‘उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या मराठी विषयामधील स्वलेखन कौशल्यांचा अभ्यास’

                                                                                                                    संतोष राजेश्वरराव सेलूकर

रिसर्चस्कॉलर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड email santosh.selukar@gmail.com

मार्गदर्शक –

  प्राचार्य व्हि.पी.मोरे ,शंकरराव सातव कॉलेज ऑफ एज्युकेशन कळमनुरी जिल्हा हिंगोली.

Rounded Rectangle: Abstract: सारांश  लेखन कौशल्य एक असे कौशल्य आहे की त्यामधून व्यक्तीच्या पूर्णत्वाचा अविष्कार त्यातून दिसून येतो.लेखन करणे म्हणजे श्रवण, भाषण, वाचन व त्यानंतरची अंतिम श्रेणी म्हणजे लेखन होय. लेखनामध्ये अनुलेखन अर्थात पाहून लिहिणे ,श्रुतलेखन म्हणजे ऐकून लिहिणे या बाबी म्हणजे प्राथमिक पाय-या होत.त्यापुढील पायरी म्हणजे सृजनात्मक लेखन होय.सृजन अर्थात नवनिर्मिती करणे याचाच अर्थ स्वकल्पनेने अथवा स्वविचाराने नवीन मांडणी करणे मग ती कवितेच्या रूपात असेल किंवा कथेच्या स्वरूपात असेल.यासाठी देखील त्या मनाची,विचारांची तसेच कल्पनेची निर्मिती व्हावी अशी परिस्थिती  उपलब्ध केली पाहिजे.थोडी पूर्वतयारी केली तर नक्की विद्यार्थ्यांचे स्वलेखन प्रभावी व वाचनीय होऊ शकते तसेच स्वलेखनाला चालना मिळू शकते. 
       प्रस्तुत संशोधन हे उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्य विकसनासाठी काही विशिष्ट उपक्रम राबविल्यामुळे त्यांच्या स्वलेखनातील उणिवा दूर होऊन प्रभावी लेखन कौशल्य विकसित करता येते याबाबतचे आहे.संशोधकाने उच्च प्राथमिक स्तरावर प्रगत शैक्षणिक कार्यक्रम अंतर्गत पायाभूत चाचणी घेण्यात येते. त्यात स्वलेखन क्षेत्रात कविता आणि कथा लेखन करण्याबाबत प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांच्या बाबत प्रस्तुत संशोधन असून हे प्रश्न स्वलेखनावर आधारित असतात.ज्यांनी ही पूर्व तयारी केली त्यांचे याबाबत लेखन कौशल्य सुधारले असून याबाबत वाटणारी भिती कमी झाली आहे.मुले खूप चांगल्या प्रकारे कथा, कविता, स्वकल्पनेने विचार मांडणे या बाबी आत्मविश्वासाने आणि सहजपणे करू शकतात.त्यामुळे भाषेच्या अध्यापनात या संशोधनाचे खूप महत्त्व आहे.स्वलेखन अर्थात स्वत: काही तरी निर्माण करणे खरं तर ही गोष्ट तशी खूप कठीण आणि सर्वंच विद्यार्थ्यांना भिती निर्माण करणारी असते परंतु याबाबतीत काही विशिष्ट पध्दतीने आपण उपक्रम राबविले सातत्य ठेवले आणि सराव आणि मार्गदर्शनाचे सत्र आयोजित केले तर ही गोष्ट अगदी सहज होऊन जाते.मुलांना फक्त तशा प्रकारच्या लेखन संधी आणि परिस्थिती उपलब्ध करून द्यायला हवी लेखनात खरं तर श्रवण, भाषण, वाचन ही कौशल्येही समाविष्ट असतात.तसेच लेखनातून मनाचा कल ,आवड,विचार,व्यक्तिमत्व ही लक्षात येते. असे हे सर्व समावेशक असे कौशल्य आहे. म्हणूनच या कौशल्यामध्ये संशोधनास खूप वाव आहे. त्यामुळे हे संशोधन हाती घेण्यात आले आहे. मुले जास्तीतजास्त नैसर्गिक पध्दतीने कशी व्यक्त होतील यासाठी वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे.तसेच त्यांच्या आविष्कारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे व त्यांच्याकडून दर्जेदार लेखन निर्माण होणे यासाठी हे संशोधन उपयुक्त आहे. स्वहस्ताक्षरात विद्यार्थी कविता,कथा,निबंध लेखन करतात व त्याची इमेज वाटसॲप ग्रुपव्दारे शेअर करतात.त्यातून त्यांच्या लेखनाची समीक्षा करून त्यातील प्रमुख उणिवा हाइलाईट करून त्यात सुधारणा करून  चांगल्या लेखनाला प्रसिध्दी दिली जाते.स्वलेखन कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्नपूर्वक काही कार्यक्रम  राबविल्यानंतर त्यांच्या स्वलेखनात प्रगती दिसून आली आहे
•	Key Words: उच्चप्राथमिक स्तर :- मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम 2009  नुसार शाळेचे विविध स्तर दिलेले आहेत. त्यात प्राथमिक स्तर 1 ली ते 5 वी व उच्चप्राथमिक स्तर 6 वी ते 8 वी  वर्गासाठी संबोधला जातो.
•	स्वलेखन:- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या गुणवत्ता विकासाच्या कार्यक्रमात   वर्षभरात तीन चाचण्याचे आयेजन केले जाते.सदरील चाचणीत भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेत स्वलेखन याबाबत प्रश्न असतो

