शिक्षणातले काय गेले काय राहिले ?

        शिक्षणातले काय गेले काय राहिले ?

शिक्षण प्रक्रियेचे बदलते स्वरूप लक्षात घेतले असता असे समजते की  शिक्षकाला पूर्वी खूप महत्व्‍ होते.राजा असला तरी त्याला गुरुपुढे नतमस्तक व्हावे लागे एवढे कार्य गूरूने केलेले असे. गूरूकुल पध्दतीत तर गूरू म्हणजे शिष्याचे दैवत होते.दिवसाची सुरूवातच गुरूच्या पायावर डोकं ठेवून म्हणजे गूरुच्या दर्शनाने व्हायची.हळूहळू गूरूचे स्थान बदलत गेले.पूर्वीचे गूरूकूल आता होस्टेल झाले.गूरू विद्यादान कमी  आणि  अन्न्‍दान जास्त   करु लागले.म्हणून हाऊसफुल् सिनेमागéहासारखे हॉस्टेल्स फुल्लं  होऊ लागले आणि त्यात फूल्स्‍ असे काही जमा होऊ लागले की त्यांना पाहून शिक्षक सुध्दा ओहरफुल्ल्‍ व्हायला सुरूवात झाली. पैसा आणि शिक्षण याची जोड घालण्याची सुरूवात झाली.पगार ,अनुदान, विनाअनुदान करत करत शिक्षण प्रकिया आज अशी काही वेगळया वळणाला आली की  इथे शिक्षण दिले जाते की फक्त दप्तरे  ने- आण करण्याचा एखादा व्यवसाय केला जातो असेच कोणीही म्हणेल. संपूर्ण गुरूकूलातील गुरू शिष्य्‍ परंपरा संपुष्टात आली.काळाच्या ओघात असा बदल होत असला तरी भौतिक परिस्थितीमध्ये  बदल झालेला स्वाभाविक आहे. ती एक प्रकारे प्रगती असते.परंतु गुरू शिष्य   नाते एवढे कमालीचे बदलून प्रगत होण्याऐवजी अधोगतीकडे वळत असलेले कसे पहावे ?  किंवा त्यांच्यात एवढा दुरावा तयार व्हावा असे कसे झाले.शिक्षक म्हणून त्याचे स्थान एवढे बदलले की आता शाळा डिजीटल झाल्या आहेत.वर्गात शिक्षक येतात आणि प्रोजेक्टर सूरू करतात.मुले त्या स्क्रीनकडे पाहून शिकतात.गुरूजींचा हा पडदा झाला आहे मुलांना वाटेल तेवढा सरकवता येतो. कधीकधी बाजूला करता येतो मुलांना भावनिकतेने शिकवणारा आणि त्यांच्या गुणसुमनांचा अभ्यास करणारा शिक्षक हा तंत्रज्ञ  झाला आहे. डिव्हाइसला  केबल कनेक्ट करता करता तो मुलांपासून मात्र डिसकनेक्ट कधी झाला हे कुणालाच कळले नाही.शासनाने वर्गात इंटरनेट कनेक्टीव्हीटी आणली खरी परंतु बालकांच्या आणि शिक्षकांच्या नात्यातला दुरावा रेंज नसलेल्या रिमोट एरियासारखा लांबच लांब पसरत गेलाय. स्क्रीन कडे पाहून इक्वेश्न सोडवणारी मुलं प्रत्यक्ष आयुष्यातील समीकरणे सोडवतांना मात्र अशी काही भांबावून जातात की त्यांना ती परिस्थिती हाताळता येत नाही किंवा त्यांची भंबेरी उडते.कसल्या नाजूक आणि तकलादू पायावर उभी आहे आपली शिक्षण प्रक्रिया. शिक्षणाच्या मुळाशी जाऊन विचार करण्याची गरज आहे  का अशा पिढया निर्माण होत आहेत की ज्यांना जरासा स्ट्रेस आला की आत्महत्या करतात ? जरासे सुध्दा सहन करण्याची शक्ती त्यांच्यात नाही.पेलवेना भार, म्हणूनी आभार , समोर अंधार,सोडून घरदार निघतो आम्ही. या प्रमाणे सारं काही क्षणात संपून जातं.आई वडिलांपासून जेंव्हा मुलं दूर राहतात तेंव्हा त्यांचा भावनिक  आधार दुरावत जातो. खूप मोठया स्ट्रेसमध्ये ती असतात.समजून घेणारं कुणीही नसतं.ब-याचवेळा मुलं एकटी पडतात आणि तेवढी प्रगल्भता त्यांच्यात आलेली नसते की स्व्त:हून ती सावरतील उभारी घेतील.

