[3:50 PM, 1/12/2019] SANTOSH SELUKAR: आज दि.१२ जाने १९ परभणी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.बी.पी.पृथ्वीराज यांनी जि.प.शाळा बलसा बु.येथे भेट दिली.शाळेत प्रथम सातव्या वर्गात अध्ययनस्तर बाबत भागाकार फळ्यावर स्वत: लिहिले मुलांनी बरोबर उत्तरे करून दाखवले.वर्गशिक्षक कांबळे सर यांना मा.सिईओ सर म्हणाले.तुम्ही आधीच तयारी करून घेतलेली दिसते या उदाहरणाची .कांबळे सरनी सांगितले दुसरे उदाहरण द्या.मग दुसरेही मुलांनी सोडवले.मग मुख्याध्यापक कोण आहे?अध्ययन स्तर विचारला मी समोर होतो.मी ७० टक्के असल्याचे सांगितले.मग ५ मराठी शब्द लिहिण्यास सांगितले.समृद्ध , शौचालय,आकृती इ.काही मुलांचे काही शब्द चुकले. पण बरेच बरोबर आले.मग वर्ग ३री ४थी काळवीट म्याडम यांच्या वर्गात आले Eng rhyme म्हणण्यास सांगितले.दोन वर्ग एकत्र घेता का विचारले ? मग दोन्ही वर्गाच्या कृतियुक्त Rhymes झाल्या. विशेष म्हणजे मोनिका नावाची मुलगी आपला छोटा भाऊ सोबत आणते व त्याला सांभाळत स्वत:चे शिक्षण घेते त्या झोपलेल्या मुलांचे पांघरूण बाजूला करुण त्यांनी पाहिले.मु अ.म्हणून मी भूमिका मांडली.तिची बिकट परिस्थिती आणि भावंड सांभाळत खरं तर ती शाळाबाह्य होऊ शकते पण आम्ही तिला लहान भावंड सांभाळून शिक्षण घेण्यास प्रवृत्त केल्याचे स्पष्ट केले.ये अच्छी बात है असे म्हणाले.नंतर ६ वी वर्ग बाहेर व्हरांड्यात होता .हे असे का बाहेर ? मग पडलेल्या वर्ल्ड खोल्या दाखवल्या ठिक आहे Major Repair list यादीत नाव आहे का ? मी सांगितले.हो आहे असे सांगितले मग काम होऊन जाईल म्हणाले.मग बंडाळे म्याडमच्या पाचव्या वर्गात जाऊन शिवाजी महाराज बाबत पाच वाक्य सांगा बर्याच मुलांनी माहिती दिली.Eng विषय passage reading किती मुले करतात ? टप्पा २ फक्त ४ मुले २६ पैकी अहवाल पाहिला मग मु.अ.म्हणून मी म्हणालो सर ही पूर्वीची स्थिती आहे आता खूप बदल झालेला आहे सर्वाना इझी रिडींग बुक दिलेले आहेत.रात्रीचे अभ्यास गट कार्यरत केले आहेत त्याचे फोटो दाखवले.आता ७० टक्के मुले passage reading करतात.असे सांगितली.मग Eng rhyme कृतियुक्त पद्धतीने २४ सर्व मुलांनी सादर केली.ते पाहून समाधान व्यक्त केले. मग बंडाळे म्याडम यांना विचारले प्रगतशील मुलांसाठी काय नियोजन आहे. तेव्हा म्याडम नी विविध साहित्या सह उपक्रम घेतो सांगितले.ठिक आहे म्हणाले.सर आमचा सत्कार स्विकारा म्हणल्यानंतर म्हणाले सत्कार नको अध्ययन स्तर टप्पा ३ मध्ये अजून वाढ करा बाकी शाळेपेक्षा तुमची प्रगती चांगली आहे .मीच तुमचा सत्कार करतो असे म्हणाले.मग गाडीत बसले गाडी चालू झाली.मी परत विनंती केली सर आमचा हार तर घ्या.मग परत गाडीतून उतरून हार स्विकारला.आम्हाला हा अनुभव खूप बळ देऊन गेला.एकाही शब्दाने त्यांनी आम्हाला वेगळे बोलेले नाही किंवा काही झापाझापी नाही.आम्ही देखील त्यांच्यासमोर आमचं एकही रडगाणं गायलं नाही.जे बोललो ते possitive बोलल़ो त्यात नेहमी धिंगा मस्ती करणारी आमची सर्व मुले आज आज अशी काही शिस्तीत आणि गोड बोलू लागली की आमचा आत्मविश्वास वाढला.दडपण गेले उत्साह संचारला सर्व स्टाफ कदम म्याडम काळवीट म्याडम बंडाळे म्याडम ,कांबळे सर आम्ही सर्वांनी गेल्या जून पासून जीव ओतून काम केले त्यामुळेच आज आम्हाला गावकरी आमचे शाळेत येऊन विद्यार्थ्याचे कौतुक पाहू शकले. या प्रसंगी या सरपंच उप सरपंच सदस्य व शा व्यवस्थापन समिती सदस्य कांबळे साहेब कें प्र कांबळे साहेब बी.डी.ओ पूर्णा राठोड साहेब ग्राम सेवक उपस्थित होते.
[3:50 PM, 1/12/2019] SANTOSH SELUKAR: शब्दांकन
संतोष सेलूकर
प्रा शाळा बलसा बु.ता पूर्णा जि परभणी
[3:50 PM, 1/12/2019] SANTOSH SELUKAR: शब्दांकन
संतोष सेलूकर
प्रा शाळा बलसा बु.ता पूर्णा जि परभणी