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


·         INTRODUCTION:(11BOLD)  प्रस्तावना  :- लेखन कौशल्य असे कौशल्य आहे की त्यातून व्यक्तीच्या पूर्णत्वाचा आविष्कार लक्षात येतो.श्रवण भाषण व वाचनानंतरची मूलभूत कौशल्यातील अंतिम पायरी म्हणजे लेखन कौशल्य होय. जसेच्या तसे पाहून लिहिणे म्हणजे अनुलेखन तसेच ऐकून लिहिणे अर्थात श्रुतलेखन होय. आजच्या या संगणकाच्या आणि डिजिटल युगात लेखन करणे ही बाब तर अत्यंत दुर्मिळ झालेली आहे.सर्व लोक टाईप करतात.पण लेखन करणे आणि टाईप करणे यात खूप अंतर आहे.तुलनेने टाईप करणे लेखनापेक्षा सोपे आहे.याचाच अर्थ असा होतो की स्वलेखन करणे ही बाब सर्व कौशल्यांपेक्षा अधिक गुंतागुंतीची आहे तसेच प्रयत्नपूर्वक साध्य होणारी आहे.सहज साध्य होत नाही हे या ठिकाणी स्पष्ट होते.आपण सध्या लॉकडाऊन मध्ये साधारणपणे दोन महिण्यापासून घरातच असून शाळा ,कॉलेज यासारख्या सर्व शिक्षण संस्था बंद असून शक्य तेवढया मार्गाने डिजिटल माध्यमातून घरी राहून शिक्षण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत.स्वलेखन कौशल्य अर्थात मुलांने स्वत: कल्पना करून स्वनिर्मित कथा,कविता इतर साहित्यप्रकार याव्दारे आविष्कार करणे याचा अभ्यास या प्रस्तुत संशोधनात संशोधकाने केलेला आहे.याचा अर्थ डिजिटल युगाला विरोध आहे असा नसून विद्यार्थी हा स्वलेखन स्वत: करून तो डिजिटल माध्यमाचा वापर प्रसिद्धीसाठी करणारच आहे.त्याला मार्गदर्शन डिजिटल माध्यमाव्दारेच मिळणार आहे.परंतु मूळ लेखन मात्र विद्यार्थ्यांना स्वहस्ताक्षरातच करायचे असून त्याची इमेज मात्र डिजिटल माध्यमाव्दारे पाठवायची आहे.या संशोधनात अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या कथा, कविता एकत्र करून त्याची इमेज फाईल बनवली आणि प्रसिद्ध केली.यामध्ये स्वहस्ताक्षर,स्वकल्पना,स्वमांडणी, स्वविचार तसेच स्वप्रेरणा,स्वत:चा कल या बाबी वाचकाच्या लक्षात आल्या.यावरून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज देखील येतो .विद्यार्थी सुध्दा किती चांगल्याप्रकारे वाचक आणि लेखक होऊ शकतात याचा अनुभव ही हे संशोधन करातांना आला.मुलांचे स्वलेखन वाचनीय व प्रभावी होऊन मुलांच्या स्वलेखनास चालना मिळवून देण्यासाठी प्रस्तुत संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे.यापूर्वी  असा प्रयत्न फारसा कुणी केल्याचे आढळून येत नाही.नामदेव माळी (शाळकरी मुलांच्या कविता) तसेच तृप्ती अंधारे (दफ्तरातल्या कविता) अशी दोन पुस्तके  वगळता विशेष असे मुलांच्या कविता एकत्र करून प्रसिद्ध करण्याचे काम कुणी केल्याचे आढळून येत नाही.त्यामुळे मुलांच्या कविता एकत्र करणे व प्रसिद्‌ध करणे एवढाच प्रस्तुत संशोधनामागचा हेतू नसून त्यांच्यात स्वलेखन प्रेरणा कशी निर्माण होते,एखाद्या घटनेकडे ती कशी पाहतात ?विचार, कल्पना, भावना,मांडणी कशी अवगत होत राहते त्यात काही विशिष्ट टप्पे येतात.या सर्व गोष्टीचा सूक्ष्‌म अभ्यास प्रस्तुत संशोधनातून केला आहे.

     स्वलेखन अर्थात सृजनात्मक लेखन ही गोष्ट फक्त वर्गात पारंपारिक पध्दतीनेच शिकवावी लागते, या गोष्टीला छेद देऊन प्रस्तुत संशोधन हे मुले स्वलेखनातून कसा आनंद मिळवतात स्वलेखनातून त्यांचे सृजनशील शिक्षण कसे घडते याविषयी अभ्यासाने आणि मुलांच्या स्वलेखनावरून काही  निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत.त्यात स्वलेखन शिकण्यासाठी पारंपरिक पध्दतीने वर्गात फेस टू फेस टू लर्निगची आवश्यकता नाही मुले ही गोष्ट सहजपणे शिकू शकतात.हे अनेक लेखक आणि कवी यांच्या मुलाखतीतून लक्षात येते की ते स्वप्रयत्नातून ते कसे लेखक झाले.लेखनातूनच व्यक्तिमत्त्व विकास होतो.संशोधकाने प्रस्तूत संशोधकाने परभणी जिल्ह्यातील उच्चप्राथमिक वर्ग असणा-या 100 जि. प. शाळा रॅन्डम पध्दतीने निवडल्या.त्यातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणीतील मुलांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका एकत्र केल्या.तयात स्वलेखनावर आधारित स्वनिर्मित कथा व स्वनिर्मित कविता ह्या दोन बाबी संशोधनासाठी उपयुक्त डाटा म्हणून घेतला.त्यात निकषानुसार किती मुलांनी लेखन केलेले आहे.याचा अभ्यास केला स्वलेखनाचा अभ्यास करतांना अनेक सूक्ष्म गोष्टीही पहायला मिळाल्या.विद्यार्थ्यांचे निरिक्षण किती चांगले असू शकते तसेच त्यांच्या स्वलेखनावर त्यांच्या शिक्षक पालक यांचा किती प्रभाव असतो.तयासाठी शिक्षक म्हणून पालक म्हणून त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे समजते.