कुटूंबव्यवस्था सुध्दा एवढी विस्कटून गेलेली आहे की याला व्यवस्था म्हणावं की आवस्था म्हणावं हेच समजत नाही.सावरायला कोणालाही वेळ नाही.सारे जण पैसा आणि मोठेपणाच्या मागे मागे जात आहेत.कोणीही कोणाचा विचार करतच नाही.जो तो आपल्यामध्येच व्यस्त्‍  आहे.ज्याला त्याला आपलेच पडलेले आहे.पुढे पुढे असा काही पळतो आहे की जणू एखाद्या स्पर्धेतील स्पर्धक परंतु असे स्पर्धक स्पर्धा जिंकण्याऐवजी अर्ध्यातच कोसळत असतात  हे त्यांना कोणी सांगावे ? शिक्षण देणा-या प्रमुख दोन संस्था म्हणजे एक शाळा आणि दुसरी म्हणजे कुटूंब या दोन्ही ठिकाणी कमालीची नितीमत्ता ढासळलेली दिसतेय त्याचाच तर काहीसा परिणाम नसेल हा.काहीही असो पण त्या बालकांचे भवितव्य्‍ कसे काय उजळणार ? हा मात्र प्रश्न्‍ कायमच आहे.फार थोडी मुले घरून चांगले संस्कार घेऊन शाळेत येत असतात.बाकी मात्र केवळ चिखलाचे गोळेच त्यांना आकार देता देता शिक्षकांना स्व्‍त:चा प्रकार बदलावा लागतो पण आजची शिक्षण व्यवस्था ते ही शिक्षकांना करू देत नाही. नुकतीच वर्तमान पत्रात एक बातमी प्रसिध्द झाली होती शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला. पण मुलं ही किती कमकुवत होत चालली आहेत हे कोणी विचार करतं का ? पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत खूप मार दिला जायचा असे सर्व जणांना ज्ञात आहे अगदी ढोरासारखा मार मुलांना दिला जायचा पण ती मुलंही तेवढी सक्षम होती की कितीही मारा काहीहि करा त्यांची मानसिकता भक्कंम होती कधी ढळत नव्हती.खरे तर मारून शिक्षण घडू शकते हे कोणत्याही  जाणत्या माणसाला पटत नाही परंतु खरा प्रश्न्‍  आहे तो मुलांच्या मनावर होणा-या संस्काराचा त्यांच्या खेळण्याच्या पध्दतीचा,जीवनपध्दतीचा त्यांच्यातील हरवत जाणारी सहनशीलता , निरागसता  या सा-या गोष्टींची उत्तरे आपणास बदलत जाणा-या कुटूंब पध्दती आणि जीवनपध्दतीमध्ये सापडतील  आणि त्यांच्या बालमनाला भुरळ घालणा-या गोष्टी  पासून त्यांना वाचवण्याची खरी गरज आहे.नाही तर एक दिवस परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.यासाठी शिक्षक आणि पालक दोघांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण म्हणतो आम्ही म्हणे पैसा एवढा एवढा कमावतो तंत्रज्ञान वापरून  प्रगती खूप सारी करून टाकत आहोत.खरंच आहे का हे सारं नक्कीच नाही.प्रगती कोणाला नको आहे ? परंतु हे सर्व करण्याच्या नादात आपण आपली कोवळी मुले गमावतो आहोत..त्यांच्यासाठी आपण एवढया सुखसोई करून ठेवलेल्या  आहेत की त्यांची सहनशक्तीच कमी झालेली आहे.स्वार्थी आणि आत्मकेंद्री बनलेली ही पीढी  मख्खपणे बसून राहते आणि पुढे आळशी बनून बेरोजगारीमध्ये भर घालत  असते आणि याहीपुढे जाऊन आपल्या स्वत:च्या घराचा भार सुध्दा पेलण्याची ताकद त्यांच्यात नसते असे  हे चालेल काय तुम्हाला ? नाही चालणार ना. खरं तर  गरज आहे काय गेले काय राहिले हे बघण्याची ? मग त्यांना भक्कम करण्यासाठी त्यांच्यात आत्म्‍विश्वास भरण्यासाठी शिक्ष्‍क वर्गात असला पाहिजे.तो सतत वर्गात फिरता राहिला पाहिजे.त्याची नजर जेव्हा वर्गावर पडते तेंव्हा  सारे चेहरे असे काही आनंदाने फुलतात की त्या प्रत्येकाच्या मनात त्या शिक्षकांचे स्थान आपोआप तयार होते.मुले शिक्षकांशी बोलतात प्रश्न विचारतात तेंव्हा आपोआपच शिक्षकांचे व्यक्त‍िमत्व्‍ न्याहाळतात.मैत्रीचे नाते तयार होते.एकाच शिक्षकामुळे वर्गातील चाळीस मुलांची स्वप्नं बदलू शकतात.त्यांच्या जीवनाला आकार मिळू शकतो.गरज आहे ती चांगले शिक्षक शोधण्याची.त्यांना संधी देण्याची त्यांची किंमत करण्याची.शिक्षण प्रक्रिया मग बघा कशी फुलेल बहरेल आणि लहरेल असा प्रयत्न माजी शिक्षण सचिव नंदकुमार यांनी I want challenge या नावाने चांगल्या शिक्षकांची एक टिम तयार करून केला होता.अशा प्रयत्नांची शिक्षण क्षेत्राला ख-या अर्थाने गरज आहे 

 

संतोष्‍ सेलूकर,

पत्ता रामकृष्ण्‍ नगर

जनकल्याण पतसंस्थेजवळ परभणी

9822826747