[3:50 PM, 1/12/2019] SANTOSH SELUKAR: शब्दांकन
संतोष सेलूकर
प्रा शाळा बलसा बु.ता पूर्णा जि परभणी
शिक्षणातले काय गेले काय राहिले ?
शिक्षण प्रक्रियेचे बदलते स्वरूप लक्षात घेतले
असता असे समजते की शिक्षकाला पूर्वी खूप महत्व्
होते.राजा असला तरी त्याला गुरुपुढे नतमस्तक व्हावे लागे एवढे कार्य गूरूने केलेले
असे. गूरूकुल पध्दतीत तर गूरू म्हणजे शिष्याचे दैवत होते.दिवसाची सुरूवातच गुरूच्या
पायावर डोकं ठेवून म्हणजे गूरुच्या दर्शनाने व्हायची.हळूहळू गूरूचे स्थान बदलत गेले.पूर्वीचे
गूरूकूल आता होस्टेल झाले.गूरू विद्यादान कमी
आणि अन्न्दान जास्त करु लागले.म्हणून
हाऊसफुल् सिनेमागéहासारखे हॉस्टेल्स फुल्लं
होऊ लागले आणि त्यात फूल्स् असे काही जमा
होऊ लागले की त्यांना पाहून शिक्षक सुध्दा ओहरफुल्ल् व्हायला सुरूवात झाली. पैसा आणि
शिक्षण याची जोड घालण्याची सुरूवात झाली.पगार ,अनुदान, विनाअनुदान करत करत शिक्षण प्रकिया
आज अशी काही वेगळया वळणाला आली की इथे शिक्षण
दिले जाते की फक्त दप्तरे ने-
आण करण्याचा एखादा व्यवसाय केला जातो असेच कोणीही म्हणेल. संपूर्ण
गुरूकूलातील गुरू शिष्य् परंपरा संपुष्टात आली.काळाच्या ओघात असा बदल होत असला तरी
भौतिक परिस्थितीमध्ये बदल झालेला स्वाभाविक
आहे. ती एक प्रकारे प्रगती असते.परंतु गुरू शिष्य नाते एवढे
कमालीचे बदलून प्रगत होण्याऐवजी अधोगतीकडे वळत असलेले कसे पहावे ? किंवा त्यांच्यात एवढा दुरावा तयार व्हावा असे कसे
झाले.शिक्षक म्हणून त्याचे स्थान एवढे बदलले की आता शाळा डिजीटल झाल्या आहेत.वर्गात
शिक्षक येतात आणि प्रोजेक्टर सूरू करतात.मुले त्या स्क्रीनकडे पाहून शिकतात.गुरूजींचा
हा पडदा झाला आहे मुलांना वाटेल तेवढा सरकवता येतो. कधीकधी बाजूला करता येतो मुलांना
भावनिकतेने शिकवणारा आणि त्यांच्या गुणसुमनांचा अभ्यास करणारा शिक्षक हा तंत्रज्ञ झाला आहे. डिव्हाइसला केबल कनेक्ट करता करता तो मुलांपासून मात्र डिसकनेक्ट
कधी झाला हे कुणालाच कळले नाही.शासनाने वर्गात इंटरनेट कनेक्टीव्हीटी आणली खरी परंतु
बालकांच्या आणि शिक्षकांच्या नात्यातला दुरावा रेंज नसलेल्या रिमोट एरियासारखा लांबच
लांब पसरत गेलाय. स्क्रीन कडे पाहून इक्वेश्न सोडवणारी मुलं प्रत्यक्ष आयुष्यातील समीकरणे
सोडवतांना मात्र अशी काही भांबावून जातात की त्यांना ती परिस्थिती हाताळता येत नाही
किंवा त्यांची भंबेरी उडते.कसल्या नाजूक आणि तकलादू पायावर उभी आहे आपली शिक्षण प्रक्रिया.
