मुलांच्या कविता

गुगल फॉर्म चाचणी

चाचणी क्रमांक 1                                                        
चाचणी क्रमांक 2 
चाचणी क्रमांक 3        
चाचणी क्रमांक 4
चाचणी क्रमांक 5                                                        
 चाचणी क्रमांक 6              
चाचणी क्रमांक 7                                                        
चाचणी क्रमांक 8              
 चाचणी क्रमांक 9                                                      
 चाचणी क्रमांक 10          
 चाचणी क्रमांक 11                                                     
 चाचणी क्रमांक 12         
 चाचणी क्रमांक 13                                                     
  चाचणी क्रमांक 13            
चाचणी क्रमांक 14                                                      
चाचणी क्रमांक 15                                                  
 चाचणी क्रमांक 15                                                    
  चाचणी क्रमांक 16             
चाचणी क्रमांक 17                                                      
चाचणी क्रमांक 18          
चाचणी क्रमांक 19                                                      
चाचणी क्रमांक 20         
चाचणी क्रमांक 21                                                      
चाचणी क्रमांक 22       
चाचणी क्रमांक 23                                                      
चाचणी क्रमांक 24 
चाचणी क्रमांक 25                                                        


‘ नोकरीचा पहिला दिवस.....’

 नोकरीचा पहिला दिवस.....
आयुष्यात असे बरेच क्षण आहेत कीज्याविषयी लिहिता येईल आणि त्यातीलच हा एक अनुभव लिहिण्याचा छोटासा प्रयत्नमी रोहिणी शरदराव पवार. माझे मूळ गाव येडशी ता. जि. उस्मानाबाद. माझ्या वडिलांची परिस्थिती तशी बेताचीच. आम्हा चारही भावंडांना वडिलांनी खूप काबाडकष्ट करून शिकवले. माझ्यापेक्षा एक बहीण मोठीमी दोन नंबरची व दोन लहान भाऊ असा आमचा सुखी परिवार. वडिलांची इच्छा होती कि, सर्व मुलांनी खूप शिकावेपण मोठ्या बहिणीचे शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि ते स्वप्न मी पूर्ण करावे अशी वडिलांसोबत माझी इच्छा होतीगावातच बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन 2001 साली माझा रत्नागिरी जिल्ह्यात खाजगी डीएड कॉलेजला नंबर लागलाखाजगी कॉलेज असल्यामुळे इतर कॉलेज पेक्षा तेथील फी सुद्धा भरमसाठ होती. आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचे म्हणजे आमच्या परिस्थितीला झेपण्यासारखे नव्हतेकारण ती कुटुंबातील वेळ अशी होती की मोठ्या बहिणीचे लग्न व दोन लहान भावांचे शिक्षण पूर्ण करायचे होते. पण मोठ्या बहीणीचे शिक्षिका होण्याचे स्वप्न अधुरे होते आणि ते माझ्याकडून पूर्ण करण्याचा माझा आणि वडिलांचा प्रयत्न असल्यामुळे वडिलांनी परिस्थितीवर मात करून हात उसने पैसे घेऊन एकदाचं ऍडमिशन केले. सन 2003 साली डीएड पूर्ण झाले व पुढे तीन वर्षांनी तो दिवस उजाडला ज्यादिवशी मला नोकरीची ऑर्डर आली.
          दिनांक 3 मे 2006 या दिवशी जिल्हा परिषद औरंगाबाद येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्तीची ऑर्डर पोस्टमनने आमच्या घरी आणून दिलीत्यादिवशी तिसरी वेळ होती की, वडिलांनी माझ्यासाठी सर्वांना पेढे वाटले. पहिली म्हणजे सातवी स्कॉलरशिप होल्डर झाले म्हणूनदुसरी म्हणजे बारावीत मुलींमध्ये पहिली आले म्हणून आणि आज मी नोकरीला लागले म्हणून माझ्या वडिलांना तर एवढा आनंद झाला होता की त्यांना आकाश ठेंगणे वाटु लागले.
        मग तो अविस्मरणीय क्षण माझ्या आयुष्यातील नोकरीचा पहिला दिवस उजाडलातो म्हणजे 12 जून 2006बऱ्याचदा नोकरीच्या पहिल्या दिवशी घरून निघतांना दही साखरशिरा असे काहीतरी गोडधोड खाऊन पहिल्या दिवशी जॉइन होतात असे म्हणतातपण आमचे असे काही झाले नाही. मला मिळालेला जिल्हा औरंगाबाद तालुका सिल्लोड आणि शाळेचे गाव होते अंभई केंद्रातील शिरसाळा. नोकरी लागल्याचा आनंद मनात घेऊन, मी आणि माझे बाप्पा म्हणजे माझे वडील, आम्ही घरून भाजी पोळीचा डब्बा घेऊन 12 जूनला पहाटे वाजता येडशी येथून औरंगाबाद गाडीत बसलोसकाळची वेळ असल्याने आम्ही दहा वाजेपर्यंत औरंगाबादला पोहोचलोबस मधून चढताना उतरताना दरवेळी मला हे जाणवत होते की, डीएडच्या प्रवासा पासून प्रत्येक प्रवासात माझी बॅग उचलून माझा बाबा किती दमलाय ते...... त्यामुळे यापुढे असा त्रास त्यांना यापुढे होऊ द्यायचा नाही असे मनात ठरवून आम्ही औरंगाबाद वरून बारा वाजेपर्यंत सिल्लोड ला पोहोचलो.
     सिल्लोड मध्ये आल्यानंतर तिथले बस स्टँड पाहूनच मन उदास झाले. मग मी आणि वडील तिथे कुठल्या बसच्या  पाटीवर शिरसाळा हे नाव दिसतंय का हे शोधू लागलोपण कुठेच नाव दिसत नाही हे समजल्यावर तिथल्या बस डेपो मध्ये चौकशी केली. तेव्हा समजले की शिरसायाला फक्त दिवसात दोन वेळा गाडी जाते. एक सकाळी नऊ वाजता आणि दुसरी संध्याकाळी सहा वाजता, आणि ती पण मुक्कामी तिथेच जाते. मग आम्ही दोघांनी बस नसल्यामुळे जेवण करून घेतले व खाजगी वाहन कोठे मिळते का याची चौकशी करून त्या ठिकाणी पोहोचलो. त्याठिकाणी जाणाऱ्या जीप उभ्या होत्या. आणि तिथे गेल्यावर समजले की एक पॅसेंजर गाडी भरायला कमीत कमी दोन ते तीन तास लागतील आणि आम्ही दोन अडीच वाजेपर्यंत कसेतरी अम्भई म्हणजे माझी केंद्र शाळा येथे पोहोचलोतिथे केंद्रावर जॉईन झालेतेथील परिस्थिती पाहून सर्वजण असे म्हणत होते की, ही मुलगी शिरसाळयाला जाणार कशी एकटी राहील कशी? अवघड आहे हिचेआणि यांनी गाव बदलून घ्यायला पाहिजेपण आम्हाला नोकरी लागल्याचा आनंद आणि गाव बदलून मिळेल की नाही याची भीतीयामुळे आम्ही तिथून शिरसाळ्याला जाण्यास निघालोस्टॉप वर आलो तर एकही वाहन नाही मग जायचे कसे?  