शेवटी असेच म्हणावे वाटते की धन्य  ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे.स्वलेखनातून संस्कार होतात.स्वलेखन म्हणजे व्यक्तिमत्त्वविकास होय यामधून विद्यार्थ्यांचे आत्मबल वाढते,समस्या निराकरण, निर्णयक्षता,चिकीत्सक विचारसरणी,समीक्षणात्मक दृष्टीकोण इ जीवनकौशल्ये ही स्वलेखनाबरोबरच विकसित होत जातात हे प्रस्तुत संशोधनातून सिध्द होते.ह्या जीवनकौशल्यावरच तर पुढील त्यांचे आयुष्य भक्कमपणे आकार घेते.उच्‌च प्राथमिक स्तरावर स्वलेखन कौशल्यांचा विकास अर्थात सृजनात्मक शिक्षणात फेस टू फेस लर्निगपेक्षाही लर्न फ्रॉम होम ही संकल्पना चांगली यशस्वी होतांना दिसते.यात विद्यार्थ्यांच्या कडे जरी प्रसिद्धीचे डिजिटल डिव्हाइस नसेल तरीही शिक्षकांच्या मदतीने प्रसिद्धी करता येते व मुलांना त्या कौशल्याचा विकास करता येतो.स्वलेखन करण्यासाठी मुलांना पारंपारिक फेस टू फेस मोड पेक्षाही लर्न फ्रॉम होम मोडव्दारे विनाआडथळा स्वलेखन कौशल्य अवगत करू शकतो.सृजनात्मक शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वलेखन कौशल्याचा विकास करणे.यात केवळ आंतरक्रिया मोबाइल,लॅपटॉप व इतर डिजिटल डिव्हाइस व्दारे होते.त्यात लिहिलेले निबंध,कथा,कविता यांच्या इमेज रिड करणे व त्यावर त्यांना अभिप्राय देणे व  सुधारणा घडवून आणणे.

 

LITERATURE REVIEW:

 

·        MATERIALS: साधने tools :-

संशोधनासाठी गृहीतकृत्याच्या आधारे माहिती गोळा करण्यासाठी योग्य अशा साधनांची आवश्यकता असते. विश्लेषण व अर्थनिर्वचन करून संशोधनाचे निष्कर्ष काढण्यासाठी गुणात्मक व परिणामात्मक अशा दोन्ही साधनांची गरज असते. गुणात्मक माहितीबरोबरच संख्यात्मक माहितीही संशोधनासाठी उपयुक्त असते. संशोधनासाठीची माहिती प्राप्त करण्यासाठी प्रस्तुत संशोधकांनी प्रश्नावली हे साधन निवडले आहे. सदरील संशोधनाच्या उद्दिष्टानुसार प्रश्नावली हेच साधन विश्वासार्ह आहे तसेच वैध साधन असून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या स्वलेखन कौशल्याबाबत माहिती प्राप्त करून घेणे संशोधकांच्या दृष्टीने व्यवहार्य आहे. त्यामुळे प्रश्नावली तयार करण्यात आली. प्रस्तुत प्रश्नावली विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांद्वारे पोचविण्यात आली. लेखनावर आधारित चार शब्द देऊन कथा लेखन करणे, तसेच मुक्त कविता या प्रश्नांचा समावेश करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांबाबत व्यक्तिगत माहिती जसे की आवड व लेखनाबाबत समस्या अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता.

·         प्रश्नावली प्रश्नप्रकार :- मर्यादित वेळेचे बंधन नसलेली मुक्तोतरी प्रश्नप्रकारातील प्रश्नावली एकूण प्रश्न संख्या 10 तसेच प्रश्नावली निवडक विद्यार्थ्यांना देऊन त्यातील उणिवा दूर करून आवश्यक ते बदल त्यात करून व प्रमाणित व यथार्थ करण्यात आली.

·         कविता 10 गुण, निकष संख्या 10

·         कथा गुण 10 ,निकष संख्या 10

·         निबंध 10 गुण, निकष संख्या 10

·         लघुत्तरी प्रश्न 7, गुण 20

·         एकूण 10 प्रश्न, 50 गुण

·         प्रदत्त संकलन व विश्लेषण:- data collection and anylysis  

प्रस्तुत संशोधनासाठी प्रदत्त संकलनाचे काम निवडलेल्या शाळांमधील शिक्षकांच्या मदतीने तयार केलेल्या व्हाट्सअप ग्रुप द्वारे प्रश्नावली देण्यात आली. तसेच प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी देण्यात आला होता. उत्तरे विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात फुल साइज A- 4 कागदावर लिहिण्याबाबत सूचना देण्यात आली होती. लिहिलेली उत्तरपत्रिका शिक्षकांच्या मदतीने इमेज स्वरूपात व्हाट्सअप द्वारे स्वीकारण्यात आली. त्यावर नाव शाळा व आवश्यक माहितीसह सर्व प्राप्त माहितीचे विश्लेषण करण्यात आले माहिती संकलनात विलंब तसेच प्रश्नावली न पोहोचणे, इमेज स्पष्ट न येणे, हस्ताक्षर न समजणे, लेखनाबाबत उदासीनता, सूचना व्यवस्थित न वाचता गोष्ट तयार करणे, अर्धवट व संबंधित प्रश्नांची उत्तरे देणे, या प्रकारच्या समस्या होत्या व त्यासाठी अधिक वेळ व परिश्रम पूर्वक प्रयत्न करून त्यावर मात करण्यात आली

 

METHOD: व्यवहारात सर्वात प्रचलीत असलेली ही संशोधन पद्धती असून मराठी विश्वकोश अनुसार 1961 सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक किंवा इतर क्षेत्रातील विविध समस्यांच्या अभ्यासाकरिता सर्वेक्षण करून आकडेवारी व माहिती विशिष्ट तत्त्वानुसार प्रातिनिधिक नमुना यांच्या स्वरूपात गोळा करण्याच्या व तिचे विश्लेषण करून त्यावर अनुमान व निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला सर्वेक्षण म्हणतात. सर्वेक्षणात व्यक्तीचा स्वतंत्र अभ्यास केला जात नाही त्या -त्या गटाच्या किंवा जनसंख्येच्या वैशिष्ट्यांचा एकत्रितपणे विचार केला जातो .

वर्णनात्मक संशोधनाच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे शोधावी

1)       संबंधित शैक्षणिक समस्येबाबत आजची परिस्थिती काय आहे ?

2)       निश्चित अडचणी व त्रुटी उणिवा कोणत्या आहेत ?

3)       मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध तज्ञांची मते घेऊन व संशोधकाने स्वतःचे ज्ञान व अनुभव विचारात घेऊन समस्येवर कोणता उपाय शोधला?

·         सर्वेक्षण पद्धतीत माहिती संकलित केली जाते तसेच त्यात प्रयोगशीलता व त्यातून अनुमान काढण्याची प्रवृत्ती आढळते सर्वेक्षण म्हणजे प्रचलित तथ्यांचे संकलन, वर्णन, स्पष्टीकरण आणि मूल्यांकन होय.