शिक्षणाच्या मुळाशी जाऊन विचार करण्याची गरज आहे
का अशा पिढया निर्माण होत आहेत की ज्यांना जरासा स्ट्रेस आला की आत्महत्या करतात
? जरासे सुध्दा सहन करण्याची शक्ती त्यांच्यात नाही.पेलवेना भार, म्हणूनी आभार , समोर
अंधार,सोडून घरदार निघतो आम्ही. या प्रमाणे सारं काही क्षणात संपून जातं.आई वडिलांपासून
जेंव्हा मुलं दूर राहतात तेंव्हा त्यांचा भावनिक
आधार दुरावत जातो. खूप मोठया स्ट्रेसमध्ये ती असतात.समजून घेणारं कुणीही नसतं.ब-याचवेळा
मुलं एकटी पडतात आणि तेवढी प्रगल्भता त्यांच्यात आलेली नसते की स्व्त:हून ती सावरतील
उभारी घेतील.
कुटूंबव्यवस्था सुध्दा एवढी विस्कटून गेलेली
आहे की याला व्यवस्था म्हणावं की आवस्था म्हणावं हेच समजत नाही.सावरायला कोणालाही वेळ
नाही.सारे जण पैसा आणि मोठेपणाच्या मागे मागे जात आहेत.कोणीही कोणाचा विचार करतच नाही.जो
तो आपल्यामध्येच व्यस्त् आहे.ज्याला त्याला
आपलेच पडलेले आहे.पुढे पुढे असा काही पळतो आहे की जणू एखाद्या स्पर्धेतील स्पर्धक परंतु
असे स्पर्धक स्पर्धा जिंकण्याऐवजी अर्ध्यातच कोसळत असतात हे त्यांना कोणी सांगावे ? शिक्षण देणा-या प्रमुख
दोन संस्था म्हणजे एक शाळा आणि दुसरी म्हणजे कुटूंब या दोन्ही ठिकाणी कमालीची नितीमत्ता
ढासळलेली दिसतेय त्याचाच तर काहीसा परिणाम नसेल हा.काहीही असो पण त्या बालकांचे भवितव्य्
कसे काय उजळणार ? हा मात्र प्रश्न् कायमच आहे.फार थोडी मुले घरून चांगले संस्कार घेऊन
शाळेत येत असतात.बाकी मात्र केवळ चिखलाचे गोळेच त्यांना आकार देता देता शिक्षकांना
स्व्त:चा प्रकार बदलावा लागतो पण आजची शिक्षण व्यवस्था ते ही शिक्षकांना करू देत नाही.
नुकतीच वर्तमान पत्रात एक बातमी प्रसिध्द झाली होती शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला. पण
मुलं ही किती कमकुवत होत चालली आहेत हे कोणी विचार करतं का ? पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत
खूप मार दिला जायचा असे सर्व जणांना ज्ञात आहे अगदी ढोरासारखा मार मुलांना दिला जायचा
पण ती मुलंही तेवढी सक्षम होती की कितीही मारा काहीहि करा त्यांची मानसिकता भक्कंम
होती कधी ढळत नव्हती.खरे तर मारून शिक्षण घडू शकते हे कोणत्याही जाणत्या माणसाला पटत नाही परंतु खरा प्रश्न् आहे तो मुलांच्या मनावर होणा-या संस्काराचा त्यांच्या
खेळण्याच्या पध्दतीचा,जीवनपध्दतीचा त्यांच्यातील हरवत जाणारी सहनशीलता , निरागसता या सा-या गोष्टींची उत्तरे आपणास बदलत जाणा-या कुटूंब
पध्दती आणि जीवनपध्दतीमध्ये सापडतील आणि त्यांच्या