स्टॉप वरचे लोक म्हणू लागले गावात एकच जीप आहे आणि ती पण सकाळी दिवसातून एकदाच भरून येते आणि संध्याकाळी एकदाच वापस जाते मग मात्र जास्त टेन्शन येऊ लागलेपण तरी वडिलांना लोकांचे बोलणे प्रेरणा देत होतेकारण स्टॉप वरील शिरसाळ्याचे लोक म्हणत होते की बरं झाल आमच्या गावात मास्तरीन बाई आल्याआम्हाला कळतंय तस आतापर्यंत एकही मास्तरीन बाई आमच्या शाळेत आल्या नव्हत्याआणि वडिलांना सांगत होते की, "आमचे गाव खूप चांगले आहे. यांना काहीच त्रास होणार नाही". पण मला प्रश्न पडला होता की मी राहु कुठे एकटीलाच राहावे लागेल. अंभईला राहिले तर अप डाऊन कसे करू? असे माझे विचार चक्र सुरु होतेतोपर्यंत वडिलांनी एक रिक्षा ठरवला, आणि त्या रिक्षावाल्याने अंभईवरून शिरसाळा सहा किलोमीटर अंतर एकदा जाऊन परत येण्याचे दोनशे रुपये घेतले.
           मग काय मी आणि माझे बाप्पा माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी शाळेवर जॉईन व्हायला रिक्षाने निघालो. रिक्षात बसल्यावर माझ्या मनात एकच विचार गाव बदलून मिळेल का मिळवणे शक्य नाही कारण आपल्याला येथे ओळखीचं कोणीच नाही. आणि या बदलाबदली मध्ये  बाप्पाची आणखीनच परेशानी होईलआणि त्यात केंद्र शाळेवर  चर्चा ऐकली की, गाव फार डेंजर आहे बाबा. असे एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ करत होते. आणि तेवढ्यात सहा किलोमीटरचा प्रवास करून रिक्षा शिरसाळा गावात आला. गावाच्या सुरुवातीलाच शाळा. गावाच्या पुढे एक सिरसाळा तांडातेथील लोक लमाणी समाजाचे होतेमग तांड्यावर जायचे का इथेच थांबायचे हा पुन्हा प्रश्न पडला आणि  मग ऑर्डर वर पाहिलं तर शिरसाळा हे गाव होते म्हणून तेथेच उतरलो शाळेचे छोटेसे गेट, सुमारे तीन ते साडेतीन वाजण्याची दुपारची वेळ शाळेवर पोहोचायला झालीशिरसाळा मध्ये अगोदरच माहिती झाल्यामुळे सगळी मुले आनंदी होती कीआम्हाला नवीन मॅडम आल्या म्हणूनगेटमधून मी आणि बॅग अडकवलेले माझे बाप्पा आम्ही शाळेत प्रवेश केला दुपारचा लघु मध्यंतर होतामुले-मुली धावतच माझ्याकडे आली  आणि त्यातील बरीच मुले मला  Good Afternoon म्हणत होती. ती मुले आणि त्यांचा आनंद पाहून मला खूप आनंद झाला त्यांना Good Afternoon  म्हणून मी शाळेत सगळीकडे नजर टाकली. शाळेच्या दर्शनी भागात झाडेसुंदर मैदान, रंगरंगोटी त्यामुळे शाळा छान वाटलीआणि थोडसं मन रिलॅक्स झाले तिथे अगोदर तीन शिक्षक होतेआज पर्यंत लेडीज कोणीच नव्हतीत्या गावात शाळा सुरू झाल्यापासून पहिली शिक्षिका मीच होते त्यामुळे मला मॅडम कमी आणि ताई जास्त म्हणू लागले.
           मग मी ऑफिसमध्ये गेले मुख्याध्यापक श्री जंजिरे सर माझ्या वडिलांशी बोलले त्यांनी कागदी प्रोसेस सगळे अगोदरच पूर्ण करून ठेवलेली होती. मग आम्ही सही करण्याच्या अगोदर गाव बदलून मिळेल का याबाबत त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते असे म्हटले की मॅडम येथील सरपंचांनी अगोदर तालुक्याला सांगून ठेवले की, आमच्या येथे अगोदरच एकही मॅडम आल्या नाहीतआल्या त्या अशाच बदलून गेल्या.  त्यामुळे तुम्ही यांना गाव बदलुन देऊ नका मग म्हंटलं आता काय करावंएकदा जॉईन झाल्यावर पुन्हा लवकर गांव बदलून मिळेल याची शक्यता नव्हती पण तरीसुद्धा ते सर म्हणाले की मॅडम तुम्ही अगोदर जॉईन व्हा व नंतर प्रयत्न करा विचार करत करतच सह्या केल्या .मी माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी सही केलीतिथल्या केंद्र शाळेपेक्षा ही शाळा खूप छान वाटली शाळेत टापटीपपणा दिसून आला सगळी शाळा फिरून पाहिली, आता सर्वात मोठा प्रश्न होता राहायचे कुठे यासाठी गावात फिरून येण्यासाठी गेलोततर गावात कुठे रूम उपलब्ध नव्हती.  आता गावात राहण्याची सोय नाही. गावात अपडाऊनची सोय नाही.  आता काय करायचे? हा मोठा प्रश्न माझ्यापुढे पडला.  शाळेच्या गेटला लागूनच एक बाई राहत होती तिच्याकडे दोन खोल्या होत्या. आणि ती म्हटली की माझ्या दोन खोल्या पैकी एक खोली तुला राहायला देतेरूम शेणाने सारवायचीच का असेना पण राहायला जागा मिळाली त्यामुळे मन हलकं झालं.  तेवढ्यात मुले बोलवायला आली मॅडम तुम्हाला तो ऑटोवाला  लवकर बोलवत आहे.
        अशाप्रकारे त्या शाळेच्या पहिल्या दिवशी तेथेच राहून नोकरी करायची असे ठरवलेत्या गावात दोन दोन दिवस लाईट नसायचीसाधा फोन करायचा म्हटलं तर तीन किलोमीटर गावा बाहेर यावे लागत असेअशा गावात राहायचे ठरवले.  त्यावेळी एक विचार मनात येत होता की,  माझ्या आई-वडिलांना काय वाटत असेल की, 'आपली मुलगी एकटी, एवढ्या लांब आपल्याला सोडून राहणार, त्यात तिच्याशी साधा फोनवर कॉन्टॅक्ट सुद्धा होणार नव्हता, जेव्हा ती रेंजमध्ये येईल तेव्हा ती सुरक्षित आहे हे त्यांना समजायचे.'  हा सगळा विचार करून मन धीट केले.  आपली मुलगी आणि तिची नोकरी सुरक्षित राहील हा विचार करून बप्पांनी मला त्याच गावात रहा असे सांगितलेकारण एक प्लस पॉइंट होता, शाळा खूपच छान होती, आणि गावातली माणसं पण खूप मायाळू होतीसर्व परिस्थितीचा आढावा घेऊन पसारा घेऊन येण्यासाठी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
 हा माझा नोकरीचा पहिला दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण जो कधीही विसरता येणार नाहीधन्यवाद.
रोहिणी शरदराव पवार
प्रा. शि. जि.प.शाळा मुलांची ताडकळस       
    ता.पूर्णा जि.परभणी     
मोबाईल नंबर 9067068383
E mail :- rohini.p9783@gmail.com





