5
- प्रज्ञांकूर (34)
- कविता (10)
- Dhanora shala vishesh (7)
- school photo (7)
- काही लेख (7)
- Zpps balsa (6)
- वैयक्तिक (5)
- शिक्षण परिषद (4)
- Kavita (3)
- साप्ताहिक शिक्षक ध्येय (3)
- सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषद १०-१२ जून २०२० (3)
- TAG (2)
- प्रश्नपत्रिका (2)
- बातम्या (2)
- बालमंडळ (2)
- शालेय पोषण आहार (2)
- READ AND LEAD (1)
- काही लेख (1)
- गुगल फॉर्म चाचणी (1)
- दिव्यांग दिन (1)
- पाठ्यपुस्तके 1 to 8 (1)
- प्रश्नपत्रिका (1)
- मूल्यवर्धन (1)
- यशोगाथा (1)
- शालेय पोषण आहार (1)
- शाळाभेट अहवाल (1)
प्रशिक्षण वृतांत
*मूल्यवर्धन प्रशिक्षण गौर ता.पूर्णा*
आज दि ३ आॅक्टो २०१९ रोजी ठिक १० वा कन्या पूर्णा,पिंपळा लोखंडे व गणपूर केंद्रातील १ ते ५ ला शिकविणारे ५० टक्के शिक्षकांचे बीट स्तरीय प्रशिक्षणास सुरूवात झाली.याप्रसंगी गौर शाळेचे मुअ पांपटवार सर व केंद्रप्रमुख मा.सय्यद सर उपस्थित होते .
प्रास्ताविक साधन व्यक्ती व सुलभक श्री अंबुरे आर जी यांनी केले. प्रशिक्षण अपेक्षा बाबत सेलूकर एस.आर.यांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांची मते जाणून घेतली.प्रशिक्षण रुपरेषा, परिचय जीवनातील अविस्मरणीय क्षण सांगणे ,इ बाबत प्रशिक्षणार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.गणपूर केंद्राचे कें प्र संजय कांबळे यांनी मूल्यवर्धन बाबत ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यात येतील व योग्य प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम घेऊन जावा असे आवाहन केले.दुपार सत्रात भोजन अवकाशा नंतर अंबुरे आर. जी. यांनी मूल्यवर्धन आवश्यकता व स्वातंत्र्य ,समता व बंधुता बाबत उदाहरणासह स्पष्ट केले. दुपारी प्रशिक्षणास भेट देण्यासाठी महेश जाधव ता.समन्वयक व ढाले सर साधन व्यक्ती आले.त्यांनी प्रशिक्षण बाबत आढावा घेतला.तसेच प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. गौर शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षणासाठी सहकार्य लाभले.
एकंदर प्रशिक्षणाचा पहिला दिवस संपन्न झाला.