail.com
शाळाभेट अहवाल
[3:50 PM, 1/12/2019] SANTOSH SELUKAR: आज दि.१२ जाने १९ परभणी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.बी.पी.पृथ्वीराज यांनी जि.प.शाळा बलसा बु.येथे भेट दिली.शाळेत प्रथम सातव्या वर्गात अध्ययनस्तर बाबत भागाकार फळ्यावर स्वत: लिहिले मुलांनी बरोबर उत्तरे करून दाखवले.वर्गशिक्षक कांबळे सर यांना मा.सिईओ सर म्हणाले.तुम्ही आधीच तयारी करून घेतलेली दिसते या उदाहरणाची .कांबळे सरनी सांगितले दुसरे उदाहरण द्या.मग दुसरेही मुलांनी सोडवले.मग मुख्याध्यापक कोण आहे?अध्ययन स्तर विचारला मी समोर होतो.मी ७० टक्के असल्याचे सांगितले.मग ५ मराठी शब्द लिहिण्यास सांगितले.समृद्ध , शौचालय,आकृती इ.काही मुलांचे काही शब्द चुकले. पण बरेच बरोबर आले.मग वर्ग ३री ४थी काळवीट म्याडम यांच्या वर्गात आले Eng rhyme म्हणण्यास सांगितले.दोन वर्ग एकत्र घेता का विचारले ? मग दोन्ही वर्गाच्या कृतियुक्त Rhymes झाल्या. विशेष म्हणजे मोनिका नावाची मुलगी आपला छोटा भाऊ सोबत आणते व त्याला सांभाळत स्वत:चे शिक्षण घेते त्या झोपलेल्या मुलांचे पांघरूण बाजूला करुण त्यांनी पाहिले.मु अ.म्हणून मी भूमिका मांडली.तिची बिकट परिस्थिती आणि भावंड सांभाळत खरं तर ती शाळाबाह्य होऊ शकते पण आम्ही तिला लहान भावंड सांभाळून शिक्षण घेण्यास प्रवृत्त केल्याचे स्पष्ट केले.ये अच्छी बात है असे म्हणाले.नंतर ६ वी वर्ग बाहेर व्हरांड्यात होता .हे असे का बाहेर ? मग पडलेल्या वर्ल्ड खोल्या दाखवल्या ठिक आहे Major Repair list यादीत नाव आहे का ? मी सांगितले.हो आहे असे सांगितले मग काम होऊन जाईल म्हणाले.मग बंडाळे म्याडमच्या पाचव्या वर्गात जाऊन शिवाजी महाराज बाबत पाच वाक्य सांगा बर्याच मुलांनी माहिती दिली.Eng विषय passage reading किती मुले करतात ? टप्पा २ फक्त ४ मुले २६ पैकी अहवाल पाहिला मग मु.अ.म्हणून मी म्हणालो सर ही पूर्वीची स्थिती आहे आता खूप बदल झालेला आहे सर्वाना इझी रिडींग बुक दिलेले आहेत.रात्रीचे अभ्यास गट कार्यरत केले आहेत त्याचे फोटो दाखवले.आता ७० टक्के मुले passage reading करतात.असे सांगितली.मग Eng rhyme कृतियुक्त पद्धतीने २४ सर्व मुलांनी सादर केली.ते पाहून समाधान व्यक्त केले. मग बंडाळे म्याडम यांना विचारले प्रगतशील मुलांसाठी काय नियोजन आहे. तेव्हा म्याडम नी विविध साहित्या सह उपक्रम घेतो सांगितले.ठिक आहे म्हणाले.सर आमचा सत्कार स्विकारा म्हणल्यानंतर म्हणाले सत्कार नको अध्ययन स्तर टप्पा ३ मध्ये अजून वाढ करा बाकी शाळेपेक्षा तुमची प्रगती चांगली आहे .मीच तुमचा सत्कार करतो असे म्हणाले.मग गाडीत बसले गाडी चालू झाली.मी परत विनंती केली सर आमचा हार तर घ्या.मग परत गाडीतून उतरून हार स्विकारला.आम्हाला हा अनुभव खूप बळ देऊन गेला.