उपसंपादक : संतोष सेलूकर
परभणी 7709515110

पाठ्यपुस्तके

सोमवार दि. १८ मे २०२० रोजी प्रकाशित होत आहे

या अंकात एका आईचा संदेश

बाळा, आज तू एक शिक्षक/शिक्षिका आहेस तेव्हा काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत.
प्रत्येक आईवडील आपला पोटचा गोळा तुझ्या हवाली करतो. त्याला आदर्श व्यक्ती म्हणून घडविण्याची जबाबदारी तुझी आहे, ते तुझे कर्तव्य आहेस ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 
जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील, बिघडतील हे सांगता येत नाही. मी आज तुला जे सांगत आहे, ते इतर कुणी कदाचित नाही सांगणार.
स्वत:साठी जगत असताना कायम इतरांचाही विचार कर. कारण स्वार्थाने भौतिक गोष्टी मिळवता येतात, पण आतंरिक समाधान त्यापलीकडे आहे आणि ते तू मिळवण्याचा प्रयत्न कर. तू जे काही करशील ते स्वत:शी प्रामाणिक राहून कर.
स्वत:चा विकास करत असताना सामाजिक भानही ठेव. समाजासाठी काहीतरी करण्याची संधी शोधत रहा.
आईपण आणि गुरुपण म्हणावं तेवढं सोपं नाही. विद्यार्थी आपले आचरण बघत असतात आणि ते स्वत: आचरणात पण आणत असतात. तेव्हा तू प्रत्येक कृती करताना ती विचारपूर्वक कर.
कुंभार जसे मडके घडवितो तसे तू विद्यार्थी घडव, कारण तीच तुझी खरी संपत्ती आहे, हे सदैव लक्षात ठेव. कोणी विचारले असता अभिमानाने तुला आपले कर्तुत्व सांगता आले पाहिजे. 
आईवडील आपली मुले तुमच्याकडे सोपवतात कारण त्यांचा तुमच्यावर आणि शाळेवर विश्वास आहे. बाळा, या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नकोस. स्वत:च्या मुलांप्रमाणे शाळेतील मुलांची काळजी घे. आजही गुरु हेच सर्वश्रेष्ठ दैवत मानणारे विद्यार्थी आहेत रे!.......
पूर्ण संदेश वाचायला विसरु नका.

संपर्क :
shikshak.dhyey@gmail.com

साप्ताहिक शिक्षक ध्येय हे दर सोमवारी प्रकाशित केले जाते


Join Telegram Channel :
https://t.me/shikshak_dhyey

आमच्या फेसबुक पेजला Like अवश्य करा :
https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/

आजच आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
https://chat.whatsapp.com/GZZP6JHWYK2Bfd8Ie895Ti

प्रशिक्षण वृतांत

*मूल्यवर्धन प्रशिक्षण गौर ता.पूर्णा* आज दि ३ आॅक्टो २०१९ रोजी ठिक १० वा कन्या पूर्णा,पिंपळा लोखंडे व गणपूर केंद्रातील १ ते ५ ला शिकविणारे ५० टक्के शिक्षकांचे बीट स्तरीय प्रशिक्षणास सुरूवात झाली.याप्रसंगी गौर शाळेचे मुअ पांपटवार सर व केंद्रप्रमुख मा.सय्यद सर उपस्थित होते . प्रास्ताविक साधन व्यक्ती व सुलभक श्री अंबुरे आर जी यांनी केले. प्रशिक्षण अपेक्षा बाबत सेलूकर एस.आर.यांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांची मते जाणून घेतली.प्रशिक्षण रुपरेषा, परिचय जीवनातील अविस्मरणीय क्षण सांगणे ,इ बाबत प्रशिक्षणार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.गणपूर केंद्राचे कें प्र संजय कांबळे यांनी मूल्यवर्धन बाबत ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यात येतील व योग्य प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम घेऊन जावा असे आवाहन केले.दुपार सत्रात भोजन अवकाशा नंतर अंबुरे आर. जी. यांनी मूल्यवर्धन आवश्यकता व स्वातंत्र्य ,समता व बंधुता बाबत उदाहरणासह स्पष्ट केले. दुपारी प्रशिक्षणास भेट देण्यासाठी महेश जाधव ता.समन्वयक व ढाले सर साधन व्यक्ती आले.त्यांनी प्रशिक्षण बाबत आढावा घेतला.तसेच प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. गौर शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षणासाठी सहकार्य लाभले. एकंदर प्रशिक्षणाचा पहिला दिवस संपन्न झाला.