·         वैशिष्ट्ये                                                                                                                                                                     1)मूलभूत स्वरूपाची माहिती जमा केली जाते.

  2) आवश्यक माहिती प्रश्नावली व कसोट्या सारणी या साधनाने जमा केली जाते

  3)त्या माहितीचे योग्य पद्धतीने साधारणीकरण करून त्यातून सखोल संशोधनासाठी अर्थनिर्वचन केले

            जाते.

1)प्रस्तुत संशोधनात परभणी जिल्ह्यातील उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचे स्वलेखन सर्वेक्षण करून सद्यस्थितीचा आढावा घेतला असता असे दिसते की जन प्रवाहाची प्रवृत्ती घेणे हा संशोधनाचा प्रमुख हेतू आहे त्यामुळे या संशोधनासाठी सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग करण्यात आला.

2)प्रस्तुत संशोधनामध्ये विद्यार्थ्याचे स्वलेखन सद्यस्थितीचा शोध घ्यावयाचा आहे शिक्षकांना हे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी काही समस्या आहेत का हे पाहण्यासाठी सर्वेक्षणा सारखी दुसरी उपयुक्त पद्धती नाही.

3)स्थानिक परिस्थिती प्रश्नावली पडताळा सूची या साधनाद्वारे समजून घेता येते त्यामुळे या संशोधनासाठी सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग केला जातो.

4)प्रस्तुत संशोधनासाठी व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्व लेखनाबाबत मार्गदर्शन करून त्यांच्या मनातील स्वलेखन आची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी संच निर्मिती केली

संशोधन आराखडा

प्रथम स्वलेखन कौशल्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पायाभूत चाचणी च्या उत्तरपत्रिका मधील स्व अभिव्यक्ती प्रश्नांची उत्तरे किती विद्यार्थ्यांनी सोडविली आहेत त्याचा कच्चा डाटा शिक्षण विभागाकडून प्राप्त करून घेणे

·         प्राप्त कच्चा डाटा वर्गीकृत करणे व त्याचे विश्लेषण करणे.

·         तयार झालेल्या विश्लेषणावरून स्वलेखन कार्यक्रम संच विकसित करणे

·         इतर साहित्यिक व शिक्षणतज्ञ ह्यांच्या मदतीने स्वलेखन कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया घेऊन आवश्यक त्या सुधारणा करणे.

·         तीन महिने दररोज प्रस्तुत संच व्हाट्सअप ग्रुप च्या द्वारे विद्यार्थी व शिक्षकांना पर्यंत एक एक प्रकरण दररोज याप्रमाणे पोहोचविणे.

·         वेळोवेळी सर्वमान्य असणाऱ्या लेखन व वाचन टिप्स ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे.

·         स्वलेखन प्रेरणा विद्यार्थ्यांना देण्यासाठी सक्सेस स्टोरीज विद्यार्थ्यांना शेअर करणे.

·         सातत्याने पाठपुरावा करून लेखन कार्यशाळांमधून विद्यार्थी स्वलेखन कौशल्याबद्दल आवाहन करणे.

कार्यपद्धती

·         प्रथम मुलांची सद्यस्थिती जाणून घेतली (आधार पायाभूत चाचणी उत्तरपत्रिका स्वअभिव्यक्ती बाबत प्रश्न)

·         नैसर्गिक पद्धतीने मुले व्यक्त होण्यासाठी ग्रुप तयार करून प्रेरणादायक उदाहरणे देऊन वातावरण तयार केले.

·         चार शब्द देऊन त्यावर कथा तयार करणे व स्वनिर्मित कविता तयार करून स्वहस्ताक्षरात लेखन करून विद्यार्थी आपले साहित्य इमेज स्वरूपात ग्रुप वर पाठवतील.

·         प्राप्त स्वलेखन काळजीपूर्वक वाचून त्याची चार गटात निकषानुसार विभागणी केली जाते.

·         प्राप्त साहित्याचे विशिष्ट विषयानुसार व दर्जानुसार वर्गीकरण करून त्या साहित्यातील तांत्रिक चुका तसेच शुद्धलेखनाच्या उणिवा हायलाईट करून विद्यार्थ्यांना परत पाठवणे व दुरुस्ती करून परत स्वीकारणे.

·         विद्यार्थ्यांनी तयार केलेले सर्व लेखन इतर मुलांसाठी प्रेरणा म्हणून विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोचविले.

·         स्वलेखन एकत्रित करून त्यांचे पीडीएफ बुक करून विद्यार्थ्यांपर्यंत ग्रुप द्वारे शेअर करून विद्यार्थी प्रतिक्रिया संकलित केल्या.

·         प्राप्त दर्जेदार कथा व कविता यांचा संग्रह करून प्रसिद्ध करणे व स्वलेखन कौशल्य बाबत किती टक्के विद्यार्थी उत्तम लेखन करू शकतात याबाबत निष्कर्ष काढले.

·         स्वप्रेरणा, अनुभव, प्रसंगावधान, सराव, वाचन, शब्दसंग्रह, विचार, मार्गदर्शन हे घटक लेखन कौशल्यावर परिणाम करतात

·         सामान्य मुले व बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक प्रभावी लेखन करू शकतात.

·         पुस्तकी अनुभवापेक्षा खऱ्या जगण्यातील अनुभव व लेखनासाठी अत्यंत प्रभावी आहेत.          

DISCUSSION: फलिते आणि चर्चा : स्वलेखनाबाबत सद्यस्थितीचा आढावा घेणे :- स्व लेखनाबाबत सद्यस्थितीचा आढावा  घेण्यासाठी पायाभूत चाचणी मधील व लेखनकौशल्य बाबतच्या उत्तरांचे दोन प्रश्नांचे विश्लेषण पुढील प्रमाणे आहे

ANALYSIS:  सारणी सारणी क्रमांक 1 कार्यक्रम राबविल्यानंतर चा तक्ता

1 क्रमांक 1 कथा वरून लक्षात येते की  स्वलेखन कौशल्य बाबत सद्यस्थिती बदलणे आवश्यक  आहे. प्रश्न सोडविणा-यांची संख्या कमी असून त्यात वाढ होणे गरजेचे आहे. सद्यस्थिती अत्यंत विदारक चित्र स्पष्ट करते. स्वलेखन प्रश्न अवघड असल्याचे निरीक्षण देखील नोंदविले गेले आहे.

