‘ नोकरीचा पहिला दिवस.....’

 नोकरीचा पहिला दिवस.....
आयुष्यात असे बरेच क्षण आहेत कीज्याविषयी लिहिता येईल आणि त्यातीलच हा एक अनुभव लिहिण्याचा छोटासा प्रयत्नमी रोहिणी शरदराव पवार. माझे मूळ गाव येडशी ता. जि. उस्मानाबाद. माझ्या वडिलांची परिस्थिती तशी बेताचीच. आम्हा चारही भावंडांना वडिलांनी खूप काबाडकष्ट करून शिकवले. माझ्यापेक्षा एक बहीण मोठीमी दोन नंबरची व दोन लहान भाऊ असा आमचा सुखी परिवार. वडिलांची इच्छा होती कि, सर्व मुलांनी खूप शिकावेपण मोठ्या बहिणीचे शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि ते स्वप्न मी पूर्ण करावे अशी वडिलांसोबत माझी इच्छा होतीगावातच बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन 2001 साली माझा रत्नागिरी जिल्ह्यात खाजगी डीएड कॉलेजला नंबर लागलाखाजगी कॉलेज असल्यामुळे इतर कॉलेज पेक्षा तेथील फी सुद्धा भरमसाठ होती. आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचे म्हणजे आमच्या परिस्थितीला झेपण्यासारखे नव्हतेकारण ती कुटुंबातील वेळ अशी होती की मोठ्या बहिणीचे लग्न व दोन लहान भावांचे शिक्षण पूर्ण करायचे होते. पण मोठ्या बहीणीचे शिक्षिका होण्याचे स्वप्न अधुरे होते आणि ते माझ्याकडून पूर्ण करण्याचा माझा आणि वडिलांचा प्रयत्न असल्यामुळे वडिलांनी परिस्थितीवर मात करून हात उसने पैसे घेऊन एकदाचं ऍडमिशन केले. सन 2003 साली डीएड पूर्ण झाले व पुढे तीन वर्षांनी तो दिवस उजाडला ज्यादिवशी मला नोकरीची ऑर्डर आली.
          दिनांक 3 मे 2006 या दिवशी जिल्हा परिषद औरंगाबाद येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्तीची ऑर्डर पोस्टमनने आमच्या घरी आणून दिलीत्यादिवशी तिसरी वेळ होती की, वडिलांनी माझ्यासाठी सर्वांना पेढे वाटले. पहिली म्हणजे सातवी स्कॉलरशिप होल्डर झाले म्हणूनदुसरी म्हणजे बारावीत मुलींमध्ये पहिली आले म्हणून आणि आज मी नोकरीला लागले म्हणून माझ्या वडिलांना तर एवढा आनंद झाला होता की त्यांना आकाश ठेंगणे वाटु लागले.
        मग तो अविस्मरणीय क्षण माझ्या आयुष्यातील नोकरीचा पहिला दिवस उजाडलातो म्हणजे 12 जून 2006बऱ्याचदा नोकरीच्या पहिल्या दिवशी घरून निघतांना दही साखरशिरा असे काहीतरी गोडधोड खाऊन पहिल्या दिवशी जॉइन होतात असे म्हणतातपण आमचे असे काही झाले नाही. मला मिळालेला जिल्हा औरंगाबाद तालुका सिल्लोड आणि शाळेचे गाव होते अंभई केंद्रातील शिरसाळा. नोकरी लागल्याचा आनंद मनात घेऊन, मी आणि माझे बाप्पा म्हणजे माझे वडील, आम्ही घरून भाजी पोळीचा डब्बा घेऊन 12 जूनला पहाटे वाजता येडशी येथून औरंगाबाद गाडीत बसलोसकाळची वेळ असल्याने आम्ही दहा वाजेपर्यंत औरंगाबादला पोहोचलोबस मधून चढताना उतरताना दरवेळी मला हे जाणवत होते की, डीएडच्या प्रवासा पासून प्रत्येक प्रवासात माझी बॅग उचलून माझा बाबा किती दमलाय ते...... त्यामुळे यापुढे असा त्रास त्यांना यापुढे होऊ द्यायचा नाही असे मनात ठरवून आम्ही औरंगाबाद वरून बारा वाजेपर्यंत सिल्लोड ला पोहोचलो.
