शालेय गंमती जंमती….
“शाळा आमची आहे किती छान की आम्ही रोज शाळेत येणार
लिहूनी वाचूनी शिकूनी सवरूनी आम्ही मोठे होणार …….” हो ..हो.. याच शाळेत आम्ही ही घडलो नि बिघडलो सुद्धा अरेच्या घ्डलो नि बिघडलो असे कसे शक्य आह…? आहे शक्य आहे. नाण्याच्या दोन बाजू जिथे सुख तिथे,दु:ख जिथे,जन्म तेथे मृत्यू,जिथे हसणे तेथे रडणे,येणे नि जाणे.
जिथे शाळा तिथे शिक्षक ,शिक्षक तिथे विद्यार्थी ,जिथे विद्यार्थी तिथे गंमतीजंमती आल्याच की माझी पहिली शाळा जि.प.शाळा एरंडेंष्वर ता.पुर्णा.काय सांगावे या शाळेबद्दल किती तरी गंमती जंमती रोज घडायच्या.तशी मी नुकतीच नवीन नौकरीला लागलेली आणि मध्यमवर्गीय कुटूबांतली एकुलते एक कन्या रत्न असलेली व माझ्या वडिलांची सावलीच जणू होते. मी पहिल्यांदा जेव्हा शाळेत गेले तेव्हा सर्वांनी माझं स्वागत केलं तो क्षण मी आजही विसरले नाही त्याबरोबरंच शाळेतल्या गंमती जंमती सुद्धा लक्षात आहेत तशाच.नव्हे मी त्या विसरूही शकत नाही.
एके दिवशी मी अचानक पहिलीच्या वर्गात गेले.मुले मला पाहताच घाबरली.काही मुले पाटी- लेखणी घेऊन बसली. पण काही मुले तर चक्क लेखणी खात असलेली मी पाहिली.मला ते चित्र नवीन होते.काही मुले उजळणी तर काही बाराखडी लिहिण्यात मग्न झाली.त्यत एका बावळट आणि गबाळा असणा-या मुलावर माझी नजर पडली.मला पाहून तो वर्गा बाहेर पळू लागला.मी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो बाहेरच पळण्यासाठी धडपडत होता.बाहेरच्या मुलांना तो काही तरी खुणवत वर्गाबाहेर पळून गेला. मी नवीनच होते तयाला पकडावं म्हटलं तर ते ही शक्य नव्हते. तो मलाच पळवायला लागला.असे रोजच घडू लागले.शेवटी मोठ्या वर्गातील मुलांच्या मदतीने मी तयाला पकडायला लावलेच एके दिवशी तर हा पठ्ठा़ खूप घाबरला.बाई मारतील म्हणून मग शाळेतच यायचा नाही.मग एके दिवशी मी त्याला प्रेमाने जवळ घेऊन समजावले मग थोडं थोडं माझं ऐकायला लागला.
मग त्याने नवीनच प्रकार सुरूवात केला.वर्गातील इतर मुलांच्या अंगावर खेळण्यातील खोटे साप,पाल,सरडे टाकून त्यांना घाबरावयाचा खेळ त्यांने सुरु केला.एकदा तर त्याच्या या नकली सापाला मी सुद्धा घाबरले.जेव्हा समजले हा साप खोटा आहे तेव्हा माझे मलाच हसू आवरता आले नाही.
एकदा काय झालं एक वटवाघुळाचं पिल्लूच आमच्या वर्गात आलं नि इकडून तिकडे घिरट्या घालू लागलं सर्व मुलं कावरी बावरी होऊन बघू लागली. कुणी म्हणत होते, “अबे टाळूला चिटकतंय ते..” मग काय सर्व मुले घाबरून वर्गाबाहेर गेली आणि हा एकटाच वर्गात त्यासोबत घिरट्या घालत होता.मी हाश्य हुश्य करत कसे बसे त्याला वर्गाबाहेर काढले.तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.पुन्हा एक गंमत झाली.त्यांने वर्गात आल्या वडिलांचा मोबाईल आणला.मग काय? सर्व मुलं त्याच्याच मागे फिरत होती.पुन्हा एके दिवशी अशीच गंमत घडली. तेव्हा शाळेत अत्ताच्या सारखे संस्कार केंद्र नव्हती.गोंधळून जाऊ नका संस्कारकेद्र म्हणजे शालेय शौचालय.पहिलीच्या मुलांना तर बाहेर जायचं सुद्धा कळत नाही.ती वर्गातच …. करतात.काही मुले बाहेर पउक्या जागेत जायची.मधूनच ओरडढत यायची की तिकडे भूत आहे.मग काय ?सगळा वर्ग घाबरून जायचा.तिकडे स्मशानभूमी होती त्यामुळे मुले आधीच या गोष्टीला भ्यायची.मग ओरडून सांगावे लागायचे नका जाऊ तिकडं म्हणून.मुलं कधी खेकड्याच्या मागे लागायची,कधी म्हशीच्या मागे धावायची,कधी माकडाच्या मागे लागायची, कधी तळ्यात तर कधी मळ्यात. एकाने तर शाळेत चक्क्ं सशाचे पिल्लूच आणले.मग काय वर्गात सगळे ससेच ससे.कधी कधी मुलांची शर्टाची बटणं खाली वर लागलेली असायची ते तसेच वर्गात यायचे मग आमची हसायची खूप मजाच मजा. कधी कधी वेगवेगळी चप्पल ,बुट घालून यायची तेंव्हाही खूप गंमत वाटायची की किती निरागस असतात ही लेकरं.शाहेजवळच्या विहिरीत चप्पल टाकायचे मुलं अन त्या निमित्ताने वाकून बघायचे.शाळेत कपाळावर वेगवेगळे आकाराचे गंध लावून येणारी काही मुलं फार गंममतीशीर होती मी दररोज त्यांचे निरिक्षण करायचे.
एकदा वर्गात बेंचवर एकाने फेविकॉल लावून ठेवला. त्याच्यावर एक जण बसला.उठायला गेला तर उठताच येईना.मग लागला रडायला.मग मी त्याची मदत केली तर त्याची पॅनटच फाटून गेली.मग तर अजूनच मोठ्याने रडायला लागला.अशा सतत गंमती जंमती माण्या वर्गात घडायच्या.मला या सतत स्मरणात आहेत.त्या आजही आइवल्या तरी मला हासू आवरता येत नाही.म्हणून माझी शाळा आणि माझे विद्यार्थी मला सतत काही तरी आनंदाचे क्षण देऊन जातात.हा आनंदाचा ठेवा असाच जपून ठेवावा आणि इतर मुलांसोबत शेअर करत रहावा त्यांनाही त्यांची गंमत वाटत राहते.
मंजूषा देवडे
प्रा.शि.जि.प.शाळा देऊळगाव दुधाटे
ता पूर्णा जि.परभणी मो.नं.9765762562
उपसंपादक
संतोष सेलूकर परभणी
मो 7709515110
Email- santosh.selukar@gmail.com
सर लेखिकेचा फोटो आणि संबधित फोटो सकाळी पाठवतो