2  कविता:- वरील सारणी क्रमांक 1 वरून लक्षात येते की स्वलेखन कौशल्य कविता बाबत सद्यस्थिती बदलणे         आवश्यक आहे. प्रश्न सोडविणा-यांची संख्या कमी असून त्यात वाढ होणे गरजेचे आहे. सद्यस्थिती अत्यंत विदारक चित्र स्पष्ट करते स्वलेखन, कवितालेखन अवघड असल्याचे निरीक्षण देखील नोंदविले गेले आहे.

3 निबंध :- वरील सारणी क्रमांक 1 वरून लक्षात येते की स्वलेखन कौशल्य निबंध बाबत सद्यस्थिती बदलणे आवश्यक आहे प्रश्न सोडविणा-यांची संख्या कमी असून त्यात वाढ होणे गरजेचे आहे. सद्यस्थिती अत्यंत विदारक चित्र स्पष्ट करते स्वलेखन प्रश्न निबंध लेखन अवघड असल्याचे निरीक्षण देखील नोंदविले गेले.

सारणी सारणी क्रमांक 2 कार्यक्रम राबविल्यानंतर चा तक्ता

ANALYSIS:

१)      क्रमांक 1 कथा वरून लक्षात येते की स्वलेखन कौशल्य बाबत सद्यस्थिती सकारात्मक बदलली आहे. प्रश्न सोडविणा-यांची संख्या वाढली असून प्रस्तुत बदल हा मार्गदर्शक संच वापरल्यामुळे स्वलेखन कौशल्य कथा लेखनात प्रगती झाली आहे

२)      क्रमांक 2 कविता वरून लक्षात येते की स्वलेखन कौशल्य बाबत सद्यस्थिती सकारात्मक बदलली आहे. प्रश्न सोडविणा-यांची संख्या वाढली असून प्रस्तुत बदल हा मार्गदर्शक संच वापरल्यामुळे स्वलेखन कौशल्य कविता लेखनात प्रगती झाली आहे

३)      क्रमांक 3 निबंध वरून लक्षात येते की स्वलेखन कौशल्य बाबत सद्यस्थिती सकारात्मक बदलली आहे. प्रश्न सोडविणा-यांची संख्या वाढली असून प्रस्तुत बदल हा मार्गदर्शक संच वापरल्यामुळे स्वलेखन कौशल्य निबंध लेखनात प्रगती झाली आहे

 

 

FINDINGS:       निष्कर्ष

1   ) उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या स्वलेखन कौशल्य सद्यस्थितीचा शोध घेतला असता अधिकांश विद्यार्थ्यांना स्वलेखन कोशल्य अवगत नाही

2   ) उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या स्वलेखनात उणिवा आहेत.

3   ) उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये स्वलेखन कौशल्य रूजविण्यात शिक्षकांना आडचणी आहेत.

4   ) उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या स्वलेखन कौशल्याबाबत त्यांच्या मनात भिती आहे.

5) मुलांच्या स्वलेखनास विविध डिजिटल माध्यमाव्दारे प्रसिद्धी दिल्यास त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो.

 6 ) मार्गदर्शन संचाचा वापर केल्यामुळे स्वलेखन कौशल्य विकसनात मदत होते.

 

RESULT:   उच्चप्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या स्वलेखनासाठी पुरेशा संधी व योग्य मार्गदर्शन

           केल्यामुळे त्यांच्या स्वलेखनात सुधारणा होते

RECOMMENDATIONS:

           

1        स्वलेखन कौशल्याच्या विकासाकरिता विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आवश्यक आहे.

2        स्वलेखन विकसन करिता स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात यावी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Figures/ Tables/Charts: सारणी क्रमांक 1

 

अनुक्रमांक

परीक्षेत बसलेली विद्यार्थी

चार शब्दा वरून कथा लेखन करणे हा प्रश्न सोडविलेली विद्यार्थी संख्या

चार शब्दा वरून कथा लेखन करणे हा प्रश्न न सोडविलेली विद्यार्थी संख्या

प्राप्त गुणांनुसार वर्गीकरण

10 गुणांपैकी 7 पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थी संख्या

10 गुणांपैकी 7 पेक्षा कमी गुण प्राप्त विद्यार्थी संख्या

10 गुणांपैकी 5 पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थी संख्या

10 गुणांपैकी 5 पेक्षा कमी  गुण प्राप्त विद्यार्थी संख्या

1 कथा

1357

878

479

249

346

196

87

टक्केवारी

64.70%

35.30%

28.36

39.41

22.32

9.91

2 कविता

1357

889

468

253

349

203

84

टक्केवारी

65.51%

34.49%

28.46

39.26

22.83

9.45

3निबंध

1357

906

451

226

412

217

51

टक्केवारी

66.76

49.78

24.94

45.47

23.95

5.63

 

Figures/ Tables/Charts: सारणी क्रमांक 2

 

अनुक्रमांक

परीक्षेत बसलेली विद्यार्थी

चार शब्दा वरून कथा लेखन करणे हा प्रश्न सोडविलेली विद्यार्थी संख्या

चार शब्दा वरून कथा लेखन करणे हा प्रश्न न सोडविलेली विद्यार्थी संख्या

प्राप्त गुणांनुसार वर्गीकरण

10 गुणांपैकी 7 पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थी संख्या

10 गुणांपैकी 7 पेक्षा कमी गुण प्राप्त विद्यार्थी संख्या

10 गुणांपैकी 5 पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थी संख्या

10 गुणांपैकी 5 पेक्षा कमी  गुण प्राप्त विद्यार्थी संख्या

1 कथा

1357

997

360

327

389

226

55

टक्केवारी

73.47%

26.53%

37.24

44.31

25.74

6.26

2 कविता

1357

1012

345

327

393

231

61

टक्केवारी

74.58%

25.42%

36.78

44.21

25.98

6.86

3निबंध

1357

1015

342

340

397

236

39

टक्केवारी

74.80

33.69

37.53

43.82

26.05

4.30

 

 

 

 

 

CONCLUSION / SUMMARY:

 

            स्वलेखन कौशल्य विकास विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासाचा भाग असून अभिव्यक्ती लिखित स्वरूपात असते त्यामुळें त्यात विविध कौशल्यांचा अंतर्भाव होतो.ही सर्व कौशल्ये ही परस्परांवर अवलंबून असतात.त्यामळे स्वलेखन कौशल्य विकासासाठी शिक्षकांचे प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती ही परिझाम करत असते.