कवी बाबासाहेब सौदागर

*'सामान्य माणूसच माझ्या लेखनाची प्रेरणा'- *चित्रपट गीतकार* *बाबासाहेब* *सौदागर*. दि.11/08/19 पेठशिवणी ता.पालम येथे विठोबा पाटील वाडेवाले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय गीतकार पटकथा लेखक बाबासाहेब सौदागर यांच्या शुभ हस्ते ग्रामीण साहित्यिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात बालाजी जाधव अंबड ,अनिता यलमट्टे उदगीर ,वसुंधरा सुत्रावे नांदेड यांचा समावेश होता. प्रास्ताविक शंकर वाडेवाले प्रसिध्द ग्रामीण कवी यांनी केले.मा.बाबासाहेब सौदागर यांनी आपला स्वतःचा संपूर्ण जीवनप्रवास लोकांसमोर मांडला.चित्रपट गीत लेखन करतांना आणि एकंदरच स्वतःचे स्थान निर्माण करतांना किती संघर्ष करावा लागतो हे सांगताना तर अगदी रसिकांचे डोळे पाणावले.ते म्हणाले ,"की ऐन संक्रांतीच्या दिवशी‌ पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून मी गाणं लिहायला कोल्हापूर कडे निघालो.तिथे जगदीश खेबुडकर गाणं जर त्यांना चांगलं वाटलं नाही तर तसाच कागद फाडून तोंडावर फेकतात असे मला कळले होते.म्हणून त्यांच्या समोर जाण्यांची हिम्मत होत नव्हती. मला एक अभंग लिहायला सांगितला.मी एक छान अभंग लिहून खेबुडकरांकडे गेलो.मनात खूप भीती होती.त्यांनी तो अभंग वाचला अन् म्हणाले मला माझ्या गादीचा वारसदार आज मिळाला.लिहीत रहा असा आशीर्वाद दिला. आता १०० पेक्षा अधिक चित्रपटांना मी गाणी लिहीली आहेत. सत्ताधिश चित्रपट स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला सुद्धा माझीच गाणी आहेत,हे सांगितल्यावर तर रसिकांनी त्यांना गाणं ऐकवण्याचा आग्रहच धरला.लगेच त्यांनी मोबाईल सुरू केला. बोलत होते,मध्ये मध्ये स्वत:चे संघर्षमय जीवन व्यक्त करत होते. पाठीवर झेललेले प्रहार अन् मग कसे पडले गळ्यात हार हे ही त्यांनी उलगडून सांगितले.बाबासाहेब सौदागर म्हणजे मूर्तीमंत प्रतिभेचा झराच जणू.सारं काही सोसून आणि रापून त्यांच्या प्रतिभेला अशी काही धार आलेली आहे की लावणी असो किंवा अभंग असो नाही तर असू दे चित्रपट गीत अथवा मालिकेचे गीत तेवढ्याच निष्ठेने ते लिहीतात.त्यांचे शब्द रसिकांच्या मनाचा ठाव घेतात.त्यांच्या काव्यप्रतिभेला कोणीही सलाम केल्याशिवाय राहत नाही.बाबासाहेब सौदागर आणि आम्ही शेतशिवार प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते दिवसभर सोबत होतो.त्यांच्या गाण्यातला सच्चेपणा त्यांच्या वागण्या बोलण्यातून ओघळावा त्याप्रमाणे ते अगदी सहज ग्रामीण शेतकरी आणि कामकरी लोकांशी संवाद साधत होते.सामान्य माणूसच माझ्या लेखनाची खरी प्रेरणा आहे हे सांगायला सुध्दा ते विसरले नाहीत.चित्रपट गीतकार म्हणून कुठलाच मोठेपणा न मिरवता भरभरून ते लोकांशी बोलत होते.स्वत:च्या वाट्याला आलेले कटू अनुभव सुद्धा त्यांनी समर्थपणे पेलले परंतु कधी निराश होऊन नशापाणी केले नाही .काव्याची नशा आशा प्रकारे होती की सारं काही त्यामुळंच घडलं,नोकरी सोडून काव्यलेखन करून आपण स्वत:चे कुटूंब चांगल्या प्रकारे चालवू शकतो हा आत्मविश्वास घेऊन ते गीतलेखनाकडे वळले.आज १०० पेक्षा अधिक चित्रपटाला त्यांनी गाणी लिहीली असून पटकथा लेखन ही केले आहे. शंकर वाडेवाले दादा असा वारंवार उल्लेख करत करत ग्रामीण कवितेवर असलेले त्यांचे प्रेम शब्दाशब्दांमधून दिसून येत होते.जेवढी त्यांची गीतलेखनाची प्रतिभा विलक्षण आणि सच्चेपणाची आहे तेवढाच त्यांच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त होणारा सच्चेपणा विलक्षण वाटतो.स्वत:ची आजी ओव्या गाऊन नवनिर्मीती करायची आणि याच संस्कारातून मी कविता लिहू लागलो.अन्यत:आमच्या घरात कवितेला स्थान नव्हते.शेतीत आईला मदत करत करत सर्व भावंडांचे शिक्षण केले.बहिणीच्या लग्नासाठी स्वत: चा काहीही विचार न करता साटे- लोटे लग्न करण्याचा प्रसंग ही त्यांनी बोलतांना सांगितला. असा हा प्रतिभावंत अस्संल ग्रामीण कवी गीतकार माणूस ज्याला विक्रम गोखलेसारख्या दिग्गंज कलाकाराने हॅट्सऑफ केले.खरोखरंच अतिशय मनस्वी कलावंताला भेटून आम्हाला एखाद्या उंच शिखरावर जाऊन दिव्य काही तरी कामगिरी केल्यासारखी अनुभूती आली तर धन्यवाद! शब्दांकन *संतोष सेलूकर* परभणी ७७०९५१५११०

TAG मिटींग अभिप्राय

*Tag meetings* in Cps Ganpur tq : Purna dist : Parbhani 🏵 We attended the meetings with full of joy and enjoyed it . 🏵meetings are very useful for teachers as well as students 🏵 The way we tag members express our thoughts ,it is very interesting and full of humour.🏵I am very glad to say that most of the tag members are taking part in communication as compare to last year's tag meetings. 🏵co-ordinator Sarika Giri mam has Shown the path and we all members have followed it,added our experience too. 🏵and today the the tag members who were hesitating at first now they are expressing their thoughts in English. 🏵We discuss in meetings and decide some goals as our target of that month. 🏵All tag members work on it and share their views 🏵one good thing is that we choose one activity song or poem and present it in the meetings.all members participate in it. 🏵we always have eager about next meeting 🏵so these meetings are playing a master roll for our English improvement. 🏵Thank u so much .Myself Sarika kalwit Tag member Ganpur tq Purna dist parbhani

सुधारित दर

*शापोआ नवीन सुधारित दर ( इंधन भाजीपालासाठीचा )* 🔴 १ ते ५ साठी = १.५७ ( प्रति विद्यार्थी प्रति दिन याप्रमाणे ) 🔴 ६ ते ८ साठी = २.३५ ( प्रति विद्यार्थी प्रति दिन याप्रमाणे )

