20
- CCRT UDAIPUR TRAINING (1)
- Dhanora shala vishesh (7)
- Kavita (5)
- READ AND LEAD (1)
- school photo (8)
- TAG (2)
- Zpps balsa (8)
- कविता (11)
- काही लेख (7)
- काही लेख (3)
- गुगल फॉर्म चाचणी (2)
- दिव्यांग दिन (1)
- पाठ्यपुस्तके 1 to 8 (1)
- प्रज्ञांकूर (34)
- प्रश्नपत्रिका (2)
- प्रश्नपत्रिका (1)
- बातम्या (2)
- बालमंडळ (2)
- मूल्यवर्धन (1)
- यशोगाथा (1)
- वैयक्तिक (5)
- शालेय पोषण आहार (1)
- शालेय पोषण आहार (2)
- शाळाभेट अहवाल (1)
- शिक्षण परिषद (6)
- साप्ताहिक शिक्षक ध्येय (3)
- सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषद १०-१२ जून २०२० (3)
कवी बाबासाहेब सौदागर
*'सामान्य माणूसच माझ्या लेखनाची प्रेरणा'- *चित्रपट गीतकार* *बाबासाहेब* *सौदागर*. दि.11/08/19
पेठशिवणी ता.पालम येथे विठोबा पाटील वाडेवाले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय गीतकार पटकथा लेखक बाबासाहेब सौदागर यांच्या शुभ हस्ते ग्रामीण साहित्यिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात बालाजी जाधव अंबड ,अनिता यलमट्टे उदगीर ,वसुंधरा सुत्रावे नांदेड यांचा समावेश होता. प्रास्ताविक शंकर वाडेवाले प्रसिध्द ग्रामीण कवी यांनी केले.मा.बाबासाहेब सौदागर यांनी आपला स्वतःचा संपूर्ण जीवनप्रवास लोकांसमोर मांडला.चित्रपट गीत लेखन करतांना आणि एकंदरच स्वतःचे स्थान निर्माण करतांना किती संघर्ष करावा लागतो हे सांगताना तर अगदी रसिकांचे डोळे पाणावले.ते म्हणाले ,"की ऐन संक्रांतीच्या दिवशी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून मी गाणं लिहायला कोल्हापूर कडे निघालो.तिथे जगदीश खेबुडकर गाणं जर त्यांना चांगलं वाटलं नाही तर तसाच कागद फाडून तोंडावर फेकतात असे मला कळले होते.म्हणून त्यांच्या समोर जाण्यांची हिम्मत होत नव्हती. मला एक अभंग लिहायला सांगितला.मी एक छान अभंग लिहून खेबुडकरांकडे गेलो.मनात खूप भीती होती.त्यांनी तो अभंग वाचला अन् म्हणाले मला माझ्या गादीचा वारसदार आज मिळाला.लिहीत रहा असा आशीर्वाद दिला. आता १०० पेक्षा अधिक चित्रपटांना मी गाणी लिहीली आहेत. सत्ताधिश चित्रपट स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला सुद्धा माझीच गाणी आहेत,हे सांगितल्यावर तर रसिकांनी त्यांना गाणं ऐकवण्याचा आग्रहच धरला.लगेच त्यांनी मोबाईल सुरू केला. बोलत होते,मध्ये मध्ये स्वत:चे संघर्षमय जीवन व्यक्त करत होते. पाठीवर झेललेले प्रहार अन् मग कसे पडले गळ्यात हार हे ही त्यांनी उलगडून सांगितले.बाबासाहेब सौदागर म्हणजे मूर्तीमंत प्रतिभेचा झराच जणू.सारं काही सोसून आणि रापून त्यांच्या प्रतिभेला अशी काही धार आलेली आहे की लावणी असो किंवा अभंग असो नाही तर असू दे चित्रपट गीत अथवा मालिकेचे गीत तेवढ्याच निष्ठेने ते लिहीतात.त्यांचे शब्द रसिकांच्या मनाचा ठाव घेतात.त्यांच्या काव्यप्रतिभेला कोणीही सलाम केल्याशिवाय राहत नाही.बाबासाहेब सौदागर आणि आम्ही शेतशिवार प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते दिवसभर सोबत होतो.त्यांच्या गाण्यातला सच्चेपणा त्यांच्या वागण्या बोलण्यातून ओघळावा त्याप्रमाणे ते अगदी सहज ग्रामीण शेतकरी आणि कामकरी लोकांशी संवाद साधत होते.सामान्य माणूसच माझ्या लेखनाची खरी प्रेरणा आहे हे सांगायला सुध्दा ते विसरले नाहीत.चित्रपट गीतकार म्हणून कुठलाच मोठेपणा न मिरवता भरभरून ते लोकांशी बोलत होते.स्वत:च्या वाट्याला आलेले कटू अनुभव सुद्धा त्यांनी समर्थपणे पेलले परंतु कधी निराश होऊन नशापाणी केले नाही .काव्याची नशा आशा प्रकारे होती की सारं काही त्यामुळंच घडलं,नोकरी सोडून काव्यलेखन करून आपण स्वत:चे कुटूंब चांगल्या प्रकारे चालवू शकतो हा आत्मविश्वास घेऊन ते गीतलेखनाकडे वळले.आज १०० पेक्षा अधिक चित्रपटाला त्यांनी गाणी लिहीली असून पटकथा लेखन ही केले आहे. शंकर वाडेवाले दादा असा वारंवार उल्लेख करत करत ग्रामीण कवितेवर असलेले त्यांचे प्रेम शब्दाशब्दांमधून दिसून येत होते.जेवढी त्यांची गीतलेखनाची प्रतिभा विलक्षण आणि सच्चेपणाची आहे तेवढाच त्यांच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त होणारा सच्चेपणा विलक्षण वाटतो.स्वत:ची आजी ओव्या गाऊन नवनिर्मीती करायची आणि याच संस्कारातून मी कविता लिहू लागलो.अन्यत:आमच्या घरात कवितेला स्थान नव्हते.शेतीत आईला मदत करत करत सर्व भावंडांचे शिक्षण केले.बहिणीच्या लग्नासाठी स्वत: चा काहीही विचार न करता साटे- लोटे लग्न करण्याचा प्रसंग ही त्यांनी बोलतांना सांगितला. असा हा प्रतिभावंत अस्संल ग्रामीण कवी गीतकार माणूस ज्याला विक्रम गोखलेसारख्या दिग्गंज कलाकाराने हॅट्सऑफ केले.खरोखरंच अतिशय मनस्वी कलावंताला भेटून आम्हाला एखाद्या उंच शिखरावर जाऊन दिव्य काही तरी कामगिरी केल्यासारखी अनुभूती आली तर
धन्यवाद!
शब्दांकन
*संतोष सेलूकर*
परभणी
७७०९५१५११०