बालमनाला भुरळ घालणा-या गोष्टी पासून त्यांना
वाचवण्याची खरी गरज आहे.नाही तर एक दिवस परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.यासाठी
शिक्षक आणि पालक दोघांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण म्हणतो आम्ही म्हणे पैसा एवढा
एवढा कमावतो तंत्रज्ञान वापरून प्रगती खूप
सारी करून टाकत आहोत.खरंच आहे का हे सारं नक्कीच नाही.प्रगती कोणाला नको आहे ? परंतु
हे सर्व करण्याच्या नादात आपण आपली कोवळी मुले गमावतो आहोत..त्यांच्यासाठी आपण एवढया
सुखसोई करून ठेवलेल्या आहेत की त्यांची सहनशक्तीच
कमी झालेली आहे.स्वार्थी आणि आत्मकेंद्री बनलेली ही पीढी मख्खपणे बसून राहते आणि पुढे आळशी बनून बेरोजगारीमध्ये
भर घालत असते आणि याहीपुढे जाऊन आपल्या स्वत:च्या
घराचा भार सुध्दा पेलण्याची ताकद त्यांच्यात नसते असे हे चालेल काय तुम्हाला ? नाही चालणार ना. खरं तर
गरज आहे काय गेले काय राहिले हे बघण्याची
? मग त्यांना भक्कम करण्यासाठी त्यांच्यात आत्म्विश्वास भरण्यासाठी शिक्ष्क वर्गात
असला पाहिजे.तो सतत वर्गात फिरता राहिला पाहिजे.त्याची नजर जेव्हा वर्गावर पडते तेंव्हा सारे चेहरे असे काही आनंदाने फुलतात की त्या प्रत्येकाच्या
मनात त्या शिक्षकांचे स्थान आपोआप तयार होते.मुले शिक्षकांशी बोलतात प्रश्न विचारतात
तेंव्हा आपोआपच शिक्षकांचे व्यक्तिमत्व् न्याहाळतात.मैत्रीचे नाते तयार होते.एकाच
शिक्षकामुळे वर्गातील चाळीस मुलांची स्वप्नं बदलू शकतात.त्यांच्या जीवनाला आकार मिळू
शकतो.गरज आहे ती चांगले शिक्षक शोधण्याची.त्यांना संधी देण्याची त्यांची किंमत करण्याची.शिक्षण
प्रक्रिया मग बघा कशी फुलेल बहरेल आणि लहरेल असा प्रयत्न माजी शिक्षण सचिव नंदकुमार
यांनी I want challenge या नावाने चांगल्या शिक्षकांची एक टिम तयार करून केला होता.अशा
प्रयत्नांची शिक्षण क्षेत्राला ख-या अर्थाने गरज आहे
संतोष् सेलूकर,
पत्ता रामकृष्ण् नगर
जनकल्याण पतसंस्थेजवळ परभणी
9822826747
प्रतिष्ठा
आयुष्याच्या फांद्या वाढतंच जातात दिवसागणिक्
पानगळ ही ठरलेलीच असते ऋतूनुसार
तरी आपले स्वप्न् असतेच की
एकावर एक मजले चढले पाहिजेत टुमदार
असे
का म्हणून थांबावे दिवसांनी
आमच्यासाठी कालचक्र सोडून ?
का म्हणून पाखरांनी आमच्या
अंगणात येऊन बागडावे मनसोक्त ?
झाडांना फुलांना आपण का नाही विचारत
उन्हाच्या प्रखर झळया अंगावर झेलतांना
कोणता स्कार्फ बांधता नाकातोंडावरून
घट्ट ?
पाखरांना तरी कसे विचारावे
आपण
तुमचा फ्लॅट कोणत्या एरियामध्ये
आहे म्हणून ?
साधं आभाळ तरी ठेवलं आहे का त्यांना
उडायला ?