शिक्षण परिषद गणपूर

*🌷शिक्षण परिषद गणपूर* 🌷 २०१९-२० वर्षातील पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद अविस्मरणीय ठरली.☘☘ सुरूवात अत्यंत साधेपणाने झाली.गावचे सरपंच व शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षण प्रेमी नागरिक परिषदेत सहभागी झाले ही अत्यंत स्तुत्य बाब वाटली.☘फक्त सहभाग घेतला नाही तर शाळेसाठी १४व्या वित्त आयोगात निधी देऊन ज्या गरजा आहेत; त्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन ही दिले. ☘ उद्घाटन व भाषणबाजी यात अधिक वेळ न घेता महत्त्वाच्या विषयाला सुरूवात झाली.🍀नवीन आलेले तांबे सर व वाडीकर सर यांचे स्वागत करण्यात आले.🍀 अध्ययन स्तर टाॅप शाळांचे अभिनंदन करण्यात आले.बाॅटम शाळांना आपण टाॅप पासून किती अंतरावर आहोत हे समजले. 🍀ब-याच वर्गाची गुणवत्ता ९० - १०० टक्के असल्याचे समजले 🍀 नंतर शिक्षकांचे तीन गट करण्यात आले १-३ ४-५ तसेच ६-८ अध्ययन निष्पत्ती नुसार विषय निहाय आराखडे तयार झाले 🍀 गटात चर्चा होत होत्या.प्रत्येकजण आपले अनुभव सांगत होता.☘ वेगवेगळी मत- मत्तांतरे दिसून येत होती परंतु आपसात मतभेद नव्हते.जो तो दुस-याच्या मताचा आदर राखत आपले मत मांडत होता.☘ बिबेकर सर यांनी स्वत:चे मुरमुरे टाकून प्रसादात चांगलीच भर घातली.🍀मग सर्वांनीच आपापले मुरमुरे प्रसादात टाकून वाटायला सुरूवात केली.🍀मग मा. केंद्रप्रमुख कांबळे साहेबांनी तर डायरेक्ट आजीबाईने दिलेला लाडूचा डब्बाच परिषदेत उघडला.एवढी बौद्धीक मेजवानी दिल्यावर काय ? सर्वं जण पाऊस नसल्यामुळे आनंदाच्या उन्हातच न्हाऊन निघाले.🍀 दुपारी गणपूर शाळेने सर्वांना रुचकर व स्वादिष्ट भोजनाची सोय केल्यामुळे शिक्षण परिषदेत जणू दुग्ध शर्करा योग पहावयास आला.🍀 सर्वांची पूर्णवेळ उपस्थिती हे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.🍀वर्गातील रोजच्या तोचतोपणाला कंटाळलेल्या शिक्षकांना महिण्यातून एक दिवस अशी मुक्तपणे शिक्षक मित्रांशी गप्पा मारणे अर्थात अनुभवाच्या शिदोरीची देवाणघेवाण करणे.यासाठीच तर या शिक्षण परिषदेचे प्रयोजन असते.☘ शेवटी मु.अ.बळवंतकर जाधव सर गरुड सर गोविंदवार व बिबेकर सर यांनी खूप परिश्रम घेतले व शिक्षण परिषद यशस्वी केली. ☘सर्व सि.आर.जी.मेंबर्सनी आपापली भूमिका योग्यपणे पेलली.☘पवार सर गडगिळे सर शिंदे सर जाधव सर यांनी नको नको म्हणलं तरी सर्वांना वेतनवाढीची भेट बि.ई.ओ.साहेबां मार्फत दिली तरी त्यांना ही धन्यवाद .☘अशी शिक्षण परिषद झाली की सर्वांच्या सदैव स्मरणात राहील .धन्यवाद शब्दांकन संतोष सेलुकर ,बलसा
दि. २५ मे २०२० वार- सोमवार *शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-४२) नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो! घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे. *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास! ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा. https://bit.ly/dikshadownload *कोरोना योद्धा* https://bookyboo.com/virus-warrior-marathi *मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका* खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या. 08033094243 *Story weaver* गरम चहा आणि दुलईची ऊब https://bit.ly/2A0JEmC *अवांतर वाचन* आजच्या पुस्तकाचे नाव : पोपट आणि मांजर https://bit.ly/3cZelal *चित्रकला* संपूर्ण वस्तुचित्राचे रंगकाम https://bit.ly/36qIj4n *Reading English* Words ending with 'ck' https://bit.ly/36o5MU3 *संगणक विज्ञान* Scratch वापरून ऍनिमेशन https://bit.ly/2WYDSLm *संगीत/नाटक* गायन / वादन ताल - तीन ताल https://bit.ly/2WVNdn1 *मजेत शिकूया विज्ञान* पाण्याची विद्युत वाहकता https://bit.ly/2A9nI8D *इयत्ता १०वी अभ्यासमाला* विषय - विज्ञान (प्रात्यक्षिक) पाठ - दिलेल्या क्षारांमधील क्लोराईड, ब्रोमाईड आणि आयोडाईड आयनांचे अस्तित्व ओळखणे. https://bit.ly/2LXRn7m *शिष्यवृत्ती परीक्षा तयारी* *इयत्ता - ५ वी* विषय - मराठी घटक - वचन व वचनाचे प्रकार https://bit.ly/3cU5M0m *इयत्ता - ८ वी* विषय - English घटक - Active voice and Passive voice part 2 https://bit.ly/2LQtjUa *Stay home, stay safe!* आपला *दिनकर पाटील,* *संचालक* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

शिक्षणातले काय गेले काय राहिले ?

        शिक्षणातले काय गेले काय राहिले ?

शिक्षण प्रक्रियेचे बदलते स्वरूप लक्षात घेतले असता असे समजते की  शिक्षकाला पूर्वी खूप महत्व्‍ होते.राजा असला तरी त्याला गुरुपुढे नतमस्तक व्हावे लागे एवढे कार्य गूरूने केलेले असे. गूरूकुल पध्दतीत तर गूरू म्हणजे शिष्याचे दैवत होते.दिवसाची सुरूवातच गुरूच्या पायावर डोकं ठेवून म्हणजे गूरुच्या दर्शनाने व्हायची.हळूहळू गूरूचे स्थान बदलत गेले.पूर्वीचे गूरूकूल आता होस्टेल झाले.गूरू विद्यादान कमी  आणि  अन्न्‍दान जास्त   करु लागले.म्हणून हाऊसफुल् सिनेमागéहासारखे हॉस्टेल्स फुल्लं  होऊ लागले आणि त्यात फूल्स्‍ असे काही जमा होऊ लागले की त्यांना पाहून शिक्षक सुध्दा ओहरफुल्ल्‍ व्हायला सुरूवात झाली. पैसा आणि शिक्षण याची जोड घालण्याची सुरूवात झाली.पगार ,अनुदान, विनाअनुदान करत करत शिक्षण प्रकिया आज अशी काही वेगळया वळणाला आली की  इथे शिक्षण दिले जाते की फक्त दप्तरे  ने- आण करण्याचा एखादा व्यवसाय केला जातो असेच कोणीही म्हणेल. संपूर्ण गुरूकूलातील गुरू शिष्य्‍ परंपरा संपुष्टात आली.काळाच्या ओघात असा बदल होत असला तरी भौतिक परिस्थितीमध्ये  बदल झालेला स्वाभाविक आहे. ती एक प्रकारे प्रगती असते.परंतु गुरू शिष्य   नाते एवढे कमालीचे बदलून प्रगत होण्याऐवजी अधोगतीकडे वळत असलेले कसे पहावे ?  किंवा त्यांच्यात एवढा दुरावा तयार व्हावा असे कसे झाले.शिक्षक म्हणून त्याचे स्थान एवढे बदलले की आता शाळा डिजीटल झाल्या आहेत.वर्गात शिक्षक येतात आणि प्रोजेक्टर सूरू करतात.मुले त्या स्क्रीनकडे पाहून शिकतात.गुरूजींचा हा पडदा झाला आहे मुलांना वाटेल तेवढा सरकवता येतो. कधीकधी बाजूला करता येतो मुलांना भावनिकतेने शिकवणारा आणि त्यांच्या गुणसुमनांचा अभ्यास करणारा शिक्षक हा तंत्रज्ञ  झाला आहे. डिव्हाइसला  केबल कनेक्ट करता करता तो मुलांपासून मात्र डिसकनेक्ट कधी झाला हे कुणालाच कळले नाही.शासनाने वर्गात इंटरनेट कनेक्टीव्हीटी आणली खरी परंतु बालकांच्या आणि शिक्षकांच्या नात्यातला दुरावा रेंज नसलेल्या रिमोट एरियासारखा लांबच लांब पसरत गेलाय. स्क्रीन कडे पाहून इक्वेश्न सोडवणारी मुलं प्रत्यक्ष आयुष्यातील समीकरणे सोडवतांना मात्र अशी काही भांबावून जातात की त्यांना ती परिस्थिती हाताळता येत नाही किंवा त्यांची भंबेरी उडते.कसल्या नाजूक आणि तकलादू पायावर उभी आहे आपली शिक्षण प्रक्रिया. शिक्षणाच्या मुळाशी जाऊन विचार करण्याची गरज आहे  का अशा पिढया निर्माण होत आहेत की ज्यांना जरासा स्ट्रेस आला की आत्महत्या करतात ? जरासे सुध्दा सहन करण्याची शक्ती त्यांच्यात नाही.पेलवेना भार, म्हणूनी आभार , समोर अंधार,सोडून घरदार निघतो आम्ही. या प्रमाणे सारं काही क्षणात संपून जातं.आई वडिलांपासून जेंव्हा मुलं दूर राहतात तेंव्हा त्यांचा भावनिक  आधार दुरावत जातो. खूप मोठया स्ट्रेसमध्ये ती असतात.समजून घेणारं कुणीही नसतं.ब-याचवेळा मुलं एकटी पडतात आणि तेवढी प्रगल्भता त्यांच्यात आलेली नसते की स्व्त:हून ती सावरतील उभारी घेतील.