 

·       REFERENCES:( APA / संदर्भ   (reference ) संदर्भ सूची :-

1)  माळी नामदेव संपादन : शाळकरी मुलांच्या कविता  (कवितासंग्रह)

2)  तृप्ती अंधारे : दप्तरातल्या कविता ( कवितासंग्रह) 

3)  आगलावे प्रदीप  (2000) संशोधन पध्दती व तंत्रे विद्याप्रकाशन,नागपूर

4)   जगताप ह.ना.(1994)  प्रगत शैक्षणिक तंत्रविज्ञान,नूतन प्रकाशन पूणे

5)  भितांडे वि.रा.(2006) शैक्षणिक संशोधन पद्धती,नूतन प्रकाशन पूणे

6)  आफळे आ.रा.(1978) शिक्षणाचे मानसशास्त्रीय अधिष्ठाण,श्री विद्याप्रकाशन पुणे

7)  संशोधनाची पंधरा पुष्पे (ऑगस्ट 2003)संपदान समिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

 

 

तो कोरोनाच होता

तो कोरोनाच होता

चुकवले अंदाज ज्याने तो कोरोनाच होता.
हुकवले मृत्यूपासून ज्याने तो कोरोनाच होता.

भरडून रोज गुळगुळीत आमुचे जाते
टकवले गिरणीस आमच्या ज्याने तो कोरोनाच होता.

देश जेंव्हा बंद होता बंद होती कमाई
धकवले व्यवहार ज्याने तो कोरोनाच होता.

मागमूसही नव्हता भितीचा जीवाला
 ढकलले दाढेत मृत्यूच्या ज्याने तो कोरोनाच होता.

गाव सोडून शहरी रमली होती माणसे
हाकलले शहरातून ज्यांना तो कोरोनाच होता.

बसून घरी आबर चबर खाण्यामूळे
वकवले भडाभडा ज्याने तो कोरोनाच होता

संकटात ही पांघरुन माणूसकीची भरजरी शाल
 चकवले आम्हास ज्याने तो कोरोनाच होता.

नेले हिरावून  प्रियजणांना आमच्यापासून दूर.
दुखवले रात्रंदिन ज्याने तो कोरोनाच होता.

आॅनलाईन क्लास मधील रटाळ शिकवणे ते
पकवले डोक्यास ज्याने तो कोरोनाच होता.

संतोष सेलूकर

टेस्टमोज चाचणी

Kavita desh

मुख्याध्यापकांचे केबिन 
दारावर नेमप्लेट लावलेली 
ग.दी कुलकर्णी एम ए एम एड 
थोडं आत गेलं की दिसतो 
खूप काही सोसलेला महात्मा गांधींचा फोटो 
त्याच्या बाजूला अखंड भारताचे चित्र डोळ्यासमोर घेऊन हसणारे पंडित नेहरू मोठ्या खिळ्याला जाड दोरीन बांधलेले असतात 
काचबंद चौकटीच्या आतून करारी बाण्याने 
पहात असतात नेताजी सुभाषचंद्र बोस 
मुख्याध्यापकही खिडकीतून न्याहाळत असतात सारे वर्ग बसल्या बसल्याच 
इतक्यात दोन मुलं केबिनमध्ये येतात 
"...सर माझ्या पुस्तकातला भारताचा नकाशा ह्या मन्याने फाडला....."
नकाशाचे तुकडे झालेले पाहून सर जाम चिडतात 
मुले पुस्तक घेऊन निघून जातात.
 नकाशा चे तुकडे टेबलावर तसेच पडलेले.. 
सर मनाशी म्हणतात "तुम्ही तुमचा भारत फाटल्याची तक्रार माझ्याकडे आणली;पण माझी भारत फाटल्याची तक्रार मी कुणाकडे घेऊन जाऊ..
 टेबलावरचे तुकडे वाऱ्याच्या झुळूकीने उडू लागतात..


संतोष सेलूकर
परभणी

शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांची शाळेला भेट

आज दि.15आॅक्टो20 गुरूवार रोजी 
🏵️🏵️🏵️*मा.*
*शिक्षणाधिकारी (प्रा).डाॅ सुचिता पाटेकर मॅडम*
 यांनी बलसा ता. पूर्णा येथे जि.प.शाळेला दु.
 3:00 वा.भेट दिली.सोबत 
*विठ्ठल भुसारे* *उप शिक्षणाधिकारी* जि.प.परभणी*हे होते.याप्रसंगी लाॅकडाऊन काळातील शिक्षण व उपक्रमांचा आढावा घेतला.मुलांशी संवाद साधला.सत्यपाल नाटकर व गायत्री डुबे या दोन विद्यार्थ्यांना मॅडमतर्फे  डिक्सनरी बक्षिस म्हणून दिली.मुलांचे भरभरून कौतुक केले.केंद्रस्तरीय आॅनलाईन क्लास बद्दलही मॅडमला माहिती दिली.बलसा शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती मॅडमला देण्यात आली.कन्हेया व सत्यपाल यांनी छान असे पुस्तक परीक्षण सादरीकरण केले.लगेच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुलांशी संवाद साधताना तळागाळातील विद्यार्थ्यांबद्दल तळमळ आणि शिक्षकांना कामासाठी प्रोत्साहन ह्या बाबी मॅडमच्या बोलण्यातून  सतत जाणवत होत्या.अतिशय प्रेरणादायी अशी आजची भेट ठरली.बलसा शाळेला यापूर्वी *मा.पृथ्वीराज बी.पी* सिईओ परभणी यांची 2018 मध्ये झालेली भेट अशीच अविस्मरणीय ठरली होती.त्याप्रमाणेच ही पाटेकर मॅडमचीही शाळा भेट मुलांच्या लक्षात राहिली.
याप्रसंगी कुंडलिक कांबळे सर,काळवीट मॅडम यांनी आॅनलाईन क्लास घेत असल्याची माहिती दिली.एकंदर मॅडम च्या आणि भुसारे साहेबांच्या भेटीमुळे नव्याने कार्य करण्याची उर्जा मिळाली.धन्यवाद