आपल्या घरांचे रंगीबेरंगी उंचच उंच
मनोरे चढवतांना
आतल्या आत ऐकू येतो का कधी ? घरटे उध्वस्त् झालेल्या
पाखरांचा -हदय पिळवटून टाकणारा मूक
आक्रोश
अपेक्षांचे जड झालेले ओझे जरासे
टेकवून
का नाही पाहत सरळ उभे राहून इथल्या प्रत्येक गोष्टीकडे आपण ?
कोणी अशी ही संस्कृती रुजू घातली
की
जंगल तोडून बांधा उंचच उंच इमले
?
आणि वाढवा आपली प्रतिष्ठा
एखादे दिवशी निवारे उध्वस्त् झालेले प्राणी येतील तेंव्हा
पळ काढताल
तुमची प्रतिष्ठा तिथेच टाकून विष्ठेसारखी.!
कसली प्रतिष्ठा घेऊन जन्माला आलात
आपण की विष्ठा ?
संतोश
सेलूकर ,परभणी 9822826747
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलसा बु.
यशोगाथा
शाळेचे नाव :- जिल्हा परिषद पा्रथमिक शाळा
बलसा बु.
केंद्र - जि.प.प्रा.शा. गणपूर
मुख्याध्यापकाचे नाव : संतोष सेलूकर
सहशिक्षक:-
शाळेत कार्यरत शिक्षक संख्या – 05
बंडाळे के. एस.
कांबळे के. एस.
काळवीट एस. के.
कदम एस. बी.
मार्गदर्शक
ज्ञानोबा साबळे, गटशिक्षणाधिकारी पूर्णा
श्री प्रभाकर भोसले विस्तार अधिकारी
पूर्णा
श्री संजय काशिनाथ कांबळे, केंद्रप्रमुख गणपूर
श्री संदीप बळवंतकर मुअ केंद्रशाळा गणपूर
मा मुख्यकार्यकारी अधिकारी श्री बी.पी.पृथ्वीराज यांची शाळाभेट
शाळेची वैशिष्ट्ये
1)
मूल्यवर्धन जिल्हामेळाव्यात
शाळेची निवड
शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन च्या वतीने राबविण्यात
येत असलेला मूल्यवर्धन कार्यक्रम शाळेत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये शाळेतील
बालाजी डुबे या वर्ग चौथीतील विद्यार्थ्यांमध्ये
मूल्यवर्धनमुळें झालेल्या बदलाबाबत मा. शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर व मा. मुख्यकार्यकारी अधिकारी मा.बी पी पृथ्वीराज
व शांतिलाल मुथ्था यांच्या हस्ते जिल्हामेळाव्यात
प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला ही शाळेच्या दृष्टीने अभिमानाची व गौरवाची बाब आहे.
इयत्त सातवी वर्गातील गोविंद शिंदे या विद्यार्थ्यांने
शाळेच्या आवारात सापडेलेली पाचशे रूपयांची नोट प्रामाणिकपणे मुख्याध्यापकाकडे जमा केली.शाळेच्या
वतीने बक्षीस देऊन या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे
ही जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजत आहेत हयाची ही पावतीच आहे.
2)
चला शिकूया प्रयोगातून विज्ञान
कार्यक्रमातून वैज्ञानिक दृष्टीकोण
दर शनिवारी आयोजित चला शिकूया प्रयोगातून विज्ञान कार्यक्रमामुळे
विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झालेले जाणवतात.
दिनांक 28 फेंब्रुवारी 2020 रोजी म्हणजेच विज्ञान
दिनी मुलांनी शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनात इयत्ता 1 ली पासून सर्व विद्यार्थ्यांनी
सहभाग नोंदवला व प्रदर्शन यशस्वी केले. ग्रामीण
क्षेत्रात उपलब्ध साहित्यापासून अत्यंत मोजक्या वेळात हे प्रयोग प्रदर्शनात ठेवल्यामुळे
हे प्रदर्शन अत्यंत उल्लेखनिय असे ठरले या प्रदर्शनाचे उद्घाटन मा.केंद्रप्रमुख संजय
कांबळे यांनी केले.मुलांनी अत्यंत उत्सहात या प्रदर्शनात सहभाग घेतला.