     सिल्लोड मध्ये आल्यानंतर तिथले बस स्टँड पाहूनच मन उदास झाले. मग मी आणि वडील तिथे कुठल्या बसच्या  पाटीवर शिरसाळा हे नाव दिसतंय का हे शोधू लागलोपण कुठेच नाव दिसत नाही हे समजल्यावर तिथल्या बस डेपो मध्ये चौकशी केली. तेव्हा समजले की शिरसायाला फक्त दिवसात दोन वेळा गाडी जाते. एक सकाळी नऊ वाजता आणि दुसरी संध्याकाळी सहा वाजता, आणि ती पण मुक्कामी तिथेच जाते. मग आम्ही दोघांनी बस नसल्यामुळे जेवण करून घेतले व खाजगी वाहन कोठे मिळते का याची चौकशी करून त्या ठिकाणी पोहोचलो. त्याठिकाणी जाणाऱ्या जीप उभ्या होत्या. आणि तिथे गेल्यावर समजले की एक पॅसेंजर गाडी भरायला कमीत कमी दोन ते तीन तास लागतील आणि आम्ही दोन अडीच वाजेपर्यंत कसेतरी अम्भई म्हणजे माझी केंद्र शाळा येथे पोहोचलोतिथे केंद्रावर जॉईन झालेतेथील परिस्थिती पाहून सर्वजण असे म्हणत होते की, ही मुलगी शिरसाळयाला जाणार कशी एकटी राहील कशी? अवघड आहे हिचेआणि यांनी गाव बदलून घ्यायला पाहिजेपण आम्हाला नोकरी लागल्याचा आनंद आणि गाव बदलून मिळेल की नाही याची भीतीयामुळे आम्ही तिथून शिरसाळ्याला जाण्यास निघालोस्टॉप वर आलो तर एकही वाहन नाही मग जायचे कसे?  स्टॉप वरचे लोक म्हणू लागले गावात एकच जीप आहे आणि ती पण सकाळी दिवसातून एकदाच भरून येते आणि संध्याकाळी एकदाच वापस जाते मग मात्र जास्त टेन्शन येऊ लागलेपण तरी वडिलांना लोकांचे बोलणे प्रेरणा देत होतेकारण स्टॉप वरील शिरसाळ्याचे लोक म्हणत होते की बरं झाल आमच्या गावात मास्तरीन बाई आल्याआम्हाला कळतंय तस आतापर्यंत एकही मास्तरीन बाई आमच्या शाळेत आल्या नव्हत्याआणि वडिलांना सांगत होते की, "आमचे गाव खूप चांगले आहे. यांना काहीच त्रास होणार नाही". पण मला प्रश्न पडला होता की मी राहु कुठे एकटीलाच राहावे लागेल. अंभईला राहिले तर अप डाऊन कसे करू? असे माझे विचार चक्र सुरु होतेतोपर्यंत वडिलांनी एक रिक्षा ठरवला, आणि त्या रिक्षावाल्याने अंभईवरून शिरसाळा सहा किलोमीटर अंतर एकदा जाऊन परत येण्याचे दोनशे रुपये घेतले.
           मग काय मी आणि माझे बाप्पा माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी शाळेवर जॉईन व्हायला रिक्षाने निघालो. रिक्षात बसल्यावर माझ्या मनात एकच विचार गाव बदलून मिळेल का मिळवणे शक्य नाही कारण आपल्याला येथे ओळखीचं कोणीच नाही. आणि या बदलाबदली मध्ये  बाप्पाची आणखीनच परेशानी होईलआणि त्यात केंद्र शाळेवर  चर्चा ऐकली की, गाव फार डेंजर आहे बाबा. असे एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ करत होते. आणि तेवढ्यात सहा किलोमीटरचा प्रवास करून रिक्षा शिरसाळा गावात आला. गावाच्या सुरुवातीलाच शाळा. गावाच्या पुढे एक सिरसाळा तांडातेथील लोक लमाणी समाजाचे होतेमग तांड्यावर जायचे का इथेच थांबायचे हा पुन्हा प्रश्न पडला आणि  मग ऑर्डर वर पाहिलं तर शिरसाळा हे गाव होते म्हणून तेथेच उतरलो शाळेचे छोटेसे गेट, सुमारे तीन ते साडेतीन वाजण्याची दुपारची वेळ शाळेवर पोहोचायला झालीशिरसाळा मध्ये अगोदरच माहिती झाल्यामुळे सगळी मुले आनंदी होती कीआम्हाला नवीन मॅडम आल्या म्हणूनगेटमधून मी आणि बॅग अडकवलेले माझे बाप्पा आम्ही शाळेत प्रवेश केला दुपारचा लघु मध्यंतर होतामुले-मुली धावतच माझ्याकडे आली  आणि त्यातील बरीच मुले मला  Good Afternoon म्हणत होती. ती मुले आणि त्यांचा आनंद पाहून मला खूप आनंद झाला त्यांना Good Afternoon  म्हणून मी शाळेत सगळीकडे नजर टाकली. शाळेच्या दर्शनी भागात झाडेसुंदर मैदान, रंगरंगोटी त्यामुळे शाळा छान वाटलीआणि थोडसं मन रिलॅक्स झाले तिथे अगोदर तीन शिक्षक होतेआज पर्यंत लेडीज कोणीच नव्हतीत्या गावात शाळा सुरू झाल्यापासून पहिली शिक्षिका मीच होते त्यामुळे मला मॅडम कमी आणि ताई जास्त म्हणू लागले.