शब्दांकन
*संतोष सेलूकर*
मु.अ.बलसा ता.पूर्णा
जि.परभणी
आज दि.15आॅक्टो20 गुरूवार रोजी 
🏵️🏵️🏵️*मा.*
*शिक्षणाधिकारी (प्रा).डाॅ सुचिता पाटेकर मॅडम*
 यांनी बलसा ता. पूर्णा येथे जि.प.शाळेला दु.
 3:00 वा.भेट दिली.सोबत 
*विठ्ठल भुसारे* *उप शिक्षणाधिकारी* जि.प.परभणी*हे होते.याप्रसंगी लाॅकडाऊन काळातील शिक्षण व उपक्रमांचा आढावा घेतला.मुलांशी संवाद साधला.सत्यपाल नाटकर व गायत्री डुबे या दोन विद्यार्थ्यांना मॅडमतर्फे  डिक्सनरी बक्षिस म्हणून दिली.मुलांचे भरभरून कौतुक केले.केंद्रस्तरीय आॅनलाईन क्लास बद्दलही मॅडमला माहिती दिली.बलसा शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती मॅडमला देण्यात आली.कन्हेया व सत्यपाल यांनी छान असे पुस्तक परीक्षण सादरीकरण केले.लगेच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुलांशी संवाद साधताना तळागाळातील विद्यार्थ्यांबद्दल तळमळ आणि शिक्षकांना कामासाठी प्रोत्साहन ह्या बाबी मॅडमच्या बोलण्यातून  सतत जाणवत होत्या.अतिशय प्रेरणादायी अशी आजची भेट ठरली.बलसा शाळेला यापूर्वी *मा.पृथ्वीराज बी.पी* सिईओ परभणी यांची 2018 मध्ये झालेली भेट अशीच अविस्मरणीय ठरली होती.त्याप्रमाणेच ही पाटेकर मॅडमचीही शाळा भेट मुलांच्या लक्षात राहिली.
याप्रसंगी कुंडलिक कांबळे सर,काळवीट मॅडम यांनी आॅनलाईन क्लास घेत असल्याची माहिती दिली.एकंदर मॅडम च्या आणि भुसारे साहेबांच्या भेटीमुळे नव्याने कार्य करण्याची उर्जा मिळाली.धन्यवाद

शब्दांकन
*संतोष सेलूकर*
मु.अ.बलसा ता.पूर्णा
जि.परभणी

कविता माझा परभणी जिल्हा

*माझा परभणी जिल्हा*

माझ्या परभणी जिल्ह्याला, अजिंठ्याचा डोंगर माथा
झाडाझुडपांनी नटला इथे बालाघाटाचा पायथा

साऱ्या जगाताचीआई,वाहे गोदामाई भरून
जनाबाई संगे पांडुरंग देई दळण करून

पूर्णा दुधना चे पाणी मळे पिकवी भरात
कृषी विद्यापिठाचे धडे माती गिरवी जोरात


नरसिंहाच्या पोखरणीला भेटे साईबाबाची पाथरी
दर्गा सामावून घेतो जाती-धर्माच्या चादरी


वीज पुरविते आम्हा सिद्धेश्वर, येलदरी
जैन मंदिराचे वैभव नवागड ,नेमगिरी

मुदगलेश्वर स्थान हे वसे आमच्या मनात
जांभूळ बेटाचे नाव  राहे अमर या वनात

नका मानू उपेक्षित हिरे येथले अनमोल
माती थोर इथली ,काळी जमिन खोल

*संतोष सेलूकर*
परभणी 
७७०९५१५११०

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच


शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो 
ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पानं 
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या
अस्फुट चित्कांरांना 
किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी लटकलेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची निरागस अक्षरे 
शिक्षक नसतो कधीच बिचारा
तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा त्याच्याच स्वामीत्वाने महत्व येत असते शाळेला 
तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ नखशिखान्त अंधार भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून सूर्याचं तेज बाहेर काढणारा
तो समाज सुधारक क्रांती कारकही तोच कित्येक चेतनांना पाठबळ असते त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे 
शिक्षकाला जपावी लागतात कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाडआणि आकार द्यावा लागतो एका मुक्त पणे बागडणाऱ्या
निराकार चैतन्याला
...कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आतनिर्ममपणे...कधी अंधार ही प्यावा लागतो बिनबोभाटपणे 
तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर 
त्याच्या सोबतीला असतेच की खडूची धारदार तलवार अन फळ्याची ढाल असते पाठीशी 
विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल.
अन तेंव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल
संतोष सेलूकर
परभणी
७७०९५१५११०























































































































































































































कविता. कवी म्हणजे...

*कविता*
*कवी म्हणजे....*

कवी म्हणजे, कवी म्हणजे,कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो 

कधी गाणारा गवई असतो तर कधी 
उपदेश करणारा मौलवी असतो

कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो.
ग्रहता-यात चमकणारा रवी असतो


शहाणा म्हणावं तर वेड्या धुंदीत राहतो 
वेडा म्हणावं तर शहाणपणाच्या गोष्टी करतो 
कधी कधी तर शेकड्यास सवई असतो 

कवी म्हणजे, कवी म्हणजे,कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो.

कविला नसतात कधी नाती आपली- परकी काही 
प्रत्येक संवेदनेशी असते त्याने नाळ  जोडलेली  
कवी म्हणजे शब्द लेकरांची आई असतो.

कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो.

*संतोष सेलुकर* *परभणी*

AUGUST SHIKSHAN PARISHAD

शिक्षण परिषद केंद्र - कें.गणपूर. 
माहे:- आॅगस्ट
दि.13/08/2020 
अहवाल
🎤प्रास्ताविक. 