3) गोष्टीमधून शालेय संस्कार
दररोज मुले गोष्टी ऐकण्यासाठी उत्सुक
असतात. हा मुलांचा स्वभाव गुणधर्मच आहे. विविध
संस्कार कथा साहसकथा ,मूल्यकथा ,काल्पनिककथा ,विज्ञान कथा ,बोधकथा , इ मुलांना प्रचंड
आवडतात.यातूनच मुलांचा भाषिक विकास व्हायला मदत होते. आहे त्यामुळे उपस्थिती ही वाढते
व संस्कार होतात,शिवाय शिक्षक व विद्यार्थी नाते दृढ होण्यास मदत होते.आमचे विद्यार्थी
कोणीही अधिकारी शाळेत भेटीला आले तर त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जातात.हा आत्मविश्वासाने
या अशा विविध उपक्रमातून येतो.
4) सहशालेय उपक्रम , बालकलामहोत्सव
,आनंदनगरी , शै सहल, हँगीग गार्डन
शाळेत वेळोवळी सहशालेय उपक्रमाचे
आयोजन केले जाते.यात दरवर्शी आयोजित केला जलाणारा बालकला महोत्सव हा एक महत्वाचा कार्यक्रम
असून संपूर्ण वर्षभर त्याची आठवण राहते तसेच संपूर्ण गावकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित
असतात. त्यामुळे त्यांचा शाळेविषयीचा दृष्टीकोण ही बदलला आहे.खरं तर यापूर्वी असा सांस्कृतिक
कार्यक्रम सायंकाळी सर्व गावक-यासमोर कधीच झाला नव्हता.तसेच पूर्वीच्या मुख्याध्यापकांना
गावक-याच्या भितीमुळे असें आयोजन केले नाही पण आम्हाला गावक-याचा खूप चांगला प्रतिसाद
मिळाला व सुंदर असा कार्यक्रम सादर करून सर्व गावकरी अगदी आनंदाने आमचे कौतुक करत राहिले.
आनंदनगरीच्य माध्यमातून मुलांना
श्रमप्रतिष्ठा ,स्वावलंबन व आर्थिक व्यवहार नफातोटा इ समजला . यावर्षी औरंगाबाद वेरूळ
अजिंठा इ. व ऐतिहासमिक स्थळानां भेटी देण्यासाठी शाळेची सहल काढण्यात आली. यात ऐतिहासिक
स्थळे पाहिल्यामुळे सहल अविस्मरणीय ठरली .तसेच
शाळेत रिकाम्या बॉटल्स मध्ये छोटी छोटी रोपे लावून प्रत्येक वर्गात हँगीग गार्डन बनवलें
आहे.त्यात आम्ही पर्यावरणस्नेही वर्ग अशी कल्पना आम्ही मांडलेली आहे.
5)
लोकसहभागातून शाळाविकास
शाळेसाठी गावाचा लोकसहभाग दरवर्शी वाढत आहे या वर्शी 40000/ देणगी
गावक-याकडून प्राप्त झाली तसेच शेकहॅन्ड फाऊंडेशन परभणी कडून गरीब विद्यार्थ्यांना
दफ्तर वाटप तसेच सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
6)
दिव्यांग विद्यार्थी
शाळेत येण्यात यशस्वी
अजूनही एक बदल आमच्या शाळेत असा झाला की इयत्ता चौथी वर्गातील करण
दत्ता काळे हा दिव्यांग विद्यार्थी शाळेत येऊन बसू लागला.इंग्रजीच्या कवितांवर तो हावभाव
करतो.ज्ञानेश्वर मांदळे हा शाळेला पाहून बाहेरूनच पळून जाणारा दिव्यांग विद्यार्थी
आता शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमामुळे शाळेत पूर्ण वेळ बसण्यास शिकला.