एकाही शब्दाने त्यांनी आम्हाला वेगळे बोलेले नाही किंवा काही झापाझापी नाही.आम्ही देखील त्यांच्यासमोर आमचं एकही रडगाणं गायलं नाही.जे बोललो ते possitive बोलल़ो त्यात नेहमी धिंगा मस्ती करणारी आमची सर्व मुले आज आज अशी काही शिस्तीत आणि गोड बोलू लागली की आमचा आत्मविश्वास वाढला.दडपण गेले उत्साह संचारला सर्व स्टाफ कदम म्याडम काळवीट म्याडम बंडाळे म्याडम ,कांबळे सर आम्ही सर्वांनी गेल्या जून पासून जीव ओतून काम केले त्यामुळेच आज आम्हाला गावकरी आमचे शाळेत येऊन विद्यार्थ्याचे कौतुक पाहू शकले. या प्रसंगी या सरपंच उप सरपंच सदस्य व शा व्यवस्थापन समिती सदस्य कांबळे साहेब कें प्र कांबळे साहेब बी.डी.ओ पूर्णा राठोड साहेब ग्राम सेवक उपस्थित होते.
[3:50 PM, 1/12/2019] SANTOSH SELUKAR: शब्दांकन
संतोष सेलूकर
प्रा शाळा बलसा बु.ता पूर्णा जि परभणी
[3:50 PM, 1/12/2019] SANTOSH SELUKAR: शब्दांकन
संतोष सेलूकर
प्रा शाळा बलसा बु.ता पूर्णा जि परभणी
शिक्षण परिषद गणपूर
🌷शिक्षण परिषद गणपूर 🌷 २०१९-२० वर्षातील पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद अविस्मरणीय ठरली.☘☘ सुरूवात अत्यंत साधेपणाने झाली.गावचे सरपंच व शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षण प्रेमी नागरिक परिषदेत सहभागी झाले ही अत्यंत स्तुत्य बाब वाटली.☘फक्त सहभाग घेतला नाही तर शाळेसाठी १४व्या वित्त आयोगात निधी देऊन ज्या गरजा आहेत; त्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन ही दिले. ☘ उद्घाटन व भाषणबाजी यात अधिक वेळ न घेता महत्त्वाच्या विषयाला सुरूवात झाली.🍀नवीन आलेले तांबे सर व वाडीकर सर यांचे स्वागत करण्यात आले.🍀 अध्ययन स्तर टाॅप शाळांचे अभिनंदन करण्यात आले.बाॅटम शाळांना आपण टाॅप पासून किती अंतरावर आहोत हे समजले. 🍀ब-याच वर्गाची गुणवत्ता ९० - १०० टक्के असल्याचे समजले 🍀 नंतर शिक्षकांचे तीन गट करण्यात आले १-३ ४-५ तसेच ६-८ अध्ययन निष्पत्ती नुसार विषय निहाय आराखडे तयार झाले 🍀
गटात चर्चा होत होत्या.प्रत्येकजण आपले अनुभव सांगत होता.☘ वेगवेगळी मत- मत्तांतरे दिसून येत होती परंतु आपसात मतभेद नव्हते.जो तो दुस-याच्या मताचा आदर राखत आपले मत मांडत होता.☘ बिबेकर सर यांनी स्वत:चे मुरमुरे टाकून प्रसादात चांगलीच भर घातली.🍀मग सर्वांनीच आपापले मुरमुरे प्रसादात टाकून वाटायला सुरूवात केली.🍀मग मा. केंद्रप्रमुख कांबळे साहेबांनी तर डायरेक्ट आजीबाईने दिलेला लाडूचा डब्बाच परिषदेत उघडला.एवढी बौद्धीक मेजवानी दिल्यावर काय ? सर्वं जण पाऊस नसल्यामुळे आनंदाच्या उन्हातच न्हाऊन निघाले.🍀 दुपारी गणपूर शाळेने सर्वांना रुचकर व स्वादिष्ट भोजनाची सोय केल्यामुळे शिक्षण परिषदेत जणू दुग्ध शर्करा योग पहावयास आला.