 ☘️संजय कांबळे केंद्रप्रमुख ,के प्रा शा गणपुर यांनी केले.

प्रमुख मार्गदर्शक

☘️प्रमुख उपस्थिती.मा.साबळे डी.डी.ग.शि.अ .पूर्णा☘️


☘️ विषय सहाय्यक श्रीमती भरोसे मॅडम बी.आर.सी.पूर्णा
यांनी दिनदर्शिकेचा वापर सर्वांनी करण्याबाबत .आवाहन केले. 
विजय माने ग्यानप्रकाश फाउंडेशन यांनी पालकाच्या सहकाऱ्यांनी मुलांचे अध्ययन होऊ शकते . असा विश्वास आपल्या वक्तव्या मधून सर्व शिक्षकांना दिला.

गट - 1 इ.1ली ते 5 वी
वेळ 11:00 ते 12:45

☘️सी.आर.जी.
1) मराठी - रुपाली आढाव यांनी शिक्षण परिषदेत प्रथमच आपला विषय मांडला त्याबद्दल केंद्रप्रमुख व सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
2) गणित - कुंडलिक कांबळे यांनी covid-19 या काळातील त्यांचे अध्यापनातील अनुभव व व विविध उदाहरणे देऊन गणित विषयाचा माहे ऑगस्ट चा अभ्यासक्रम व त्याची अंमलबजावणी याबद्दल विवेचन केले
3) इंग्रजी - मसारे मॅडम यांनी इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवता येतो हे स्पष्ट केले
4) प.अभ्यास -1 -महेश पवार यांनी आपले शालेय अनुभव व परिसर भाग 2 परिसर यांची सांगड घालून सहज शिक्षणातून मुले शिकतात याबद्दल सांगितले
5) प.अ.-2 -गर्दसवार मॅडम यांनी इतिहास कथन पद्धतीने व पालकांकडून मुले शिकू शकतात याबद्दल सांगितले

*गट 2 - इयत्ता 6 ते 8 दुपार सत्र
मार्गदर्शन
☘️साधनव्यक्ती व्यंकट रमण जाधव यांनी दुपार सत्रात मार्गदर्शन केले
 
सी. आर.जी.
1) मराठी - दिलीप शृंगारपुतळे सर मराठी साहित्य व कविता यांची ओळख करून देण्यासाठी पालकांची मदत घेता येते हे स्पष्ट केले
2) गणित - विलास कांबळे यांनी गणित विषय आपण मुलांपर्यंत वेगवेगळ्या प्रात्यक्षिक द्वारे सोपा करून समजावून देऊ शकतो
3) इंग्रजी -सेलूकर सर इंग्रजीचा वगळलेला अभ्यासक्रम स्पष्ट केला व काही इंग्रजीच्या कृतीबाबत माहिती दिली
4) विज्ञान -दिपक शिंदे यांनी छोट्या प्रयोगाद्वारे विज्ञान विषय मुलांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवता येतो हे स्पष्ट केले.
5) सा.शास्त्र नागनाथ बिबेकर यांनी भूगोल विषय व दैनंदिन जीवन यांची सांगड घालता येते व मुलांचे  अध्ययन घडते हे स्पष्ट केले.
6) तंत्रस्नेही - बालाजी कदम सर यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले अध्ययन-अध्यापन सुलभ कसे करता येईल याबद्दल आपल्या विषयाची मांडणी केली.
शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक झुम वर उपस्थित होते व अत्यंत खेळीमेळीच्या व आनंदाच्या वातावरणामध्ये ही शिक्षण परिषद संपन्न झाली.केंद्रप्रमुख संजय कांबळे यांनी प्रशासकीय सूचना दिल्या व आपल्या केंद्राची यापुढील काळातील वाटचाल कशी असेल या बद्दल दिशा निश्चित करुन सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण न्यावे असे आवाहन केले.
शब्दांकन
संतोष सेलुकर प्रा.शा.बलसा

टिली मिली कार्यक्रम

*आज दिनांक 31/07/ 2020 रोजी बलसा गावामध्ये टिली मिली या शैक्षणिक कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व तसेच वेळ लक्षात राहावी यासाठी गावातील मुख्य ठिकाणी भिंतीवर कार्यक्रमाचे वेळापत्रक चिटकवले याप्रसंगी सुरेशराव डुबे शा.व्य.स अध्यक्ष व पालक ज्ञानेश्वर शिंदे यांनी सहकार्य केले व या निमित्ताने पालकांना भेटून या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले  सर्वांनी हा कार्यक्रम नियमित पहावा यासाठी आवाहन केले यासाठी शाळेतील तळमळीचे शिक्षक कांबळे सर यांच्याबरोबर गृहभेटी दिल्या मुलांच्या शिक्षणातील अडचणी समजून घेतल्या.शिक्षणाचे वेगवेगळे स्रोत आपल्या विद्यार्थ्यानां कसे उपलब्ध होतील याबाबत गावक-यांशी चर्चा केली.अनेक गावकरी व पालक सहकार्य करत आहेत कुणी आपला मोबाईल एक तास दुस-यासाठी देत आहे.मारोती डुबे या मुलांने आपला मोबाईल आपल्या शेजारील मुलांसाठी एक तास उपलब्ध करून दिला धन्यवाद मारोती डुबे  यांना आपले हे योगदान जि.प.शाळा कधीही विसरणार नाही. काही पालक टि.व्ही वरील कार्यक्रम मुलांसाठी लावून देत आहेत व आपल्या शेजारच्या मुलांना ज्यांच्या घरी टि.व्ही नाही त्यांना शिक्षण मिळत आहे हे कार्य ही खूप मोलाचे आहेत अशाच प्रकारे जर गावातील सर्व टि.व्ही मोबाईल धारक यांनी मदत केली तर बलसा गावातील आॅनलाईन शिक्षण नक्कीच यशस्वी होईल.असेच कार्य इतरांनीही करावे हीच अपेक्षा .मला खात्री आहे कोणीही पालक या कामाला नाही म्हणणार नाही धन्यवाद*
शब्दांकन
*संतोष सेलूकर*
*मु.अ.बलसा*