कुटूंबव्यवस्था सुध्दा एवढी विस्कटून गेलेली आहे की याला व्यवस्था म्हणावं की आवस्था म्हणावं हेच समजत नाही.सावरायला कोणालाही वेळ नाही.सारे जण पैसा आणि मोठेपणाच्या मागे मागे जात आहेत.कोणीही कोणाचा विचार करतच नाही.जो तो आपल्यामध्येच व्यस्त्‍  आहे.ज्याला त्याला आपलेच पडलेले आहे.पुढे पुढे असा काही पळतो आहे की जणू एखाद्या स्पर्धेतील स्पर्धक परंतु असे स्पर्धक स्पर्धा जिंकण्याऐवजी अर्ध्यातच कोसळत असतात  हे त्यांना कोणी सांगावे ? शिक्षण देणा-या प्रमुख दोन संस्था म्हणजे एक शाळा आणि दुसरी म्हणजे कुटूंब या दोन्ही ठिकाणी कमालीची नितीमत्ता ढासळलेली दिसतेय त्याचाच तर काहीसा परिणाम नसेल हा.काहीही असो पण त्या बालकांचे भवितव्य्‍ कसे काय उजळणार ? हा मात्र प्रश्न्‍ कायमच आहे.फार थोडी मुले घरून चांगले संस्कार घेऊन शाळेत येत असतात.बाकी मात्र केवळ चिखलाचे गोळेच त्यांना आकार देता देता शिक्षकांना स्व्‍त:चा प्रकार बदलावा लागतो पण आजची शिक्षण व्यवस्था ते ही शिक्षकांना करू देत नाही. नुकतीच वर्तमान पत्रात एक बातमी प्रसिध्द झाली होती शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला. पण मुलं ही किती कमकुवत होत चालली आहेत हे कोणी विचार करतं का ? पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत खूप मार दिला जायचा असे सर्व जणांना ज्ञात आहे अगदी ढोरासारखा मार मुलांना दिला जायचा पण ती मुलंही तेवढी सक्षम होती की कितीही मारा काहीहि करा त्यांची मानसिकता भक्कंम होती कधी ढळत नव्हती.खरे तर मारून शिक्षण घडू शकते हे कोणत्याही  जाणत्या माणसाला पटत नाही परंतु खरा प्रश्न्‍  आहे तो मुलांच्या मनावर होणा-या संस्काराचा त्यांच्या खेळण्याच्या पध्दतीचा,जीवनपध्दतीचा त्यांच्यातील हरवत जाणारी सहनशीलता , निरागसता  या सा-या गोष्टींची उत्तरे आपणास बदलत जाणा-या कुटूंब पध्दती आणि जीवनपध्दतीमध्ये सापडतील  आणि त्यांच्या बालमनाला भुरळ घालणा-या गोष्टी  पासून त्यांना वाचवण्याची खरी गरज आहे.नाही तर एक दिवस परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.यासाठी शिक्षक आणि पालक दोघांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण म्हणतो आम्ही म्हणे पैसा एवढा एवढा कमावतो तंत्रज्ञान वापरून  प्रगती खूप सारी करून टाकत आहोत.खरंच आहे का हे सारं नक्कीच नाही.प्रगती कोणाला नको आहे ? परंतु हे सर्व करण्याच्या नादात आपण आपली कोवळी मुले गमावतो आहोत..त्यांच्यासाठी आपण एवढया सुखसोई करून ठेवलेल्या  आहेत की त्यांची सहनशक्तीच कमी झालेली आहे.स्वार्थी आणि आत्मकेंद्री बनलेली ही पीढी  मख्खपणे बसून राहते आणि पुढे आळशी बनून बेरोजगारीमध्ये भर घालत  असते आणि याहीपुढे जाऊन आपल्या स्वत:च्या घराचा भार सुध्दा पेलण्याची ताकद त्यांच्यात नसते असे  हे चालेल काय तुम्हाला ? नाही चालणार ना. खरं तर  गरज आहे काय गेले काय राहिले हे बघण्याची ? मग त्यांना भक्कम करण्यासाठी त्यांच्यात आत्म्‍विश्वास भरण्यासाठी शिक्ष्‍क वर्गात असला पाहिजे.तो सतत वर्गात फिरता राहिला पाहिजे.त्याची नजर जेव्हा वर्गावर पडते तेंव्हा  सारे चेहरे असे काही आनंदाने फुलतात की त्या प्रत्येकाच्या मनात त्या शिक्षकांचे स्थान आपोआप तयार होते.मुले शिक्षकांशी बोलतात प्रश्न विचारतात तेंव्हा आपोआपच शिक्षकांचे व्यक्त‍िमत्व्‍ न्याहाळतात.मैत्रीचे नाते तयार होते.एकाच शिक्षकामुळे वर्गातील चाळीस मुलांची स्वप्नं बदलू शकतात.त्यांच्या जीवनाला आकार मिळू शकतो.गरज आहे ती चांगले शिक्षक शोधण्याची.त्यांना संधी देण्याची त्यांची किंमत करण्याची.शिक्षण प्रक्रिया मग बघा कशी फुलेल बहरेल आणि लहरेल असा प्रयत्न माजी शिक्षण सचिव नंदकुमार यांनी I want challenge या नावाने चांगल्या शिक्षकांची एक टिम तयार करून केला होता.अशा प्रयत्नांची शिक्षण क्षेत्राला ख-या अर्थाने गरज आहे 

 

संतोष्‍ सेलूकर,

पत्ता रामकृष्ण्‍ नगर

जनकल्याण पतसंस्थेजवळ परभणी

9822826747

कविता

                                        प्रतिष्ठा

आयुष्याच्या फांद्या वाढतंच जातात दिवसागणिक्

पानगळ ही ठरलेलीच असते ऋतूनुसार  तरी आपले स्वप्न्‍ असतेच की 

एकावर एक मजले चढले पाहिजेत टुमदार असे

का म्हणून थांबावे  दिवसांनी  आमच्यासाठी  कालचक्र सोडून ?

का म्हणून पाखरांनी  आमच्या  अंगणात येऊन बागडावे मनसोक्त ?

झाडांना फुलांना आपण का नाही विचारत

उन्हाच्या प्रखर झळया अंगावर झेलतांना

कोणता स्कार्फ बांधता नाकातोंडावरून घट्ट  ?

पाखरांना तरी कसे  विचारावे  आपण 

तुमचा फ्लॅट कोणत्या एरियामध्ये आहे म्हणून ?

साधं आभाळ तरी ठेवलं आहे का त्यांना उडायला ?

आपल्या घरांचे रंगीबेरंगी उंचच उंच मनोरे चढवतांना 

आतल्या आत ऐकू येतो का कधी  ? घरटे उध्वस्त्  झालेल्या

पाखरांचा -हदय पिळवटून टाकणारा मूक आक्रोश

अपेक्षांचे जड झालेले ओझे जरासे टेकवून

का नाही  पाहत सरळ उभे राहून इथल्या प्रत्येक गोष्टीकडे  आपण ?

कोणी अशी ही संस्कृती रुजू घातली की

जंगल तोडून बांधा उंचच उंच इमले ?