🍀 सर्वांची पूर्णवेळ उपस्थिती हे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.🍀वर्गातील रोजच्या तोचतोपणाला कंटाळलेल्या शिक्षकांना महिण्यातून एक दिवस अशी मुक्तपणे शिक्षक मित्रांशी गप्पा मारणे अर्थात अनुभवाच्या शिदोरीची देवाणघेवाण करणे.यासाठीच तर या शिक्षण परिषदेचे प्रयोजन असते.☘ शेवटी मु.अ.बळवंतकर जाधव सर गरुड सर गोविंदवार व बिबेकर सर यांनी खूप परिश्रम घेतले व शिक्षण परिषद यशस्वी केली. ☘सर्व सि.आर.जी.मेंबर्सनी आपापली भूमिका योग्यपणे पेलली.☘पवार सर गडगिळे सर शिंदे सर जाधव सर यांनी नको नको म्हणलं तरी सर्वांना वेतनवाढीची भेट बि.ई.ओ.साहेबां मार्फत दिली तरी त्यांना ही धन्यवाद .☘अशी शिक्षण परिषद झाली की सर्वांच्या सदैव स्मरणात राहील .धन्यवाद
शब्दांकन
संतोष सेलुकर ,बलसा
गटात चर्चा होत होत्या.प्रत्येकजण आपले अनुभव सांगत होता.☘ वेगवेगळी मत- मत्तांतरे दिसून येत होती परंतु आपसात मतभेद नव्हते.जो तो दुस-याच्या मताचा आदर राखत आपले मत मांडत होता.☘ बिबेकर सर यांनी स्वत:चे मुरमुरे टाकून प्रसादात चांगलीच भर घातली.🍀मग सर्वांनीच आपापले मुरमुरे प्रसादात टाकून वाटायला सुरूवात केली.🍀मग मा. केंद्रप्रमुख कांबळे साहेबांनी तर डायरेक्ट आजीबाईने दिलेला लाडूचा डब्बाच परिषदेत उघडला.एवढी बौद्धीक मेजवानी दिल्यावर काय ? सर्वं जण पाऊस नसल्यामुळे आनंदाच्या उन्हातच न्हाऊन निघाले.🍀 दुपारी गणपूर शाळेने सर्वांना रुचकर व स्वादिष्ट भोजनाची सोय केल्यामुळे शिक्षण परिषदेत जणू दुग्ध शर्करा योग पहावयास आला.🍀 सर्वांची पूर्णवेळ उपस्थिती हे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.🍀वर्गातील रोजच्या तोचतोपणाला कंटाळलेल्या शिक्षकांना महिण्यातून एक दिवस अशी मुक्तपणे शिक्षक मित्रांशी गप्पा मारणे अर्थात अनुभवाच्या शिदोरीची देवाणघेवाण करणे.यासाठीच तर या शिक्षण परिषदेचे प्रयोजन असते.☘ शेवटी मु.अ.बळवंतकर जाधव सर गरुड सर गोविंदवार व बिबेकर सर यांनी खूप परिश्रम घेतले व शिक्षण परिषद यशस्वी केली. ☘सर्व सि.आर.जी.मेंबर्सनी आपापली भूमिका योग्यपणे पेलली.☘पवार सर गडगिळे सर शिंदे सर जाधव सर यांनी नको नको म्हणलं तरी सर्वांना वेतनवाढीची भेट बि.ई.ओ.साहेबां मार्फत दिली तरी त्यांना ही धन्यवाद .☘अशी शिक्षण परिषद झाली की सर्वांच्या सदैव स्मरणात राहील .धन्यवाद
शब्दांकन
संतोष सेलुकर ,बलसा
गुगल फॉर्म चाचणी
चाचणी क्रमांक 1
चाचणी क्रमांक 2
चाचणी क्रमांक 3
चाचणी क्रमांक 4
चाचणी क्रमांक 5
चाचणी क्रमांक 6
चाचणी क्रमांक 7
चाचणी क्रमांक 8
चाचणी क्रमांक 9
चाचणी क्रमांक 10
चाचणी क्रमांक 11
चाचणी क्रमांक 12
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 14
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 16