           मग मी ऑफिसमध्ये गेले मुख्याध्यापक श्री जंजिरे सर माझ्या वडिलांशी बोलले त्यांनी कागदी प्रोसेस सगळे अगोदरच पूर्ण करून ठेवलेली होती. मग आम्ही सही करण्याच्या अगोदर गाव बदलून मिळेल का याबाबत त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते असे म्हटले की मॅडम येथील सरपंचांनी अगोदर तालुक्याला सांगून ठेवले की, आमच्या येथे अगोदरच एकही मॅडम आल्या नाहीतआल्या त्या अशाच बदलून गेल्या.  त्यामुळे तुम्ही यांना गाव बदलुन देऊ नका मग म्हंटलं आता काय करावंएकदा जॉईन झाल्यावर पुन्हा लवकर गांव बदलून मिळेल याची शक्यता नव्हती पण तरीसुद्धा ते सर म्हणाले की मॅडम तुम्ही अगोदर जॉईन व्हा व नंतर प्रयत्न करा विचार करत करतच सह्या केल्या .मी माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी सही केलीतिथल्या केंद्र शाळेपेक्षा ही शाळा खूप छान वाटली शाळेत टापटीपपणा दिसून आला सगळी शाळा फिरून पाहिली, आता सर्वात मोठा प्रश्न होता राहायचे कुठे यासाठी गावात फिरून येण्यासाठी गेलोततर गावात कुठे रूम उपलब्ध नव्हती.  आता गावात राहण्याची सोय नाही. गावात अपडाऊनची सोय नाही.  आता काय करायचे? हा मोठा प्रश्न माझ्यापुढे पडला.  शाळेच्या गेटला लागूनच एक बाई राहत होती तिच्याकडे दोन खोल्या होत्या. आणि ती म्हटली की माझ्या दोन खोल्या पैकी एक खोली तुला राहायला देतेरूम शेणाने सारवायचीच का असेना पण राहायला जागा मिळाली त्यामुळे मन हलकं झालं.  तेवढ्यात मुले बोलवायला आली मॅडम तुम्हाला तो ऑटोवाला  लवकर बोलवत आहे.
        अशाप्रकारे त्या शाळेच्या पहिल्या दिवशी तेथेच राहून नोकरी करायची असे ठरवलेत्या गावात दोन दोन दिवस लाईट नसायचीसाधा फोन करायचा म्हटलं तर तीन किलोमीटर गावा बाहेर यावे लागत असेअशा गावात राहायचे ठरवले.  त्यावेळी एक विचार मनात येत होता की,  माझ्या आई-वडिलांना काय वाटत असेल की, 'आपली मुलगी एकटी, एवढ्या लांब आपल्याला सोडून राहणार, त्यात तिच्याशी साधा फोनवर कॉन्टॅक्ट सुद्धा होणार नव्हता, जेव्हा ती रेंजमध्ये येईल तेव्हा ती सुरक्षित आहे हे त्यांना समजायचे.'  हा सगळा विचार करून मन धीट केले.  आपली मुलगी आणि तिची नोकरी सुरक्षित राहील हा विचार करून बप्पांनी मला त्याच गावात रहा असे सांगितलेकारण एक प्लस पॉइंट होता, शाळा खूपच छान होती, आणि गावातली माणसं पण खूप मायाळू होतीसर्व परिस्थितीचा आढावा घेऊन पसारा घेऊन येण्यासाठी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
 हा माझा नोकरीचा पहिला दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण जो कधीही विसरता येणार नाहीधन्यवाद.
रोहिणी शरदराव पवार
प्रा. शि. जि.प.शाळा मुलांची ताडकळस       
    ता.पूर्णा जि.परभणी     
मोबाईल नंबर 9067068383
E mail :- rohini.p9783@gmail.com





उपसंपादक : संतोष सेलूकर
परभणी 7709515110