आणि वाढवा आपली प्रतिष्ठा

एखादे दिवशी  निवारे उध्वस्त्‍ झालेले प्राणी येतील तेंव्हा

पळ काढताल

तुमची प्रतिष्ठा तिथेच टाकून विष्ठेसारखी.!

कसली प्रतिष्ठा घेऊन जन्माला आलात आपण की विष्ठा ?

 

                         संतोश सेलूकर ,परभणी  9822826747

शिक्षक ध्येय

सोमवार दि. १८ मे २०२० रोजी प्रकाशित होत आहे

या अंकात एका आईचा संदेश

बाळा, आज तू एक शिक्षक/शिक्षिका आहेस तेव्हा काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत.
प्रत्येक आईवडील आपला पोटचा गोळा तुझ्या हवाली करतो. त्याला आदर्श व्यक्ती म्हणून घडविण्याची जबाबदारी तुझी आहे, ते तुझे कर्तव्य आहेस ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 
जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील, बिघडतील हे सांगता येत नाही. मी आज तुला जे सांगत आहे, ते इतर कुणी कदाचित नाही सांगणार.
स्वत:साठी जगत असताना कायम इतरांचाही विचार कर. कारण स्वार्थाने भौतिक गोष्टी मिळवता येतात, पण आतंरिक समाधान त्यापलीकडे आहे आणि ते तू मिळवण्याचा प्रयत्न कर. तू जे काही करशील ते स्वत:शी प्रामाणिक राहून कर.
स्वत:चा विकास करत असताना सामाजिक भानही ठेव. समाजासाठी काहीतरी करण्याची संधी शोधत रहा.
आईपण आणि गुरुपण म्हणावं तेवढं सोपं नाही. विद्यार्थी आपले आचरण बघत असतात आणि ते स्वत: आचरणात पण आणत असतात. तेव्हा तू प्रत्येक कृती करताना ती विचारपूर्वक कर.
कुंभार जसे मडके घडवितो तसे तू विद्यार्थी घडव, कारण तीच तुझी खरी संपत्ती आहे, हे सदैव लक्षात ठेव. कोणी विचारले असता अभिमानाने तुला आपले कर्तुत्व सांगता आले पाहिजे. 
आईवडील आपली मुले तुमच्याकडे सोपवतात कारण त्यांचा तुमच्यावर आणि शाळेवर विश्वास आहे. बाळा, या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नकोस. स्वत:च्या मुलांप्रमाणे शाळेतील मुलांची काळजी घे. आजही गुरु हेच सर्वश्रेष्ठ दैवत मानणारे विद्यार्थी आहेत रे!.......
 
पूर्ण संदेश वाचायला विसरु नका.

संपर्क :
shikshak.dhyey@gmail.com

साप्ताहिक शिक्षक ध्येय हे दर सोमवारी प्रकाशित केले जाते


Join Telegram Channel :
https://t.me/shikshak_dhyey

आमच्या फेसबुक पेजला Like अवश्य करा :
https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/

आजच आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
https://chat.whatsapp.com/GZZP6JHWYK2Bfd8Ie895Ti

कविता माझी मुलगी

"माझी मुलगी" कवी प्रदीप निफाडकर यांची ही मुलीवरची कविता....( मात्र दुर्दैवं हे की पुण्यात अपघातात निफाडकर यांची मुलगी प्रांजली हिचे  निधन झाले.प्रांजलीचे नुकतेच लग्न झाले होते तिला दीड वर्षाचे बाळ आहे.)
माझी मुलगी

जागोजागी भेटत असते माझी मुलगी
कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी

तिला न रुचते नटणे-बिटणे तरी नेहमी
परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी

मला मिळाले किती चांगले आई-बाबा
मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी

हळूहळू मग चालतात हे वादळवारे
झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी

कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी
मुलासारखे राबत असते माझी मुलगी

चित्र काढते, पोळ्या करते, गाणे गाते
दु:खालाही खुशाल पिसते माझी मुलगी

गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो
अवती भवती जेव्हा नसते माझी मुलगी

घरी यायला मला जरासा उशीर होता
आईसोबत जागत बसते माझी मुलगी

तिला लागली गझलांची या खोड आगळी
हळूच रात्री कुशीत घुसते माझी मुलगी

आठवते मज माझी आई अशीच होती
जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी

तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये तू
अजुनी मजला अल्लड दिसते माझी मुलगी

 प्रांजलीला भावपूर्ण श्रध्दांजली🙏🏼🙏🏼

सरावासाठी चाचण्या

टेस्टमोज चाचणी  1 )   : https://testmoz.com/q/3500476
टेस्टमोज चाचणी  2)    : https://testmoz.com/q/3478448
टेस्टमोज चाचणी  3 )   : https://testmoz.com/q/3460286
टेस्टमोज चाचणी  4)   : https://testmoz.com/q/3412192
टेस्टमोज चाचणी  5 )  : https://testmoz.com/q/3327052
टेस्टमोज चाचणी  6 )  : https://testmoz.com/q/3303220
टेस्टमोज चाचणी  7 )  : https://testmoz.com/q/3478448
टेस्टमोज चाचणी  8 ) : https://testmoz.com/q/3416884
टेस्टमोज चाचणी  9 ) : https://testmoz.com/q/3397584
टेस्टमोज चाचणी  10) : https://testmoz.com/q/3259818
टेस्टमोज चाचणी  11 ) : https://testmoz.com/q/3375938
टेस्टमोज चाचणी  12) : https://testmoz.com/q/3349934
टेस्टमोज चाचणी  13 ) : https://testmoz.com/q/3207276
टेस्टमोज चाचणी  14 ) : https://testmoz.com/q/3245740
टेस्टमोज चाचणी  15) : https://testmoz.com/q/3327052

https://testmoz.com/q/3478448
सराव चाचणी 16

https://testmoz.com/q/3500476सराव चाचणी 17

https://testmoz.com/q/3518334सराव चाचणी 18

https://testmoz.com/q/3536124सराव चाचणी 19

https://testmoz.com/q/3553822सराव चाचणी 20

https://testmoz.com/q/3573340सराव चाचणी 21

https://testmoz.com/q/3582036सराव चाचणी 22

https://testmoz.com/q/3620512सराव चाचणी 23

https://testmoz.com/q/3640102सराव चाचणी 24

कविता

कविता
खूप झेलल्या अंगावरती या अज्ञानाच्या झळा
चलरे बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा

मनामनातून  फुलून येतो गणवेशाचा रंग
पाठीवरती लढण्या दफ्तर ढाल असावी संग
हिमालयाचे शिखर लावतो भिंतीवरच्या फळा
चलरे बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा

मनात माझ्या क्षणात येते लिहू लागतो कविता
चार ओळीच्या शब्दामधूनी अर्थ भेटतो पुरता
मनगंगेच्या तीरावरचा डोलत राही मळा
चलरे बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा

ज्ञान सांडता वेचून घ्यावा अमूल्य असा ठेवा
जरा निसटता हातून आमुच्या वाटत राही हेवा
भंगपावूनी मनात फुटते अज्ञानाची शीळा
चलरे  बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा 