दिव्यांगाचा सहभाग असणारे विविध उपक्रम शाळा
राबविते .शाळेत दिव्यांग दिनाच्या दिवशी गावातील दिव्यांग भगवान डुबे यांची मुलाखत
आम्ही आयोजित केली होती विद्यार्थ्यांनी त्यांना उत्स्फुर्तपणे प्रश्न विचारून आपली दिव्यागांप्रति असणा-या
आपल्या मतामध्ये बदल केले. व पाय नसलेला व्यक्ति लौकिक अर्थाने स्वत:च्या पायावर कसा
उभा आहे हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्यावर मुलांना दिव्यांग व्यक्तीचा आपण दूत व्हावे
हे वेगळे सांगण्याची गरज पडली नाही. आपली दु:ख खूप लहान असतात पण आपण त्यांना खूप मोठे
समजतो हे मुलांना यातून समजले .
मी चालत होतो रस्त्यातून अनवाणी
डोळयात माझीया म्हणूनी आले पाणी
रडणेच थांबले परंतु
माझे
माणूस उभा शौजारी पायच
नव्हते त्याला.
हे ऐकल्यावर आपली दु:ख खूप लहान असतात पण आपण त्यांना खूप मोठे
समजतो हे मुलांना यातून समजले.तसेच हा दृष्टीकोन बदल करण्यासाठी मोबाइल टिचर मुंढे
बिआरसी पूर्णा तसेच माने सर यांचा ही सहभाग खूप मोलाचा होता . .
7)
ग्यानप्रकाश फाऊंडेशनच्या
सहकार्याने यशस्वी पालक सभा
ग्यानप्रकाश फाऊंडेशनच्या मदतीने गावात सायंकाळी सर्व पालकांच्या
उपस्थितीत पालकसभा आयोजित करून शाळा व गाव यांच्यात समन्वय व सुसंवाद कसा ठेवता येईल
याबाबत चर्चा झाली व पालकसभेतून अभ्यासाबाबत पालकांनी काय दक्षता घ्याव्या व पाल्यामध्ये
प्रगती कशी करावी याचे मार्गदर्शन श्री कांबळे व श्री माने (ग्यानप्रकाश फाऊंडेशन
)यांच्या माध्यमातून झाले.
8)
रात्र अभ्यास गटातून नियमित
अभ्यासाच्या सवयी :-
9)
अध्ययन निष्पत्तीवर आधारित
ऑनलाईन टेस्ट: - आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांचा वॉटस्अप ग्रुप केला आहे त्यावर विद्यार्थी
ऑनलाईन चाचणी सोडवतात. मुलांना ऑनलाईन निकाल पाहिल्यावर खूप आनंद होतो.
10) डिजिटल शाळा :- अनेक उपक्रम शाळा सतत राबवित असते. शाळेचा ब्लॉग
https://zpbalsaschool.blogspot.com/2016/02/ असून you tube चॅनल वर शाळेतील
उपक्रमांचे तसेच पाठाचे व्हीडीओ अपलोड केलेले आहेत. उपक्रमशील असणारी आमची शाळा गुणवत्तेच्या दृष्टीने ही सतत दक्ष
असते.We learn English कार्यक्रम ही अतिशय परिणाम कारक ठरत आहे.मुले या कार्यक्रमामुळे
इंग्रजीमधून एकमेकांशी संवाद साधायला लागली आहेत.ही आमच्या शाळेसाठी एक जमेची बाजू
आहे.सर्व शिक्षक एक टिमवर्क म्हणून काम करतात.त्यामुळे शाळेत अतिशय आनंददायी असे वातवरण
असते.त्यामुळे आमचा ही उत्साह वाढतो.
शब्दांकन
संतोष सेलूकर
मु.अ.प्रा.शा. बलसा .बु
ता.पूर्णा जिल्हा परभणी
मो.9822826747