चाचणी क्रमांक 17
चाचणी क्रमांक 18
चाचणी क्रमांक 19
चाचणी क्रमांक 20
चाचणी क्रमांक 21
चाचणी क्रमांक 22
चाचणी क्रमांक 23
चाचणी क्रमांक 24
चाचणी क्रमांक 25
चाचणी क्रमांक 1
चाचणी क्रमांक 2
चाचणी क्रमांक 3
चाचणी क्रमांक 4
चाचणी क्रमांक 7
चाचणी क्रमांक 8
चाचणी क्रमांक 9
चाचणी क्रमांक 10
चाचणी क्रमांक 11
चाचणी क्रमांक 12
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 14
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 16
चाचणी क्रमांक 17
चाचणी क्रमांक 18
चाचणी क्रमांक 19
चाचणी क्रमांक 20
चाचणी क्रमांक 21
चाचणी क्रमांक 22
चाचणी क्रमांक 23
चाचणी क्रमांक 24
चाचणी क्रमांक 25
चाचणी क्रमांक 2
चाचणी क्रमांक 3
चाचणी क्रमांक 4
चाचणी क्रमांक 5
चाचणी क्रमांक 6 चाचणी क्रमांक 7
चाचणी क्रमांक 8
चाचणी क्रमांक 9
चाचणी क्रमांक 10
चाचणी क्रमांक 11
चाचणी क्रमांक 12
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 14
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 16
चाचणी क्रमांक 17
चाचणी क्रमांक 18
चाचणी क्रमांक 19
चाचणी क्रमांक 20
चाचणी क्रमांक 21
चाचणी क्रमांक 22
चाचणी क्रमांक 23
चाचणी क्रमांक 24
चाचणी क्रमांक 25
‘ नोकरीचा पहिला दिवस.....’
‘ नोकरीचा पहिला दिवस.....’
आयुष्यात असे बरेच क्षण आहेत की, ज्याविषयी लिहिता येईल आणि त्यातीलच हा एक अनुभव लिहिण्याचा छोटासा प्रयत्न. मी रोहिणी शरदराव पवार. माझे मूळ गाव येडशी ता. जि. उस्मानाबाद. माझ्या वडिलांची परिस्थिती तशी बेताचीच. आम्हा चारही भावंडांना वडिलांनी खूप काबाडकष्ट करून शिकवले. माझ्यापेक्षा एक बहीण मोठी, मी दोन नंबरची व दोन लहान भाऊ असा आमचा सुखी परिवार. वडिलांची इच्छा होती कि, सर्व मुलांनी खूप शिकावे. पण मोठ्या बहिणीचे शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि ते स्वप्न मी पूर्ण करावे अशी वडिलांसोबत माझी इच्छा होती. गावातच बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन 2001 साली माझा रत्नागिरी जिल्ह्यात खाजगी डीएड कॉलेजला नंबर लागला. खाजगी कॉलेज असल्यामुळे इतर कॉलेज पेक्षा तेथील फी सुद्धा भरमसाठ होती. आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचे म्हणजे आमच्या परिस्थितीला झेपण्यासारखे नव्हते. कारण ती कुटुंबातील वेळ अशी होती की मोठ्या बहिणीचे लग्न व दोन लहान भावांचे शिक्षण पूर्ण करायचे होते. पण मोठ्या बहीणीचे शिक्षिका होण्याचे स्वप्न अधुरे होते आणि ते माझ्याकडून पूर्ण करण्याचा माझा आणि वडिलांचा प्रयत्न असल्यामुळे वडिलांनी परिस्थितीवर मात करून हात उसने पैसे घेऊन एकदाचं ऍडमिशन केले. सन 2003 साली डीएड पूर्ण झाले व पुढे तीन वर्षांनी तो दिवस उजाडला ज्यादिवशी मला नोकरीची ऑर्डर आली.