संतोष सेलूकर
प्रा.प.जि.प.शाळा बलसा बु
ता.पूर्णा जि.परभणी
मो.7709515110
ई-मेल Santosh.selukar@gmail.com

कविता शिक्षकाची

शालेय गंमती जंमती….
“शाळा आमची आहे किती छान की आम्ही रोज शाळेत येणार
लिहूनी वाचूनी शिकूनी सवरूनी आम्ही मोठे होणार …….”  हो ..हो.. याच शाळेत आम्ही ही घडलो नि बिघडलो सुद्धा अरेच्या घ्‍डलो नि बिघडलो असे कसे शक्य आह…? आहे शक्य आहे. नाण्याच्या दोन बाजू जिथे सुख तिथे,दु:ख जिथे,जन्म तेथे मृत्यू,जिथे हसणे तेथे रडणे,येणे नि जाणे.
जिथे शाळा तिथे शिक्षक ,शिक्षक तिथे विद्यार्थी ,जिथे विद्यार्थी तिथे गंमतीजंमती आल्याच की माझी पहिली शाळा जि.प.शाळा एरंडेंष्वर ता.पुर्णा.काय सांगावे या शाळेबद्दल किती तरी गंमती जंमती रोज घडायच्या.तशी मी नुकतीच नवीन नौकरीला लागलेली आणि मध्यमवर्गीय कुटूबांतली एकुलते एक कन्या रत्न असलेली व माझ्या वडिलांची सावलीच जणू होते. मी पहिल्यांदा जेव्हा शाळेत गेले तेव्हा सर्वांनी माझं स्वागत केलं तो क्षण मी आजही विसरले नाही त्याबरोबरंच शाळेतल्या गंमती जंमती सुद्धा लक्षात आहेत तशाच.नव्हे मी त्या विसरूही शकत नाही.
एके दिवशी मी अचानक पहिलीच्या वर्गात गेले.मुले मला पाहताच घाबरली.काही मुले पाटी- लेखणी घेऊन बसली. पण काही मुले तर चक्क लेखणी खात असलेली मी पाहिली.मला ते चित्र नवीन होते.काही मुले उजळणी तर काही बाराखडी लिहिण्यात मग्न झाली.त्यत एका बावळट आणि गबाळा असणा-या मुलावर माझी नजर पडली.मला पाहून तो वर्गा बाहेर पळू लागला.मी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो बाहेरच पळण्यासाठी धडपडत होता.बाहेरच्या मुलांना तो काही तरी खुणवत वर्गाबाहेर पळून गेला. मी नवीनच होते तयाला पकडावं म्हटलं तर ते ही शक्य नव्हते. तो मलाच पळवायला लागला.असे रोजच घडू लागले.शेवटी मोठ्या वर्गातील मुलांच्या मदतीने मी तयाला पकडायला लावलेच एके दिवशी तर हा पठ्ठा़ खूप घाबरला.बाई मारतील म्हणून मग शाळेतच यायचा नाही.मग एके दिवशी मी त्याला प्रेमाने जवळ घेऊन समजावले मग थोडं थोडं माझं ऐकायला लागला.
मग त्याने नवीनच प्रकार सुरूवात केला.वर्गातील इतर मुलांच्या अंगावर खेळण्यातील खोटे साप,पाल,सरडे टाकून त्यांना घाबरावयाचा खेळ त्यांने सुरु केला.एकदा तर त्याच्या या नकली सापाला मी सुद्धा घाबरले.जेव्हा समजले हा साप खोटा आहे तेव्हा माझे मलाच हसू आवरता आले नाही.
एकदा काय झालं एक वटवाघुळाचं पिल्लूच आमच्या वर्गात आलं नि इकडून तिकडे घिरट्या घालू लागलं सर्व मुलं कावरी बावरी होऊन बघू लागली. कुणी म्हणत होते, “अबे टाळूला चिटकतंय ते..” मग काय सर्व मुले  घाबरून वर्गाबाहेर गेली आणि हा एकटाच वर्गात त्यासोबत घिरट्या घालत होता.मी हाश्य हुश्य करत कसे बसे त्याला वर्गाबाहेर काढले.तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.पुन्हा एक गंमत झाली.त्यांने वर्गात आल्या वडिलांचा मोबाईल आणला.मग काय? सर्व मुलं त्याच्याच मागे फिरत होती.पुन्हा एके दिवशी अशीच गंमत घडली. तेव्हा शाळेत अत्ताच्या सारखे संस्कार केंद्र नव्हती.गोंधळून जाऊ नका संस्कारकेद्र  म्हणजे शालेय शौचालय.पहिलीच्या मुलांना तर बाहेर जायचं सुद्धा कळत नाही.ती वर्गातच …. करतात.काही मुले बाहेर पउक्या जागेत जायची.मधूनच ओरडढत यायची की तिकडे भूत आहे.मग काय ?सगळा वर्ग घाबरून जायचा.तिकडे स्मशानभूमी होती त्यामुळे मुले आधीच या गोष्टीला भ्यायची.मग ओरडून सांगावे लागायचे नका जाऊ तिकडं म्हणून.मुलं कधी खेकड्याच्या मागे लागायची,कधी म्हशीच्या मागे धावायची,कधी माकडाच्या मागे लागायची, कधी तळ्यात तर कधी मळ्यात. एकाने तर शाळेत चक्क्ं सशाचे पिल्लूच आणले.मग काय वर्गात सगळे ससेच ससे.कधी कधी मुलांची शर्टाची बटणं खाली वर लागलेली असायची ते तसेच वर्गात यायचे मग आमची हसायची खूप मजाच मजा. कधी कधी वेगवेगळी चप्पल ,बुट घालून यायची तेंव्हाही खूप गंमत वाटायची की किती निरागस असतात ही लेकरं.शाहेजवळच्या विहिरीत चप्पल टाकायचे मुलं अन त्या निमित्ताने वाकून बघायचे.शाळेत कपाळावर वेगवेगळे आकाराचे गंध लावून येणारी काही मुलं फार गंममतीशीर होती मी दररोज त्यांचे निरिक्षण करायचे.
एकदा वर्गात बेंचवर एकाने फेविकॉल लावून ठेवला. त्याच्यावर एक जण बसला.उठायला गेला तर उठताच येईना.मग लागला रडायला.मग मी त्याची मदत केली तर त्याची पॅनटच फाटून गेली.मग तर अजूनच मोठ्याने रडायला लागला.अशा सतत गंमती जंमती माण्या वर्गात घडायच्या.मला या सतत स्मरणात आहेत.त्या आजही आइवल्या तरी मला हासू आवरता येत नाही.म्हणून माझी शाळा आणि माझे विद्यार्थी मला सतत काही तरी आनंदाचे क्षण देऊन जातात.हा आनंदाचा ठेवा असाच जपून ठेवावा आणि इतर मुलांसोबत शेअर करत रहावा त्यांनाही त्यांची गंमत वाटत राहते.
                       मंजूषा देवडे 
                                                  प्रा.शि.जि.प.शाळा देऊळगाव दुधाटे 
                                               ता पूर्णा जि.परभणी मो.नं.9765762562

उपसंपादक
संतोष सेलूकर परभणी 
मो 7709515110
Email- santosh.selukar@gmail.com


सर लेखिकेचा फोटो आणि संबधित फोटो सकाळी पाठवतो