दिनांक 3 मे 2006 या दिवशी जिल्हा परिषद औरंगाबाद येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्तीची ऑर्डर पोस्टमनने आमच्या घरी आणून दिली. त्यादिवशी तिसरी वेळ होती की, वडिलांनी माझ्यासाठी सर्वांना पेढे वाटले. पहिली म्हणजे सातवी स्कॉलरशिप होल्डर झाले म्हणून, दुसरी म्हणजे बारावीत मुलींमध्ये पहिली आले म्हणून आणि आज मी नोकरीला लागले म्हणून. माझ्या वडिलांना तर एवढा आनंद झाला होता की त्यांना आकाश ठेंगणे वाटु लागले.
मग तो अविस्मरणीय क्षण माझ्या आयुष्यातील नोकरीचा पहिला दिवस उजाडला. तो म्हणजे 12 जून 2006. बऱ्याचदा नोकरीच्या पहिल्या दिवशी घरून निघतांना दही साखर, शिरा असे काहीतरी गोडधोड खाऊन पहिल्या दिवशी जॉइन होतात असे म्हणतात. पण आमचे असे काही झाले नाही. मला मिळालेला जिल्हा औरंगाबाद तालुका सिल्लोड आणि शाळेचे गाव होते अंभई केंद्रातील शिरसाळा. नोकरी लागल्याचा आनंद मनात घेऊन, मी आणि माझे बाप्पा म्हणजे माझे वडील, आम्ही घरून भाजी पोळीचा डब्बा घेऊन 12 जूनला पहाटे 4 वाजता येडशी येथून औरंगाबाद गाडीत बसलो. सकाळची वेळ असल्याने आम्ही दहा वाजेपर्यंत औरंगाबादला पोहोचलो. बस मधून चढताना उतरताना दरवेळी मला हे जाणवत होते की, डीएडच्या प्रवासा पासून प्रत्येक प्रवासात माझी बॅग उचलून माझा बाबा किती दमलाय ते...... त्यामुळे यापुढे असा त्रास त्यांना यापुढे होऊ द्यायचा नाही असे मनात ठरवून आम्ही औरंगाबाद वरून बारा वाजेपर्यंत सिल्लोड ला पोहोचलो.
सिल्लोड मध्ये आल्यानंतर तिथले बस स्टँड पाहूनच मन उदास झाले. मग मी आणि वडील तिथे कुठल्या बसच्या पाटीवर शिरसाळा हे नाव दिसतंय का हे शोधू लागलो. पण कुठेच नाव दिसत नाही हे समजल्यावर तिथल्या बस डेपो मध्ये चौकशी केली. तेव्हा समजले की शिरसाळयाला फक्त दिवसात दोन वेळा गाडी जाते. एक सकाळी नऊ वाजता आणि दुसरी संध्याकाळी सहा वाजता, आणि ती पण मुक्कामी तिथेच जाते. मग आम्ही दोघांनी बस नसल्यामुळे जेवण करून घेतले व खाजगी वाहन कोठे मिळते का? याची चौकशी करून त्या ठिकाणी पोहोचलो. त्याठिकाणी जाणाऱ्या जीप उभ्या होत्या. आणि तिथे गेल्यावर समजले की एक पॅसेंजर गाडी भरायला कमीत कमी दोन ते तीन तास लागतील आणि आम्ही दोन अडीच वाजेपर्यंत कसेतरी अम्भई म्हणजे माझी केंद्र शाळा येथे पोहोचलो. तिथे केंद्रावर जॉईन झाले. तेथील परिस्थिती पाहून सर्वजण असे म्हणत होते की, ही मुलगी शिरसाळयाला जाणार कशी? एकटी राहील कशी? अवघड आहे हिचे. आणि यांनी गाव बदलून घ्यायला पाहिजे. पण आम्हाला नोकरी लागल्याचा आनंद आणि गाव बदलून मिळेल की नाही याची भीती. यामुळे आम्ही तिथून शिरसाळ्याला जाण्यास निघालो. स्टॉप वर आलो तर एकही वाहन नाही, मग जायचे कसे? स्टॉप वरचे लोक म्हणू लागले गावात एकच जीप आहे आणि ती पण सकाळी दिवसातून एकदाच भरून येते आणि संध्याकाळी एकदाच वापस जाते. मग मात्र जास्त टेन्शन येऊ लागले. पण तरी वडिलांना लोकांचे बोलणे प्रेरणा देत होते. कारण स्टॉप वरील शिरसाळ्याचे लोक म्हणत होते की बरं झाल आमच्या गावात मास्तरीन बाई आल्या. आम्हाला कळतंय तस आतापर्यंत एकही मास्तरीन बाई आमच्या शाळेत आल्या नव्हत्या. आणि वडिलांना सांगत होते की, "आमचे गाव खूप चांगले आहे. यांना काहीच त्रास होणार नाही". पण मला प्रश्न पडला होता की मी राहु कुठे? एकटीलाच राहावे लागेल. अंभईला राहिले तर अप डाऊन कसे करू? असे माझे विचार चक्र सुरु होते, तोपर्यंत वडिलांनी एक रिक्षा ठरवला, आणि त्या रिक्षावाल्याने अंभईवरून शिरसाळा सहा किलोमीटर अंतर एकदा जाऊन परत येण्याचे दोनशे रुपये घेतले.
मग काय मी आणि माझे बाप्पा माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी शाळेवर जॉईन व्हायला रिक्षाने निघालो. रिक्षात बसल्यावर माझ्या मनात एकच विचार गाव बदलून मिळेल का? मिळवणे शक्य नाही. कारण आपल्याला येथे ओळखीचं कोणीच नाही. आणि या बदलाबदली मध्ये बाप्पाची आणखीनच परेशानी होईल. आणि त्यात केंद्र शाळेवर चर्चा ऐकली की, गाव फार डेंजर आहे बाबा. असे एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ करत होते. आणि तेवढ्यात सहा किलोमीटरचा प्रवास करून रिक्षा शिरसाळा गावात आला. गावाच्या सुरुवातीलाच शाळा. गावाच्या पुढे एक सिरसाळा तांडा. तेथील लोक लमाणी समाजाचे होते. मग तांड्यावर जायचे का इथेच थांबायचे हा पुन्हा प्रश्न पडला. आणि मग ऑर्डर वर पाहिलं तर शिरसाळा हे गाव होते. म्हणून तेथेच उतरलो. शाळेचे छोटेसे गेट, सुमारे तीन ते साडेतीन वाजण्याची दुपारची वेळ शाळेवर पोहोचायला झाली. शिरसाळा मध्ये अगोदरच माहिती झाल्यामुळे सगळी मुले आनंदी होती की, आम्हाला नवीन मॅडम आल्या म्हणून. गेटमधून मी आणि बॅग अडकवलेले माझे बाप्पा आम्ही शाळेत प्रवेश केला. दुपारचा लघु मध्यंतर होता, मुले-मुली धावतच माझ्याकडे आली आणि त्यातील बरीच मुले मला Good Afternoon म्हणत होती. ती मुले आणि त्यांचा आनंद पाहून मला खूप आनंद झाला. त्यांना Good Afternoon म्हणून मी शाळेत सगळीकडे नजर टाकली. शाळेच्या दर्शनी भागात झाडे, सुंदर मैदान, रंगरंगोटी त्यामुळे शाळा छान वाटली. आणि थोडसं मन रिलॅक्स झाले. तिथे अगोदर तीन शिक्षक होते. आज पर्यंत लेडीज कोणीच नव्हती, त्या गावात शाळा सुरू झाल्यापासून पहिली शिक्षिका मीच होते त्यामुळे मला मॅडम कमी आणि ताई जास्त म्हणू लागले.
मग मी ऑफिसमध्ये गेले, मुख्याध्यापक श्री जंजिरे सर माझ्या वडिलांशी बोलले. त्यांनी कागदी प्रोसेस सगळे अगोदरच पूर्ण करून ठेवलेली होती. मग आम्ही सही करण्याच्या अगोदर गाव बदलून मिळेल का? याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते असे म्हटले की, मॅडम येथील सरपंचांनी अगोदर तालुक्याला सांगून ठेवले की, आमच्या येथे अगोदरच एकही मॅडम आल्या नाहीत. आल्या त्या अशाच बदलून गेल्या. त्यामुळे तुम्ही यांना गाव बदलुन देऊ नका. मग म्हंटलं आता काय करावं? एकदा जॉईन झाल्यावर पुन्हा लवकर गांव बदलून मिळेल याची शक्यता नव्हती. पण तरीसुद्धा ते सर म्हणाले की मॅडम तुम्ही अगोदर जॉईन व्हा व नंतर प्रयत्न करा. विचार करत करतच सह्या केल्या .मी माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी सही केली. तिथल्या केंद्र शाळेपेक्षा ही शाळा खूप छान वाटली. शाळेत टापटीपपणा दिसून आला. सगळी शाळा फिरून पाहिली, आता सर्वात मोठा प्रश्न होता राहायचे कुठे? यासाठी गावात फिरून येण्यासाठी गेलोत, तर गावात कुठे रूम उपलब्ध नव्हती. आता गावात राहण्याची सोय नाही. गावात अपडाऊनची सोय नाही. आता काय करायचे? हा मोठा प्रश्न माझ्यापुढे पडला. शाळेच्या गेटला लागूनच एक बाई राहत होती. तिच्याकडे दोन खोल्या होत्या. आणि ती म्हटली की माझ्या दोन खोल्या पैकी एक खोली तुला राहायला देते. रूम शेणाने सारवायचीच का असेना पण राहायला जागा मिळाली त्यामुळे मन हलकं झालं. तेवढ्यात मुले बोलवायला आली मॅडम तुम्हाला तो ऑटोवाला लवकर बोलवत आहे.
अशाप्रकारे त्या शाळेच्या पहिल्या दिवशी तेथेच राहून नोकरी करायची असे ठरवले. त्या गावात दोन दोन दिवस लाईट नसायची, साधा फोन करायचा म्हटलं तर तीन किलोमीटर गावा बाहेर यावे लागत असे, अशा गावात राहायचे ठरवले. त्यावेळी एक विचार मनात येत होता की, माझ्या आई-वडिलांना काय वाटत असेल की, 'आपली मुलगी एकटी, एवढ्या लांब आपल्याला सोडून राहणार, त्यात तिच्याशी साधा फोनवर कॉन्टॅक्ट सुद्धा होणार नव्हता, जेव्हा ती रेंजमध्ये येईल तेव्हा ती सुरक्षित आहे हे त्यांना समजायचे.' हा सगळा विचार करून मन धीट केले. आपली मुलगी आणि तिची नोकरी सुरक्षित राहील हा विचार करून बप्पांनी मला त्याच गावात रहा असे सांगितले. कारण एक प्लस पॉइंट होता, शाळा खूपच छान होती, आणि गावातली माणसं पण खूप मायाळू होती. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन पसारा घेऊन येण्यासाठी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
हा माझा नोकरीचा पहिला दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण जो कधीही विसरता येणार नाही. धन्यवाद.
रोहिणी शरदराव पवार
प्रा. शि. जि.प.शाळा मुलांची ताडकळस
ता.पूर्णा जि.परभणी
मोबाईल नंबर 9067068383
E mail :- rohini.p9783@gmail.com
उपसंपादक : संतोष सेलूकर
परभणी 7709515110
Subscribe to:
Posts (Atom)